मराठी कविता :

अरे माणूस म्हणून जप माणुसकी थोडी ………

तोडुनिया झाडं तुम्ही ऊन वारा केला
कुठं थांबवावं पाणी कळतंच नाही !
सारं वाहून चाललं पाणी निळ्या सागरात
कशी भागवू तहान पाणी मटक्यात नाही !!

होतं चालला माणूस आज आधुनिक किती
नदी तलावाचं पाणी पिण्याजोगं नाही !
रस्ते उन्हात तापती नाही कुठलीच छाया
श्वास मोकळा हवेला जगण्यास नाही !!

घरं जंगलातं गेली झालं सिमेंटीकरण
पिकं पिकवाया शेती उरलीच नाही !
होतं चालली पाखरं सारी नजरेच्या आड़
आज उठवाया इथे कोंबडीच नाही !!

पोट भरेना भाकऱ पैसा किती मोठा झाला
एक परिवार आता एकोप्यात नाही !
अरे माणूस म्हणून जप माणुसकी थोडी
वेळं अजूनही गेली हातातून नाही !!
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
************************************

माती-मोल ...............


मन बेचैन हा होतो
अनं रडाया लागतो
कुठं चाललो एकटा
मज विचार हा येतो

धीर हरवले माझे
स्वप्नं डोळ्यात राहिले
उद्या पहाट कसली
दिस अंधारात गेले

गावं सोडतो म्हणालो
गाव सुटेनासे झाले
जगी वाढण्या सामोरी
बळ अंगी न राहिले

कुठे शोधू माझे हक्क
हक्क मागू कुणाकडे
हक्क मागल्या भेटेना
असे हे नशीब नागडे

चला जाऊ द्या ना घरी
नको कोणता आधार
बँक लुटलिया माझी
श्री झालेत फरार

सारी जमापुंजी माझी
नशिबाची खोटी झाली
आता हात माझे कोरे
का माती परकी झाली
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
************************************
  तुझ्या गेल्यानं ...............


तुझ्या गेल्यानं कुणाचं काही अडलं नाही
माझ्याकडे मात्र माझंच काही उरलं नाही

तू गेली सर्व गेलं
तू गेली सर्व गेलं राहिल्या फक्त आठवणी
आठवून बघतो कधी कधी सांभाळलेल्या साठवणी

का कुणास ठाऊक का असं घडलं असेल
माझ्या विश्वासाचं दोर माझ्याच फंदी पडलं असेल
प्रेमाच्या या आगीमध्ये मन विळघळलं असेल
तुझ्या डोक्यात काही तरी भलतं विचार नडलं असेल

तू मात्र गेली
तू मात्र गेली तुला दोष देणार नाही
माझ्या नशिबाचे भोग मला टाळता येणार नाही

बघतो मीही आता अंत माझ्या एकट्या जगण्याचा
तुझ्या अशा जाण्यामागे माझं हित जपण्याचा
तुझ्या माझ्या नात्यामध्ये गुपित काही दडलं असेल
मला सोडून जातांना मन तुझंही रडलं असेल

संप म्हणावं एकदाचं
संप म्हणावं एकदाचं जीवनाशी का बंड हवे
सारखे मनाला टोचणारे आठवणीचे कंट हवे

सारे दिवस विसरून गेलो तवसंगी घालवलेले
आग लावली पत्रांना एकमेकांना पाठवलेले
तुला वाटतं तुझ्या गेल्यानं मन माझं घाबरलं असेल
बघून तुझा शेवटचा चेहरा भान माझं हरवलं असेल

शेवट ठरली स्वार्थीच तू
शेवट ठरली स्वार्थीच तू न सांगता सोडून गेली
प्रेमळ माझ्या हृदयाचा पिंजरा तू मोडून गेली

प्रेमळ माझ्या हृदयाचा पिंजरा तू मोडून गेली
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
************************************
 कुठे पुण्य रोवतो तू ......... 

बांधून निंबू मिर्ची गृह्दोष काढतो तू
फोडून नारळाला कुठे देव शोधतो तू
पेटवून झाला कापूर धुपबत्ती वाया गेली 
फसव्यागीरीत मित्रा उगाच सोंगतो तू

बांधून सप्तरंगी धागा कितीक झाला
इच्छापूर्ती पुरता नुसताच झुरतो तू
डूबला किती तरी तू गंगेत नाह्तांना
होण्यास पाप नष्ट दिसरात मुरतो तू

जाऊन तुझे झाले कितीक बुवापाशी
लाखळफुकीच्या खोट्या ढोंगात फसतो तू
सोडून दे तू आता या फालतुच्या गोष्टी
नसल्या सुखांसाठी स्वताःस छडतो तू

अरे जाण माणसा तू तुझ्यातली शक्ती
विसरून मेहनतीला फुकटात हिंडतो तू
कर प्रार्थना मनासाठी माणुसकीसाठी
मारून जनावरांना कुठे पुण्य रोवतो तू 
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
************************************ 
माझी बायको .........

सरळ आणि साधी अशी माझी बायको
वाटत जरी असली तरी आहे सायको

प्रेम करते भरपूर यात काही वाद नाही
कामं तिचे फास्ट फास्ट तिचा जवाब नाही

कधी वाटते बाळ छोटं हट्ट तिचे भलते
डिमांड लहानश्या तिच्या खर्च कमीच करते

जबाबदाऱ्या तिच्यासाठी खूप आहे गंभीर
दुःखात माझ्या सोबत असते सदैवं खंबीर

राग तिचा छोटा मोठा मस्ती लय भारी
रागात मात्र सारखा तिचा राडा असतो जारी

गुणाची सखी माझी कशातही कमी नाही
साम दाम दंड भेद कशाचीही हमी नाही

उदार मनाची तिला कुणाचाही द्वेष नाही
अजूनही तिच्यामध्ये दिसला काही दोष नाही

अजूनही तिच्यामध्ये दिसला काही दोष नाही
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
************************************
चल चल मिनी म्याऊ .........

चल चल मिनी म्याऊ
आपण दोघं शाळेत जाऊ
मिळून वर्गामंदी आपण
छान छान गाणी गाऊ

नवी नवी घाल कापडी
पुस्तक पाटी घेऊन जाऊ
दप्तर तुझा माझा छोटा
चल पाठीवर टांगून घेऊ

अ आ इ ची बाराखडी
एका दोनाचे पाढे लिहू
प्रार्थनेची वेळ झाली
ओळीत सारे उभे राहू

चल पड मिनी म्याऊ
वेळेआधी शाळेत जाऊ
उशीर होवू नये बाळा
उगाच आपण मार खाऊ

चल चल मिनी म्याऊ
आपण दोघं शाळेत जाऊ
खेळता खेळता शिकू अन
शिकून खूप मोठं होऊ
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
************************************
सत्य लपवून आहे .........

मीच माझ्या या मनाशी सत्य लपवून आहे
डोळे हसरे ओठही हसरे दुःख दडवून आहे

या जीवनाची एक कहाणी
थोडी नवी थोडी पुराणी
मीच माझे बघितलेले
स्वप्न तुडवून आहे

मीच माझ्या या मनाशी सत्य लपवून आहे

दुःख कुठे व्यक्त न करता
जीवन असेच सरले सरता
दुःख घेतले पांघरून मी
हर्ष फुलवून आहे

मीच माझ्या या मनाशी सत्य लपवून आहे

जगतो मी जगण्याचे जगणे
आजचे जीवन उद्याचे मरणे
आशेचे तरीही आज मी
दीप पेटवून आहे

मीच माझ्या या मनाशी सत्य लपवून आहे

वेळ सारखी कुणाला नाही
दुःखात परी मी एकटा नाही
होईल म्हणून सर्व सोईचे
धीर टेकवून आहे

मीच माझ्या या मनाशी सत्य लपवून आहे
डोळे हसरे ओठही हसरे दुःख दडवून आहे 
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
************************************
माझी कहाणी .........

पाणावल्या डोळ्यांनी
सांगते कहाणी
सदाही लुटली जाते
कसली मी राणी

आई बहीण लेक बायको
अशी माझी नाती
छळ करून नेहमी माझी
केली जाते माती

सासरी मी पिळल्या जाते
माहेरी बंधन मोठी
करती माझा देखाव्याचा
खोटाच वंदन किती

लाज लज्जा मला सारी
लागते इथे पाळावी
मनातील गोंधळ माझ्या
कुणाला तरी कळावी

किती सांगू वेदना माझ्या
ऐकणारं कुणी नाही
इच्छा आकांशा माझ्या
जाणणारं कुणी नाही

जाणणारं कुणी नाही
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५० 
************************************ 
माणुसकी मरायला हवी .........

घे कापून गळा मानवतेचा
माणुसकी मरायला हवी
धर्म जात करत जगू आपण
परंपरा ही चालायला हवी

अजून होतील मतभेद देशात
स्वार्थी राजनीतीचा जिथे पाया
एक तुपाशी एक उपाशी जगतो
याच लफडयाची सारी ही माया

चला बघूया माणूस जगतो किती
की मरते माणुसकी त्या आधी
मी ही याच तमाशाचा एक हिस्सा
मी ही तर मरेनच कधी ना कधी

समता बंधुता अशी जगणार नाही
अश्याने कुणाचे जमणार नाही
चला मोडुया मनगटी माणुसकीची
जातीचं लफडं असं सरणार नाही 
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५० 
************************************  
प्रेम तुझे नि माझे .........

पाहुनिया प्रेम मनाचे
हृदयात दिली जागा
अदृश्य फसव्यागिरीने
बांधिला प्रेम धागा

सजला त्या कंटकाने
जीवनाचा बगीचा
अंध डोळ्यांनी बसलो
हातरुनी गलीचा

वाटले होते मजला
जाहले स्वप्न पुरे
बघतांना मात्र मागे
आज सारे अपुरे

फसव्या या आसवांना
ओळखू मी न शकलो
ध्वस्त झाले हे जीवन
एकांती आज निजलो
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५० 
************************************
 घर काम .........

तुला नाही नाती गोती
नाही घर बार
तुझ्याविना एकटा हा
अंगणाचा दार

काम वाटे तुला प्यारे
कामच संसार
बायको पोरं सोडून होतो
कामाला पसार

रात्री तू येतो उशिरा
बायको पाहे वाट
पोरगं वाढलं बापाविणं
खोटी त्याची थाट

मरण सरण तुला नाही
पैशाची साठगाठ
कोण काय घेऊन जातो
हे मरण सपाट

मरणावर येणार नाही
अशीच आहे माज
तूच मोडली नाती सारी
समझून घे आज

सावरायला वेळ आहे
सोड खोटा राज
आपलीच माणसं कामाची
बाकी पैशांची गाज 
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५० 

************************************
प्रश्न माझ्या देशाचा आहे .........

प्रश्न जाती धर्माचा नाही
प्रश्न माझ्या देशाचा आहे
तुम्ही राखा तुमची जात
मी फक्त या देशाचा आहे

कोण कुठले बाहेरचे
करू पाहत होते राज्य
सर्व एकमताने लढले
मिळावं म्हणून स्वराज्य

लढले जे इंग्रजांविरुद्ध
माझ्या देशाचे वाघ होते
जे भडवे इंग्रजांचे झाले
माझ्या देशावर डाग होते

आज उद्या कधीही बघा
मी तुम्हा सर्वांचा आहे
प्रश्न जर राहील देशाचा
मी माझ्या देशाचा आहे
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५० 
************************************
काही तरी .........

जीवनाचा जुगार खेळतांना
हरण्याचा डाव मोडतांना
जिंकलो पण शंका आहे
थांबलोय शंका शोधतांना

आहे जवळपास सर्व जे हवं
हवं जे नेटकं जगवायला
हरलो मी तरी नाही जास्त
नाही काही जास्त गमवायला

स्थिती परिस्थिती म्हणून स्तब्ध
परिस्थितीची वेळ बदलण्याची
जुन्या त्या सर्व आवडी निवडी
बघतोय वाट नवं आवडण्याची

जीवनाची परिभाषा लिहावी
लिहावी भाषा आपल्या परीने
मला कळेना अशी माझी भाषा
यत्न लिहिण्या फक्त एक सरीने

रसाळ या जीवनाचे रसग्रहण
रसग्रहण सोपे वाटत नाही
हरलो तरी या हरण्यात मला
जास्त काही तोटे वाटत नाही

जास्त काही तोटे वाटत नाही
---------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५० 
************************************
प्रेम तुझे नि माझे .........

पाहुनिया प्रेम मनाचे
हृदयात दिली जागा
अदृश्य फसव्यागिरीने
बांधिला प्रेम धागा

सजला त्या कंटकाने
जीवनाचा बगीचा
अंध डोळ्यांनी बसलो
हातरुनी गलीचा

वाटले होते मजला
जाहले स्वप्न पुरे
बघतांना मात्र मागे
आज सारे अपुरे

फसव्या या आसवांना
ओळखू मी न शकलो
ध्वस्त झाले हे जीवन
एकांती आज निजलो 
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५० 
************************************************* 
लुटला माझा हिंदुस्तान .........

मी गातो भीमाचे गान
करुनि शब्दांनी सत्कार
राहण्या उभे गरिबाला
मिळवून दिला अधिकार

घडविला नव्याने इतिहास
करुनि घटनेचा हत्यार
व्हावा इथे समतेचा साथ
भीमाने केला हाची विचार

करण्या केले भले तयाने
मोडले आपण सारे विधान
संविधान जे दिले साजरे
त्यातही केले कारस्थान

मोड मोडुनी आपल्यापरी
मोठयांना मानुनी महान
राजकारणा स्वार्थी होऊनि
लुटला माझा हिंदुस्तान

राजकारणा स्वार्थी होऊनि
लुटला माझा हिंदुस्तान 
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५० 
************************************
नये .........

लिहिण्याचे कुणी लिहू नये
अनं खुपणारे बोलू नये
ही दुनिया सारी खोटयांची
सत्य कुणीही तोलू नये

सांगून गेले महान सारे ते
आपुलकीने जगा सख्यांनो
चित्र विचित्र हे दिसते सारे
पोल कुणाची खोलू नये

सत्ता आपली विपक्ष अपला
स्वार्थ आपले साधती सारे
कोण कुणाचे काय कुणाचा
आपले कुणा म्हणू नये

विकतो माणूस विकते माती
काढल्या जाते धर्म न जाती
मानवता बस बोलण्यातली
माणुसकी कुणी शोधू नये

माणुसकी कुणी शोधू नये*
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
*************************************************  
सलाम तुला .........

दुखतं गं मन
बघून तुझ्या त्या जखमांना
चिमुकली जरी
सहलं तू होणाऱ्या वेदनांना

सलाम तुला
तू सहल्या टोचणाऱ्या सुया
ओठांवर हसू
लपवून भीती मनातच तुझ्या

जरी वाहलं रक्त
जरी ते कमी रडवते किती
अंगाचे दुखणं ते
चेहऱ्यावर मात्र काही न भीती

भरून आले मन
गोंडस रूप नी ते रक्त बघून
हसवलं तुला
म्हणूनच मी अधून मधून

हसू बघून हर्षलो
मोठयांपेक्षा तू ठरली मोठी
तुझ्या साहसाला
मोठमोठी ठरली बघ छोटी 
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
*************************************************
धुंदीत वाहतांना .........

धुंदीत वाहतांना हरवून भान होतो
ती ओढ होती कसली मी बेभान होतो
आज वाटते ते अनोडखेच स्वप्न
स्वप्नाच्या जगाशी मी अनजान होतो

मी लागलो वाहाया मज पोहता न येई
डुबण्या जणू मलाही तेव्हा होती घाई
कुठे जाण होती त्या गोड कंटकांची
रुतवून घेतले जे खोट्याच प्रेमापाई

तो काळही अचानक रडवून आज जातो
जपलेल्या आठवणींनी भरून उर येतो
उधळून सारे स्वप्न काढलेत नशिबाने
पुन्हा नव्याने तुटण्या स्वप्नांचा पूर येतो

नको मला तो आता त्या नजरेचा इशारा
पुन्हा कशाला शोधू तो वाहता किनारा
भिजवून घेतले मी हे अंग आसवांनी
सावरून आता घेतो हृदयातला पसारा
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
*************************************************
अलक्ष करणं माझं .........

अलक्ष करणं माझं
माझं मोठंपण आहे
गैरसमझ न व्हावा
मज ते कळत आहे

कशाला बोलून मी
व्यर्थ वेळ घालवू
व्यर्थच शेपूट त्याची
सरळ कराया वाकवू

इतिहासी सिद्ध झाले
शेपूट सरळ न झाली
भुंकू द्या वाटते तितके
कुणा इथे घाई आली

डसण्या धावेल जेव्हा
वाजवायची कानाखाली
करू एकदाचा राडा
आत्ता कुठे वेळ आली
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
*************************************************
मी तुला सांगू कसे .........

मी तुला सांगू कसे
तू मला जाणून घे
अबोल माझे शब्द हे
भाव हे समजून घे
मी तुला सांगू कसे ~~~~

तूच माझी संगीनी
प्रेमगाठ बांधून घे
का असावा हा दुरावा
जवळीक तू साधून घे
मी तुला सांगू कसे ~~~~

मी तुला माझे म्हणावे
तू मला मानून घे
ये प्रिये बाहुत माझ्या
ही ओढ तू लावून घे
मी तुला सांगू कसे ~~~~

मी उभा मागे तुझ्या
तू पावलांना रोखून घे
ये सखे परतुनी मागे
हे जीव जाते अडवून घे
मी तुला सांगू कसे
तू मला जाणून घे ~~~
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
*************************************************
कुणा दोष देणे .........

कुणी मारली ती लंकेश गौरी
म्हणे धाडसी ती सावित्री होती
कशी जाहली ती वैरी कुणाची
म्हणे लेखणी तिची गोड होती

गाथा चोरांची लिहिली असावी
खोट्यात वाटा पचणारा नाही
असावा कुणीही रक्तात माखून
कुणीही इथे वाचणारा नाही

खुनी खेळ झाला खेळून आता
खरी चौकशी कशाने करावी
म्हणे दोष सारा सत्तेचा आहे
ती सत्ताच आहे हमीही ती द्यावी

उगा नाव घेता ठरवायचे दोषी
पुराव्या अभावी बोलणे न काही
करावा निषेध समर्थनात नक्की
कुणा दोष देणे असे योग्य नाही
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
************************************************
गणू रे गणू .........

गणू रे गणू
घरी तुला आणू
गोड गोड मोदक
मिळून हाणू
गणू रे गणू .......

दिवस झाले
जोरदार सुरु
डीजेच्या तालावर
झिंगाट करू
गणू रे गणू .......

पेंडॉल टाकून
लायटिंग करू
सांगणारे बाप्पा
अजून काय करू
गणू रे गणू .......

नटले सारे
बघणारे गणू
झाली तयारी
लवकर आणू
गणू रे गणू .......

उंदीर मामाला
लड्डू गोड चारू
तुझ्यासंगी त्याचा
स्वागत करू
गणू रे गणू .......

येता तू घरी
आरती सुरू
भजन किर्तनाने
तुझे मन हरू
गणू रे गणू .......

तू येता घरी
हर्ष मनी भरू
जाता जाता मात्र
डोळे लागे रडू
गणू रे गणू .......

जाशील जेव्हा
पुन्हा बोलवू
शेवटच्या दिशी
प्रसाद हाणू
गणू रे गणू .......
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
*************************************************
प्रकल्प .........

प्रकल्प मोठमोठे सारेच वाटे खोटे
किती तुटले घरं शेतीचे झाले तोटे
प्रकल्प नावाने कुणाचे होते भले
पडलेत जमिनीचे तुकडे छोटछोटे

घर गेलं शेत गेलं जीव मात्र बाकी
भरपाईची कुणाला जमे वजाबाकी
राबराब राबून पिकवतो गरीब शेती
जमिनी तयांच्या मोल नाही बाकी

गरीबाच्या पोटाला आधार ही शेती
घर या डोक्यावर छप्पर आहे छोटी
कुठं जावं गरिबांनी रस्त्यावर येता
शासनाची मदत कागदावरच मोठी

विरोध इथे नाही कुणाचा देशासाठी
प्रश्न उभा होतो फक्त पोटासाठी
श्रीमंत सारखे श्रीमंत होत जातात
गरिबाला काय पर्याय जगण्यासाठी
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
*************************************************
शिक्षण ........

दशा आणि दिशा दोन्ही बदलून गेली
शिक्षणाची जणू कथा बदलून गेली
शिक्षणाने अश्या होईल कोण मोठा
शिक्षणाची पार प्रथा बदलून गेली

गावोगावी शाळेचा बाजार मोठमोठा
खऱ्या भविष्याची गती बदलून गेली
मरमर करून पुरवायचा किती पैसा
शिक्षणाची सारी नीती बदलून गेली

श्रीमंत गरिबांच्या वेगवेगळ्या शाळा
खऱ्या शिक्षणाची दशा बदलून गेली
खाजगिकरणाचा वाढला असा जोर
शिकवण्याची खरी दिशा बदलून गेली

भल्यासाठी मारतात विद्यार्थ्यांना गुरू
विद्यार्थ्यांची जुनी भीती बदलून गेली
पैशाविना झाले कठीण मोठे शिक्षण
शिक्षणाची आता स्थिती बदलून गेली  
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
==* भारत माझा देश आहे *==

सप्तसुरांचा येथे वास आहे
हृदयी एकतेचा श्वास आहे
बघतो जग सदा कौतुकाने
ही संस्कृती अभ्यास आहे

आयुर्वेद देशाची शान आहे
मानला जगाने तो ज्ञान आहे
सैन्य तोंड देती जश्यास तसे
आधुनिकतेचा हा मान आहे

मंगळावर पहिला डाव आहे
चंद्रावरही देशाचे नाव आहे
तारुण्याने लखलखता खांदा
माणुसकी देखणा भाव आहे

जाती धर्माचा इथे नाद आहे
आपुलकीचा गोड़ संवाद आहे
विविधांगी गुणांनी नटलेला
बहुभाषिकतेची इथे साद आहे
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
 ==* रक्तरंजीत सडक *==

रक्तरंजीत सडक
ठोकली बेधड़क
चकनाचूर ऑटो
पेटली बस कडक

एकाच घरची चार
जीव अंतात गेली
वाचले माणसं दोन
दवाखाण्यात नेली

पोरांनीही तावात
लावली बसला आग
विझवणारी गाडी
हटण्या पडली भाग

मैफिल पोलिसांची
लोकं न आटोक्यात
टकटक बघू लागले
पडले तेही विचारात

पेटत्या बसचे टायर
फुटले जणू पटाखे
काचं दूर उडून जाता
मनी घाबरट तडाखे

बाकी होती फुटण्या
डिझेलची मोठी ट्यांक
बघून तमाशा इतका
मी मागे घेतली टांग

इकडे तिकडे होती
रोज कितिशे अपघात
दोष कुणाला देऊ मी
विझण्या घरची वात

दोष कुणाला देऊ मी
विझण्या घरची वात
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
==* प्रेम केले मी ही आहे *==

पावसाच्या प्रेमाला अनुभवले मी ही आहे
प्रेमामध्ये डोळ्यांना भिजवले मी ही आहे
किती सुंदर असतात वाटा या प्रेमातल्या
प्रेमातल्या वाटेवरती भटकले मी ही आहे

सुख दुख प्रेमामधले बघितले मी ही आहे
जाती धर्माचे भांडण सहले मी ही आहे
समाजाची बांधिलकी प्रेमाला मान्य नाही
बंधन प्रेमामधले सारे तोडले मी ही आहे

प्रेमाला रुसतांना बघितले मी ही आहे
विरहाच्या आसवांना पुसले मी ही आहे
दिसते बघा आज ही हसत मी जगतांना
प्रेमामध्ये जीवनाला वाहिले मी ही आहे
 ----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
==* वेगळीच ती दुनिया *==

प्रेम असेच असते
कठीण मोठे रस्ते
रंग रूप न बघता
मनात येऊन वसते

सुटतो गार वारा
हलका एक इशारा
मोहरतो अचानक
मनी मोर पिसारा

हरवून भान मनाचा
घेतो शोध कुणाचा
अजाणतेने होतो
ध्यास तो जीवनाचा

वेडा होऊन फिरतो
प्रेमात मनाचे करतो
वेगळीच ती दुनिया
हसता रडता जगतो
 ----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
==* फास पडण्यात आहे *==

भेगा पडल्या हातांना
करपले पाय आहे
देवा तुझ्या लेकराला
झाले हे काय आहे

दुःखात थांबला नाही
नांगर हयात आहे
म्हातारपणी घर खर्च
हृदय कोमात आहे

पावसाला पाठव देवा
जीव हरणार आहे
तापताना जमीन रडते
झाड वाळणार आहे

दमला बईल हाकतांना
बंडी सडण्यात आहे
शोधतो चऱ्हाट आता
फास पडण्यात आहे
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
==* तुझाच राज्य आहे *==

शून्यात जन्मला तू
शून्यात मरण आहे
नभ भेदण्याचे छंद
मातीत सरण आहे

उचलून छात्यावरती
मनसोक्त धन धान्य
जातांना हात खाली
अन्याय हा अमान्य

किती हरामखोरी
कमवून झाला पैसा
घाम एसीतुन वाहे
तेव्हा मिडवला ऐसा

रक्ताचं रान केलं
तेव्हा नशिबी हिरवळ
घामाचं पाणी पाजून
शेतीसाठीच मळमळ

उन्हाला तापलो मी
घामाला वाव नाही
तुझाच पैसा मोठा
रक्ताला भाव नाही

मरतो घेऊन फाशी
माझा नशीब खोटा
तुझाच राज्य आहे
तू हो अजुनी मोठा

तुझाच राज्य आहे
तू हो अजुनी मोठा
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
==* बोल बच्चन *==

बापाचे लेक भडवे
बापाचे झाले नाही
म्हणती बाप ज्यांना
ते बाप यांचे नाही

साल्यांचे बाप कसले
झाले महात्मे सारे
विसरून मोल तयांचे
देखावे सोंग सारे

यांना भेटली अक्कल
बाकी अडाणी राहले
राज्य करण्या देशावर
कुत्र्यांचे राज्य आले

वाटे चिडू नये मी
चिडवीत फिरती साले
हे उलट बोल यांचे
असहनिय आता झाले

मोठ्यामनाचे मान झाले
मोठेपणाही खूप झाले
बसवून खांद्यावर यांना
भिजवून कान झाले
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
==* विविधांगी स्त्री *==

स्त्री रांड झाली भावा
आग विझवण्यासाठी
स्त्री वेश्या झाली भावा
ताव मुरवण्यासाठी

स्त्री रखेल म्हणवल्या गेली
थाट दाखवण्यासाठी
स्त्री पर्णीका ही झाली रे
हव्यास मिटवण्यासाठी

स्त्री बायको स्वरूप आली
शुक्राणू पेलण्यासाठी
स्त्री आई झाली भावा
घराणं वाढवण्यासाठी

स्त्रीने जन्म घेतला भावा
घराला घरपण देण्यासाठी
स्त्रीने जन्म घेतला भावा
तु पुरुष म्हणवण्यासाठी
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
दि.२३/०६/२०१७
**************************************************
==* बाप *==

नारळाचं खोल
रूप तयाचा
गोडी अंतर्मनी
दाखवेना

खोड स्वाभिमानी
खांदा तयाचा
कुटुंबाचं सुख
प्रयत्न करी

रक्तानं घायाळ
शरीर तयाचा
टोकदार नांगर
पाझरतो

ऊन पाऊस वारा
घाम तयाचा
थंडगार वारा
पंख्यातूनी

वाघाची गर्जना
काळीज तयाचा
क्षणभंगुर राग
मनामधी

दैवाचं प्रतिबिंब
माया तयाची
आशीर्वाद रुपी
बाप लाभतो
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
==* हायकु माझे *==

१) आईची माया
   निसर्गाची किमया
   दैवं गावले

२) बापाची छाया
   नारळाचे टोकर
   छप्पर भेटी

३) बहीण मोठी
   परिजात गोंडस
   बांधण्या राखी

४) भाऊ धाकटा
   वाळवंटी किनारा
   बाहेरी धावा

५) आजी म्हातारी
   लाकडाचा तुकडा
   फिरे माघारी

६) आजा म्हातारा
   झळला पाला पाचोळा
   वाटली भीती
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
==* बेभान रात्र सरता * ==

बेभान गार वारा
अंगावरी शहारे
भिजले पावसाने
अंग अंग सारे

तव ओठ हे ओले
काहीच का न बोले
ही रात मधुचंद्रि
हृदयात मस्ती घोले

बाहुत घेत तुजला
ओठांनी ओठ शिवले
कळ येऊनी नभाला
घन ओथंबून आले

संगतीने प्रेमाच्या
मग भान सारे हरले
बेभान रात्र सरता
निवांत मन निजले
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
==* कर्जमाफीची न्याहारी *=

जुन्या कर्जमाफीवर नव्याची तयारी
बघा हो आली शेतकऱ्यांची सवारी
किती गरीब लोटले बॅँकेच्या दारातून
धनीच घेतील कर्जमाफीची न्याहारी

पुढल्या वर्षीही नवांदोलनाची तयारी
कर्जमाफी म्हणत रस्ते अडवणारी
भाजीपाल्याने पुन्हा सडतील सडका
आता घ्या फुकट कर्जाची न्याहारी

कर्जमाफीने खाली सरकारी तिजोरी
कामी येईल कुणाच्या बघू ही मुजोरी
कर्जमाफीने थांबतील ना आत्महत्या
होईल ना शेतकऱ्यांचीच न्याहारी

शेतकऱ्यांशी न वैर आहे फक्त यारी
त्यांच्याच घामाने चाले ही दुनियादारी
मरावा शेतकरी वाटेल तरी कुणाला
पण
अशी कशी ही कर्जमाफीची न्याहारी

सांगा ना तुम्ही
अशी कशी ही कर्जमाफीची न्याहारी
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
==* बोल कविते *==

बोल कविते बोल जरा
भाव मनाचे तोल जरा
का बसली उदास अशी
राज मनाचे खोल जरा

बंद ओठ ते खोल जरा
बोल कविते ......

या मनाचे का गऱ्हाणे
नको वाटते ते बहाणे
बोल कविते तू अबोली
शब्दांना दे मोल जरा

बंद ओठ ते खोल जरा
बोल कविते ........

मी माझ्या मनाचा राजा
कोणताही न गाजा वाजा
प्रेम माझे हे खोटे नाही
जाण प्रेम अनमोल जरा

बंद ओठ ते खोल जरा
बोल कविते ........
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
==* लढाया विभाग दिले आहे *==

भारतात साऱ्या कामा
विभाग विभागले आहे
प्रधानमंत्री ते चपराशी
सीमेवर सैन्य दिले आहे

बाकावर आरडा ओरड
युद्ध तोंडानं करू नका
बडडणाऱ्यांसाठी इथे
सैन्य भरती दिली आहे

आहे फक्त क्रिकेट मैच
तरी म्हणती बघू नका
बघणाऱ्याला बघू द्यावे
न त्याला काम दिले आहे

रक्त ज्यांचं आलं उकडी
म्हणावं घरी बसू नका
जाऊन सीमेवरती लढा
लढाया विभाग दिले आहे

लढाया विभाग दिले आहे
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
==* संगी तुझ्या उभा रे *==

संगी तुझ्या उभा रे दुःखात कोण आहे
उगीचाच तू मरतो फासाचे मौन आहे
मरून तुझे कर्ज फेडून झाले का सारे
रस्त्यावर उभे घरचे आधार कोण आहे

उन्हात का अशी रे ती बायको राबते
मुलं झोपली उपाशी अन्नाचे मौन आहे
पांघरून तुझे स्वप्न शासन हे निजलेले
रडले शेत सारे सावराया कोण आहे

मानू नको चुकीचे भास दुःख संपल्याचे
दुखास रडू आले नी ढगाचे मौन आहे
लपलारे बळीराजा जाऊन शोध त्याला
प्रश्नांना तुझ्या रे रोखणार कोण आहे

ओरडाया ढोंग झाले हे दुःख आवरेना
समाज फक्त बोले खिशास मौन आहे
सोडुनिया तू गेला तो फास का असा रे
येणार तुझ्या मागे अजुन कोण आहे

सोडुनिया तू गेला तो फास का असा रे
येणार तुझ्या मागे अजुन कोण आहे
 ----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
 ==* तुझ्या ओठी तू माझं नाव असुदे *==

तुझ्या ओठी तू माझं नाव असुदे
मनी दुराव्याचा एक घाव असुदे
सर्व आठवणी ठेव सखे साठवून
रडक्या ओठी हसरे भाव असुदे

कुणा मिळाले सर्व हर्ष जीवनाचे
हृदयी प्रेमळ स्वप्नांचे गाव असुदे
जरी का नसलो जवड तुझ्या मी
सांगाया कुणा तुझा राव असुदे

कुंकवाने सजली टिकली न माथी
टिकलीचा घरी एक ताव असुदे
मंगळसूत्र म्हणून बांध एक धागा
एकट्यात धाग्याचा डाव असुदे

नसो सुख मुला बाळाचा नशिबी
अनाथावर ममतेचा वर्षाव असुदे
माथारपनी जर तू रडली एकटी
रडण्यास माझा मज्जाव असुदे

तुझ्या ओठी तू माझं नाव असुदे
मनी दुराव्याचा एक भाव असुदे
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
==* भ्रमंती *==

थुंकला कुठे तू कुत्र्या
विरोध मनाचे भित्र्या
धास्ती तवमनाची
नजरेसमोर आली

विद्रोह म्हणत ओरडतो
चप्पलाने चित्र चिरडतो
चिडचिड तवमनाची
नजरेसमोर आली

शब्द चोरून चोरट्याने
केला ग्रंथ भामट्याने
औकात तवमनाची
नजरेसमोर आली

जाणतो तु वास्तवाला
टाळतो तू वास्तवाला
विवंचना तवमनाची
नजरेसमोर आली

जिंकल्याचे भास सारे
आटोक्यात चांद तारे
भ्रमंती तवमनाची
नजरेसमोर आली
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
==* नातं *==

नातं जोडतांना पूर्ण मनाने जोडायचं असतं
जगाला मान्य नसेल तरी घाबरायचं नसतं
लोकांचा विचार केल्याने नातं टिकत नाही
तर नातं टिकवायला सर्वांशी लढायचं असतं

नातं जोडणे सोपे टिकवणे तितकेच कठीण
नातं सच्च्या मनाने नेहमी जपायचं असतं
नातं जर खरं असेल त्यात भेगा नसतात
भेगा पडू लागल्यास प्रेमाने पुरायचं असतं

कुठल्याही नात्यात स्वार्थाला जागा नाहीच
स्वार्थ व शंकेला विश्वासाने हरवायचं असतं
कोणतेही बंधन नात्याला अडथडा नसतो
जिथे बंधन आले त्या नात्याला मोल नसतं

शेवटी म्हणायचं झालं तर,

नातं हे जबाबदारीने पार पाडणारं कर्तव्य
जबाबदारी नसेल तर नात्यात प्रेमही नसतं
लवकर तुटतं ते नातं ज्यात गैरसमझ असतील
नात्यात एकमेकांशिवाय जगायचं नसतं
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
==* तू समजून घे भाव माझ्या मनाचे *==

तू लिहितो तुझ्या मनाचेच सारे
जे लिहितो रे तू सत्य त्यात नाही
तू विद्रोह करतो तुझ्या लेखनाशी
ओकतो आग जी त्यात बात नाही

या शब्दांना देतो द्वेषाची भाषा
तुला जान रे या शब्दांची नाही
किती तोडले नाते रक्तांचे यांनी
तू परी थोडका तुला भान नाही

तू जागृत हो खऱ्या वास्तवाशी
जे काल होते ते बघ आज नाही
जरी हा दिवस मिळाला तुला रे
दिवस रोजचा सारखा येत नाही

काय चालायची रीत हि सारखी
वाद वर्षानुवर्षे का याला तोड नाही
तुला सांगतो राग येतो मलाही
मला मात्र लढण्या आता वेळ नाही

मी केले मनाचे माझ्या द्वार मोठे
भुंकण्याला तुझ्या मी भेत नाही
मी म्हणतो जगावं आता एकोप्याने
आग रक्ताची थंड्या तुझ्या जात नाही

तू समजून घे भाव माझ्या मनाचे
तुला नेहमी सांगणारा मी नाही
हि लिहिली कविता जरी एकट्याने
तू समजून घे एकटा मी हि नाही
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
==* प्रयत्न शेवटचे *==

प्रत्येक शब्द ओठांवर येईल असं नाही
काही मनातल्या मनात गुदमरतात
प्रत्येक शब्द पणाला लागेल असं नाही
काही शब्द प्रयत्नात विस्कटतात

प्रत्येकाला सौख्यभऱ्या जीवनासाठी
वेळे आत प्रयत्न करावे लागतात
कुणी आपलं दूर जाणार या भीतीने
मनवण्याचे नको ते डाव असतात

मन बोलत नाही बोलतात फक्त ओठ
ओठांना असत्त्याचे घाव असतात
कधी प्रेमाने तर कधी रागात ओरडणे
प्रेमातल्या हक्काचे भाव असतात

कधी खरं तर कधी खोटं बोलून सुद्धा
टिकवाया प्रेम प्रयत्न पार असतात
काय होणार कसं होणार दूर गेल्यावर
नको ते प्रश्न अनं विचार असतात

बोलावं तरी काय मनातलं या कवीने
कवीही नशिबाने लाचार असतात
मानावी का हार आता कविमनानेही या
कि,
कविलाही काही आधार असतात ?
If possible........
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
==* वास्तवासवे *==

कुणी किती सहज उलगडतं जीवन आपलं
मी अद्याप हरलेलो वास्तव नी अर्थ आपलं
असं नाही की दिसत नाही मला माझं वास्तव
सत्य दिसताही निशब्द हरवतो भान आपलं

गोंधळ नको त्या विचारांचा क्षणोक्षणी मनात
वास्तवी शोधात पळत सुटतो उन्हा तान्हात
आहे सर्व तरी का उणीव भासते अनोडखिशी
उणीव पूर्ण करण्या वावरतो सरत्या जीवनात

मोठ्यात मी लहान असण्याचा अर्थ शोधतो
नको त्या प्रश्नांचा उत्तर शोधत व्यर्थ फिरतो
प्रत्येकच प्रश्न बेअर्थी असा माझा डाव नाही
उत्तरात प्रश्न निर्माण करीत मी अनर्थ पावतो

आज वाटतं मी झालो शेवटी पूर्ण कुणासवे
भूतकाळ विसरून सारे जगावे कसे त्यासवे
जगतो ना वास्तव लपवून काळोख्या रातीचे
घाबरतो कटणार कसे जीवन वास्तवासवे
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
==* त्याच त्या आठवणी *==

आठवता आठवती त्याच त्या आठवणी
हृदयी राहल्या ज्या कधीच्या साठवूनी
हसने रडणे जरी खोटेच माझे जगणे
हर्षावली नियती तुझ दूर पाठवूनी

आठवे जुनी गाथा छेडे दिस राती
राख झाले स्वप्न सारे देत आहुती
जिंकली जात धर्म समाजाची नीती
हरवुनी सर्व हर्षतो कुणाची मज भीती

राहल्या आठवणी त्या सरता सरेना
रूप ते साधे भोळे विसरुन विसरेना
का कुणाचे बंध वाटले स्वार्थी काटे
हरवले सुख जीवनी दुःख आवरेना

खुश तू खुश मी जरी दुरावा नियती
वाहे प्रेमवारे तरी अवती भवती
वाटे ठीक झाले तू सोडुनी मज गेली
या आठवणी संगे आनंदात दिस सरती
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
==* असा हा मुंबई प्रवास *==

असा तसा कसा तरी संपला प्रवास
कुठे सुंदर दृश्य कुठे घमंग वास
कुठे गार वारा जसा समुद्रकिनारा
कुठे पोस्टरांतून राजकीय ध्यास

असा हा मुंबई प्रवास

नोटबंदीत कित्येक मदतीला हात
कुठे पेटिएम कुठे डेबिटची रात
वेळेच्या तालावर नाचणारी माणसं
कुठे प्रांतवाद कुठे जातीला मात

असा हा मुंबई प्रवास

माथ्यावर कुंकू जणू हॉटेल ताज
गेटवे ऑफ इंडियाचे इथेच राज
मंत्रालय म्हणजे विरोधाचे नारे
नरिमन पॉईंट वर सेल्फीचा माज

असा हा मुंबई प्रवास

रस्त्यावर धावणारे वाहन हजार
जागोजागी लागे स्वस्त बजार
वडा पाव सोबत चहाचा प्याला
लोकलने माणूस झाला बेजार

असा हा मुंबई प्रवास

फॅशनच्या नावाने कापडी लहान
कुठे पाछ्यात्य कुठे भारतीय मान
आर्थिक क्षेत्रात जी भारताची शान
विविधतेने नटलेली मुंबई महान

असा हा मुंबई प्रवास
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
==* आता एकटेच जगायचे *==

नको म्हणतो आता
दुःख कुणा द्यायचे
नशीबी एकट्या वाटा
आता एकटेच जगायचे

नको म्हणतो आता
अश्रू कुणा दाखवायचे
वाट कुणाची न रोखता
होईल तसे चालायचे

नको म्हणतो आता
अपेक्षेत वाद घडवायचे
जगावे त्यांनी वाटते तसे
आपण गप्पच बसायचे

रात्रीचे स्वप्न म्हणून
आपणच ते तोडायचे
नशीबी एकट्या वाटा
आता एकटेच जगायचे
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
==* दिवस संपण्याचे *==

वैतागल्या मनी भाव कशाचे
भिकाऱ्याला हे ताव कशाचे
या त्या तुकड्यावर जगणारा
ऊगाच देतोय हे घाव कशाचे

दिले जे होते नव्हते हक्काचे
दिखावे नाही सीमा बांधन्याचे
दिल्या हक्की करावी अरेराई
ऊगा अट्टहास का काश्मीराचे

चोळत राहु जखमांवर मलम
गेले ते दिवस माफ़ करण्याचे
कसला घेतो प्रतिशोध बापाशी
त्यानेच दिले हक़्क़ जगण्याचे

कधी अमेरिका नी चिन म्हणत
भेकाळ कुत्र्यागत भुंकायचे
या त्या भरवश्यावर भामट्याने
आपल्यालाच डोळे दाखवायचे

बंद कर म्हणावं तमाशे सिमेवर
दिवस आले भारतीय सैन्याचे
वाटेल ते पाठव सिमेच्या आत
दिवस आले त्याच्या संपण्याचे

दिवस आले त्याच्या संपण्याचे
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
==* नको ते वाटले मी *==

माणूस वाटतांना पावले दान सारे
काल ते आज ही तेच ते नगाळे
माझा तुझा म्हणुनी होतोय हा राळा
रंगात नवरंग नी घरात रंग काळे

वाटून महात्म्यांना आपापल्या परी
करती विठू माझा माझाच तो हरी
झाले करून तुकडे तुकड़े या देशाचे
राज्य जणु झाले एकमेकास हे वैरी

वाटून पटेल कुणी महात्मा गांधी घेई
शिवाजी वाटले वाटले ज्योतिबा फुले
कुणी वाटली अहिल्याबाई होळकर
झाँसी वाटली कुणी सावित्रीबाई फुले

करू राग मी की हसू मुर्ख लोकांवर
का काढ़ती धर्म हे जातीचे ढिंडोळे
रंग वाटले देव वाटला वाटली फुले
घोड़े हत्ती घेतले पिंडाला कावळे

म्हणावे श्रेष्ठ मी मानसात स्वतःला
बिनकामी गाढवांचे नको ते सहारे
धर्म वाटले जात वाटली नावही वाटले
नमस्कारासही साध्या वेगवेगळे इशारे
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
==* दिवाळी नवलाईची *==

रंगा रंगाने सजली बहरली दिवाळी
नव्या स्वप्नांनी मोहरली दिवाळी
अंगणात दिव्यांची जगमग घेवून
मना मनात साऱ्या हर्षावली दिवाळी

आकाशदिवा सप्तरंगाचा टांगून दारी
आई बहीण पत्नीने पेरली रांगोळी
चिमुकल्यांचा गगनभेदी हर्षोउल्हास
संगी पटाखे हाती फिरवली फुलझळी

गोडधोड खावया संगी चिवडा चखली
आली आली दारी नवलाईची दिवाळी
सजवून पूजेची थाळी तयारी स्वागताची
आली आली दारी नवलाईची दिवाळी
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
==* माझी ही दिवाळी *==

दिवाळी पहिलीच अशी ही जी
माझ्यानेच आता मनवल्या जात नाही
काढून दिवे नवे पुराने सारे
वात ही दिव्यांची बनवल्या जात नाही

भिंती दरवाजे रंग उतरलेले
रंगवाया किम्मत मोजल्या जात नाही
चिवड़ा चकली गोड धोड़
तेल तुपाचं काही काढल्या जात नाही

कुनासवे उडवू दोन पटाके
आग पटाक्यांना लावल्या जात नाही
सजेल आंगण अश्रुंनी माझ्या
तेल दिव्यांसाठी आनल्या जात नाही

लाऊ कुणासाठी आकाशदिवा
उजेड नयनांनी बघवल्या जात नाही
कुणाला म्हणु रांगोळी काढाया
रांग रांगोळीची ओढवल्या जात नाही

सन हर्षोल्हासाचा दिवाळी
एकट्याने मात्र मनवल्या जात नाही
हसतोय बघून इतरांचे हसने
माझ्याच घरी मला हसवल्या जात नाही
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
==* जातिबंध *==

अगण्य ऐसे करुनी प्रेम
तवप्रेम सखे मिळवायचे आहे
कृष्ण परी खेळ मांडूनी
तुजसवे राधे मिरवायचे आहे

घडला न महाभारत, पुरे
प्रेमगाथा नावी करायची आहे
पुसतिल लोकं आपणा
जिंदगी अशी जगायची आहे

राजा न सारथी मी कुणाचा
रासलीला तरी खेळायची आहे
सुदामा जैसा गरीब जरी
जीवनी अभूत रेखायची आहे

कृष्ण जरी शासक होते
मी साधारण प्रेमपुजारी आहे
दैवं म्हणुनी ते प्रेम चालले
गरीब प्रेम का नाराजी आहे

का ऐसा दोष जाहला
प्रेम करने काय चुकीचे आहे
बंध आजच्या गोकुळाचा
"जातीबंध" हे तोडायचे आहे
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
==* व्यसन *==

राखावे ध्येय ते व्यसन राखतात
शिक्षणाच्या वयात तंबाखू चाखतात
काय होणार हो या नव्या पिढिचे
व्यसनात बुडून ते टपऱ्या राखतात

गुटखा तंबाखू ते फैशन समझतात
रस्त्यांवर रंगीत रांगोळी काढतात
आईपीएलचा सट्टा जुगाराचा अड्डा
हरून हरून शेवटी उधारी वाढवतात

मोबाइल म्हणून एक रोग पाळतात
नंतर करू म्हणून अभ्यास टाळतात
उपयोग योग्य इंटरनेट चा कळेना
सोशियल साईट बघत बोटं दुखवतात

चुकत नाही जऱ मोबाईल वापरतात
पण नादापाई या कामच विसरतात
जेव्हा बघावं सारखं टप्पर टप्पर
प्रत्येक कामासाठी घरचे ओरडतात

जबाबदारी म्हणून होकार सांगतात
आई बापाचे पैसे व्यर्थ खर्च करतात
या वयात नाही बरडन कसले म्हणून
भविष्याला सहज समजून जगतात

आजकाल मूलं का हो असे वागतात
वाईट गोष्टी ते लवकरच पत्करतात
भल्या बुऱ्याची ओडख करून न घेता
आपल्याच मनाला श्रेष्ठ समझतात
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
==* प्रकल्पग्रस्त *==

असे तसे कसे कसे
धोरण गाठले
प्रकल्पाच्या नावाणं
आम्हास लुटले

सरकारी कामकाज
कसे ते कळेना
आम्हा गरीबाची वाट
सुखाकड़े वळेना

लाख मोलाची जमीन
बेमोल का घेतली
जगत होतो कसंतरी
भाकर का छिनली

आता आम्ही जावं कुठं
सोडून घर आँगन
आम्हाला जमतच नाही
धरण्यांचे सोंगन

प्रकल्पाच्या नावाणं का
अन्याय तुम्ही केला
उपाशी ठेऊन आम्हाला
पोटोबा तुमचा केला

अश्याने जगेल कसा
शेतकरी बेचारा
चोर खातो हीरे मोती
ढोराला नाही चारा

तुमची नीती लुटन्याची
संपेल का हो कधी
प्रकल्पाच्या नावावर
फ़क्त गरीबाची गती
 ----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
==* झाड नाही श्वास *==

श्वासास श्वास देते
जगण्या आधार होते
यांच्याच सानिध्याने
पूर्णत्वास जीव पुरते

हांथरली हिरवी चादर
धरणी सजुन दिसते
फुलांची बाग़ सजली
मन बघून मोहरते

अतुल्य मोल झाडाचे
तरी तोडल्या का जाते
झाड़े लावा झाड़े जगवा
फ़क्त तोंडी महंती गाते

आपल्याच हाताने सुरु
अंताची तयारी होते
नाश खजान्याचा या
आपल्याच हाती होते

झाड़ एक सर्वांनी लावा
किती आनंदी मन होते
बघा तरी करून अनुभव
स्वाभिमानात भर पडते

जतन करावे झाडांचे
पिढ्यांपिढ्यासाठी
यांनीच पाऊस वारा
माणूस जगवन्यासाठी
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
==* वृत्तपत्र एक धाडस *== (सर्व पत्रकार बंधू बघिणींना समर्पित)

रात्रंदिवस लढत संकटांशी
बातमी आनता तुम्ही
ऊन वारा भर पावसामध्ये
शब्द साठवता तुम्ही

नमन तुमच्या मेहनतीला
कष्ट किती घेता तुम्ही
शब्द शब्द पिळून देशाचे
वास्तव लिहिता तुम्ही

देनगी अनमोल देशासाठी
कर्तव्य पाडता तुम्ही
शब्दाने असत्त्यावर सत्त्याचे
झेंडे गाड़ता तुम्ही

ध्यास टिकून राहावा असा
शब्दांसवे भांडावे तुम्ही
शब्द शब्द नी फ़क्त शब्दांनी
इतिहास घड़वावे तुम्ही
 ----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
==* मस्तीची माज आली *==

बाहुत तुला घेता
प्रेमाची जान झाली
ओठांवर ओठ देता
मस्तीची माज आली

मुकलो मी का होतो
आजवरी स्पर्शाला
हा स्पर्श तुझा होता
मस्तीची माज आली

जवड तुझ्या येता
आग लागे जीवाला
अंगा अंगात आता
मस्तीची माज आली
   
वाटते हवी हविशी
संगत तुझीच आता
जादूने कोणत्या ही
मस्तीची माज आली

एकटाच फिरत होतो
वाटेवरी जीवनाच्या
पूर्णत्वाची जान होता
मस्तीची माज आली

आता नको हा दुरावा
कसली गं घाई झाली
हातात दे हात आता
मस्तीची माज आली

तू दूर ऊभी अशी का
बोल ना प्रेमाचे काही
टेकुदे ओठ ओठांना
मस्तीची माज आली

टेकुदे ओठ ओठांना
आता
मस्तीची माज आली
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
==* शब्दांनी लिहा *==

शब्दांनी लिहा जनमताची कहