मराठी गाणी :

 मी माझाच मी .........

मी माझाच मी हरलो कुठे शोधू कुठे
का मज लागली गोडी नवी प्रेमातली
मी माझाच मी हरलो कुठे शोधू कुठे

हा मंद गार वारा कसा लागला जिव्हाळा
कोण येऊन असा हा माझ्या भिडला मनाला
नाव काय त्याचं काय आहे हो ठिकाणा
असा छडतो मला तो येता स्वप्नात रातीला

ये ये ना प्रिये शोधू तुला आता कुठे
मी विसरू कसे तुझे रूप ते ये ना प्रिये
मी माझाच मी ----------------

तू जाऊ नको दूर बघ मन हे व्याकुळ
ये ना प्रिये तू भेटाया मन झालया आतुर
कसं तुला सांगू मन सैरा वैरा पडे
तुला गमवाया मनी उठे भीतीचं काहूर

का छडते मला जीवघेणी ही तुझी आठवण
मी जगवू कसे फुलपाखरू प्रेमातले
मी माझाच मी हरलो कुठे शोधू कुठे
का मज लागली गोडी नवी प्रेमातली
मी माझाच मी हरलो कुठे शोधू कुठे
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
*************************************************
वेड्या मनास माझ्या .........

वेड्या मनास माझ्या कसलेच भान नाही
ये ना प्रिये समोरी जगण्यास मान नाही
वेड्या मनास माझ्या …..........

बघता तुझी सावली जचली या मनाला
हरवून भान सारे मी शोधतो कुणाला
वाटेवरी उभा त्या मी रोजचाच होतो
घेतांना थांग तुझा विचारतो कुणाला
वेड्या मनास माझ्या ….........

वाटे हवा हवा का हा जीवनी किनारा
बघ वाहूनिया आला बेधुंद गार वारा
प्रेमाची साथ अपुली जोडू ये सांजवेळी
पाहू नकोस मागे समजून घे इशारा
वेड्या मनास माझ्या .............

येतील चांद तारे देतील साक्ष तुजला
प्रेमात खोट नाही विचार या नभाला
आलीस तू जीवनी होऊन आशा नवी
दे अर्थ तू साजणी बेअर्थी जगण्याला

वेड्या मनास माझ्या कसलेच भान नाही
ये ना प्रिये समोरी जगण्यास मान नाही
वेड्या मनास माझ्या कसलेच भान नाही
----------------------//**--
  शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
जीव झुरतो तुझ्याचसाठी .........

जीव झुरतो तुझ्याचसाठी ।।
सारखा का गड़े हा
वाट पाहतो तुझीच आता ।।
सारखा का गड़े हा

जीव झुरतो तुझ्याचसाठी ........

रात्र सरते व्याकुळतेने
दिवस आठवणीसवे
ओढ़ सारखी तुझी गं लागे
जगावे जीवन तुजसवे

जीव वाटतो अपुरा तुझवीन
सारखा का गड़े हा
जीव झुरतो तुझ्याचसाठी ..........

प्रेम माझे बोलवे तुला
सोड साऱ्या भान जगाचे
ये सखे तू साथ दे ना
भय तुला गं का कुणाचे

जगावे म्हणतो तुझ्याचनावी
सारखा का गड़े हा
जीव झुरतो तुझ्याचसाठी ..........
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
*************************************************
जाशील तू कशी मज सोडूनी अशी .........

जाशील तू कशी मज सोडूनी अशी
विण चंद्रिकेच्या हा जगणार का शशी
प्रेमाचे चार दिस देउनी दे मला
गमवून मग तुला रडणार हा शशी
जाशील तू अशी ..................

विसरून चंद्रिकेला भोगेल तो ख़ुशी
प्रीत स्वार्थी नाही ती वागेल जी अशी
वाटेवरी जीवनाच्या देणार साथ मी
जाऊ नको ना तू खचूनिया अशी
जाशील तू अशी ..................

आले जरीही दुःख वाटेवरी तुझ्या
घेऊन हात हाती हसवेल तो शशी
नेऊ नको रे देवा दूर चंद्रिकेला तू
विण चंद्रिकेच्या हा जगणार का शशी
जाशील तू अशी ..................

जाशील दूर जेव्हा सोडुनी तू मला
घेईल श्वास पुरता जगण्याचा हा शशी
बघ एकदाची जाऊन तू दूर गं कधी
दिसणार नाही तुला कधीच मग शशी

जाशील तू कशी मज सोडूनी अशी
विण चंद्रिकेच्या हा जगणार का शशी
दिस चार प्रेमाचे देउनी दे मला
गमवून मग तुला रडणार हा शशी
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
नाते एवढेसे .........

नाते एवढेसे तुझे नी माझे हे
धागे प्रेमाचे तुझे नी माझे हे
का दूर व्हावे आपले किनारे २
का नाते रुठावे धागे तुटावे हे
नाते एवढेसे तुझे नी ...........

तूच तू होती स्पंदनात माझ्या
राहल्या ना या एकट्याच वाटा
प्रेम संपले कशाने आपले हे २
वाहून आल्या प्रलयाच्या लाटा
नाते एवढेसे तुझे नी ...........

वाटले ना कधी दूर जाशील तू
अर्ध्यात सोडूनी रडवशील तू
तुझ्या मनाची खबर तुला गं २
सांग ना सखे का दूर गेली तू
नाते एवढेसे तुझे नी ...........

मीच आता जगतो जगण्याचे
आठवणीत या रोज मरण्याचे
जा रहा तू सुखी जीवनी त्या २
रडतो गं रड़ने माझ्या रडण्याचे
नाते एवढेसे तुझे नी ...........
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
मीच माझा हरलो कुठे .........

मीच माझा हरलो कुठे शेवटीचा सरलो कुठे
मीच माझा हरलो कुठे मीच माझा हरलो कुठे
जीवनाचे प्रश्न न सुटता उत्तरे शोधु कुठे
मीच माझा हरलो कुठे मीच माझा हरलो कुठे

एकटिच वाट माझी एकटाच मी
का जगावे सापड़ेना अर्थ जीवनी
संगी कुणी नाही ना माझ्या सावली शोधु कुठे
सावली शोधु कुठे
मीच माझा हरलो कुठे शेवटीचा सरलो कुठे
शेवटीचा सरलो कुठे ………………………….

अंगावरती उठती शहारे आठविता तू
पावसाचे थेंब पडता छडते मला गं तू
आठवूनी अश्रु भिजवती शोधतो तुला कुठे
शोधतो तुला कुठे
मीच माझा हरलो कुठे शेवटीचा सरलो कुठे
शेवटीचा सरलो कुठे ………………………….

निजते ही रात्र माझी संगी एकटी
एकटाच मीच माझा माझ्या जीवनी
जगणे म्हणता जगलो ना मीही सांग थांबलो कुठे
सांग थांबलो कुठे
मीच माझा हरलो कुठे शेवटीचा सरलो कुठे
शेवटीचा सरलो कुठे ………………………….

मीच माझा हरलो कुठे मीच माझा हरलो कुठे
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
भावनेची लाश पडली माझ्या अंगणातं .........

भावनेची लाश पडली माझ्या अंगणातं . . २ . .
का कुणी येउनी केले घाव या मनातं
भावनेची लाश पडली माझ्या अंगणातं . . २ . .

मी नाही कुणाचा वैरी वैर ना कुनाचे
नाते जपले याचे त्याचे प्रेम भावनेचे
का कुणी हा घात केला नाजुक मनाशी . . २ . .
भले केले जेही झाले जन मानसाचे
भावनेची लाश पडली  . . . . . . . . . . .

जिथे तिथे मुर्दे पडले तुटक्या स्वप्नांचे
किती करू राखन मी जोडल्या नात्यांचे
चुकलो कुठे मी अनं गैरसमझ झाले ते  . . २ . .
विखरले स्वप्न सारे आंधळ्या डोळ्यांचे
भावनेची लाश पडली  . . . . . . . . . . .

आज का पेटून उठले मन माझे हे असे
आपल्याच लोकांनी तोडले हो भरवसे
प्रेमानेही भेट दिला एकटेपणा हा असा . . २ . .
मीच मारून भावनेला मन केले मोकळे

भावनेची लाश पडली माझ्या अंगणातं . . २ . .
का कुणी येउनी केले घाव या मनातं
भावनेची लाश पडली माझ्या अंगणातं . . २ . .
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
शोधिले मी किती प्रेम या जीवनी .........

शोधिले मी किती प्रेम या जीवनी
प्रेम स्वार्थी मिळे मानवाच्या मनी
भांडितो का इथे सारखा मानवा
होशील शेवटी तू रे मोठा किती
शोधिले मी किती..........

चल जे ही आहे कर ईश्वरा चरणी
म्हणता पैसा जरी पुरेल कुठवरी
इथलेच इथे सारे जायचे सोडूनी
घाटाची वाट ही चढायची पायरी
शोधिले मी किती..........

चल हो मानवा तू शाहाना जरा
भुकेला भाकरी लोभ का हा हवा
मुक्त आत्म्याने हो जरा मोकडा
जायचे एकदा शांत होऊनी जा
शोधिले मी किती..........

सांगू मी का तुला तू शहाना परी
धावला मानवा पूर्तिला आजवरी
बघ भोवताली गेले ते काय नेले
मी बघतो तुला तू उभा काठावरी
शोधिले मी किती..........
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
तुला काय सांगू .........

तुला काय सांगू व्यथा या मनाची
तुला काय सांगू मी माझाच नाही
तुला काय सांगू

मला जान आहे चुकतो जरासा
तुझे भान जागी मी बेभान वारा
किती ते करू मी जगने हे सोपे
हरवलो कसे गं मी हे भान सारे

तुझ्या संगतीने जगतो सुखाचा
की वाटेत माझ्या कोणीच नाही
तुला काय सांगू .......

चुकलो जरी ही माझा दोष नाही
दिल्या वेदना या वेळेनेच काही
छड़तो दिवस हा रात्र ही छडते
जीवनाची गाडी विचारांनी सजते

दिली चालना तू जगण्याची आता
की तुझविन मला हे जगायाचे नाही
तुला काय सांगू ........

करतो प्रयत्न मी स्वप्न बघावे
स्वप्नांना माझ्या ही पंख फुटावे
जरा वेळ दे तू सावरतो स्वतःला
मी परतुनी येतो चुकलेल्या वाटा

अंधारात मजला तू सोडू नको गं
की माझेच काही मला भान नाही
तुला काय सांगू व्यथा या मनाची
तुला काय सांगू मी माझाच नाही

तुला काय सांगू व्यथा या मनाची
तुला काय सांगू मी माझाच नाही
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
आज रविवार .........

आज रविवार बघा आज रविवार
फुर्सतिचा वार बघा फुर्सतिचा वार

पार्टी मटन की अंडा करी
चिली चिकन की मग तंदूरी

आज होउद्या जरा धमाल
आज रविवार बघा आज रविवार
फुर्सतिचा वार बघा फुर्सतिचा वार

दारु बीरू नको बियर चालेल
मटनवर दारू वीना कसं भागेल

जाऊद्या करता हो कसला विचार
आज रविवार बघा आज रविवार
फुर्सतिचा वार बघा फुर्सतिचा वार

हप्ताभर कामाची गोंधळ
आज जगुया थोड़े बेफिकर

केला नाही मी कसलाही करार
आज रविवार बघा आज रविवार
फुर्सतिचा वार बघा फुर्सतिचा वार
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
नातं आपलं हे .........

नातं हो नातं नातं हे नातं
नातं आपलं हे कसलं सांगणा गं
नातं हो नातं नातं हे नातं

जरी दुरावा हा नशिबी
प्रेमाची न साथ अपुली
तरी बांधली डोर कसली
तुझी माझी का प्रीत फसली
नातं हो नातं नातं हे नातं ......

सहज एकदा समोर येता
प्रेमाला तू दिली चालना
विसरु कसे तुला गं आता
जुडलं कसं मला सांगणा
नातं हो नातं नातं हे नातं ......

वेड लाऊन आज जीवाला
दिला तू हा का भेट दुरावा
दूर अशी जाता मजला
आठवणीला ठेवला दुरावा
नातं हो नातं नातं हे नातं ......
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
जा नको तू दूर जा .........

जा नको तू दूर जा
मज एकटे सोडून जा
का असावा हा दुरावा
सर्व बंध तोडून जा
जा नको तू दूर जा..........

मी माझे जगतो आता
एकट्याचे देने हे
नको मला हा साथ आता
तू तुझे बघुन जा
जा नको तू दूर जा ..........

आहे मज हे सारे नाते
जपण्या जीवनीचे
होईल काही बुरे नी वाईट
तू तुझे जगुण जा
जा नको तू दूर जा ............

का वसवू मनी तुला गं
संगी नाही जगने
दोन दिसाची प्रीत संपली
तू तुझे हरवुनी जा
जा नको तू दूर जा ............

जा नको तू दूर जा
मज एकटे सोडून जा
का असावा हा दुरावा
सर्व बंध तोडून जा
जा नको तू दूर जा..........
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
प्रेमवारा हा वाहुनी आला .........

प्रेमवारा हा वाहुनी आला
हसवुनी हलके का रडवुनि मला गेला
प्रेमवारा हा वाहुनी आला
हसवुनी हलके का रडवुनि मला गेला
प्रेम वारा हा वाहुनी आला ~~~~

जेव्हा द्यायचेच होते हे काटे विरहाचे प्रेमाच्या अश्रुचे
जेव्हा व्हायचेच होते दूर नाते हे माझे प्रेमाने जपलेले
का मग हसवले मला असे का फसवले मला
माझ्या मनाचे का तुकडे हे केले
प्रेमवारा हा वाहुनी
देऊन स्वप्न नवे मग तोडुनि का गेला
प्रेमवारा हा ~~~~~

जेव्हा घ्यायचेच होते जीव माझे प्रेमाने प्रेमाच्या खेडाने
जेव्हा प्यायचेच होते अश्रु आठवणींचे प्रेमाच्या भोवतीचे
का मग सजविले असे दिसं का हरविले असे
तिला दूर काळजाशी मग का केले
प्रेमवारा हा वाहुनी आला
देऊनि ठेवा हा आठवणींचा का गेला

प्रेमवारा हा वाहुनि आला
हसवुनी हलके का रडवुनि मला गेला
प्रेमवारा हा वाहुनी आला
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
आज अचानक काय झाले .........

आज अचानक काय झाले
अनोडखेसे कोण मिळाले
स्वप्न उराशी नवेच बांधून
मन हे माझे बघा उडाले

चांदण्यांचे रूप जणू ते
मनात येऊन वसले
बघता बघता असे कसे
मन हे जोराने हसले

प्रेमाची हि किमया म्हणू
कि माझे काही चुकले
हव्या हव्याशा सुखाला
मन का हे होते मुकले

काही कळेना मनही वळेना
प्रेमरोग हे कसले
नवीन भरारी घेई मन हे
मन कसे हे फसले
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
चल सजनी चल .........

चल सजनी चल घरला माझ्या
हवी हवी मज साथ कुणाची
रुसुन बसली तू दूर अशी का
चल बांधुया साथ प्रेमाची

ये अशी समोर तू अनं घे मला बाहुत तू
दूर जाता व्याकुळते मन दे मला आधार तू
का रहावा हा दुरावा फ़क्त आठवासंगी
ये जीवनी प्रिये बांधुनी डोर जन्माची तू
चल सजनी चल घरला माझ्या....

गेले ते दिवस जाता दूर तू न जाऊ शकली
प्रेम माझे प्रेम माझे तू वेडी न जानू शकली
बोललो कधी खोटे तरी ते तुझ्याचसाठी
हसत रहावी तू म्हणून डोर मी ही तोड़ली

चल सजनी चल घरला माझ्या
हवी हवी मज साथ कुणाची
रुसुन बसली तू दूर अशी का
चल बांधुया साथ प्रेमाची
चल सजनी चल घरला माझ्या....
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
प्रेम पाखरु .........

भीर भीर इकडे तिकडे
फिरतो हा चोहिकडे
काय करू मी याचे हा ऐकेना कुणाचे
याचे मला काही कळेना
जातो तरी हा कोणीकडे ..२..
प्रेम पाखरु मनी प्रेम पाखरु

सैरा वैरा पड़त राहतो
या त्या फुलावर बसतो
काय सांगू मी याला बोलता मजवर रुसतो
याचा कुठला एक ठिकाना
साऱ्यांना बघुन हसतो ..२..
प्रेम पाखरु मनी प्रेम पाखरु

हळू हळू बोल प्रेमाचे
हास्य मनी साठवतो
आंधळ्याच डोळ्यांनी  स्वप्न नवी हा बघतो
हसता हसता कधी रडेल हा
याचा नेमही फस तो ..२..
प्रेम पाखरु मनी प्रेम पाखरु

दुःख दुः ख विरहाचे
प्रेमाने देतही असतो
हसतोही हा रडतोही कशातही सावरतो
विरहाचा आनंद वेगळा
यातही वेडा जगतो ..२..
प्रेम पाखरु मनी प्रेम पाखरु
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
ये अशी सामोर तू .........

ये अशी सामोर तू का लाजते मजला प्रिये
धीर दे आतुर मना का छेडते मजला प्रिये
ये अशी सामोर तू ……….……

बघुनी तुला मी भान हरविलो
ओढ तुझी मज लागली
स्वप्न बघितले तुज संगतीचे
कसली आस हि जागली

जगवेना गं दूर तुझ्या का पडते तू दूर प्रिये
ये अशी सामोर तू ……….……
मांडाया संसार तुजसवे
साथ मला तू दे जरा
तुझी सोबती घेऊन सजनी
जीवन माझे फुलू दे जरा
बघ करुनी प्रेम जरा का घाबरते मजला प्रिये
ये अशी सामोर तू ……….……
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
कसे रंग आले बहरुनी आता .........

कसे रंग आले बहरुनी आता
मनी दाटला प्रेमवारा सुखाचा
तुझे ओठ ओले अबोले न बोले
कसा ऐकू मी शब्द तुझ्या मनाचा

कसे रंग आले-------------------------

हरवूनि मी गेलो बघता तुला गं
मला भान कसले आता न रहाले
हसावे जगावे तुझ्या संगतीने
तुझविन माझे बेअर्थी हे जगने

कसे रंग आले-------------------------

जाऊ कुठे मी करमेना कशातं
बाहुत तुझ्या या सदा मी रहावं
स्वप्न बघावं तुझ्या संगतीचा
तुझ्या संगतीने जीवन जगावं

कसे रंग आले-------------------------

जवळ ये अशी तू बाहुत माझ्या
मला लाजने हे बरोबर नाही
कशाला हवा हा आता दुरावा
प्रिये ये जवळ तू आणि बोल काहि

कसे रंग आले-------------------------

कसे रंग आले बहरुनी आता
मनी दाटला प्रेमवारा सुखाचा
तुझे ओठ ओले अबोले न बोले
कसा ऐकू मी शब्द तुझ्या मनाचा
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************




No comments: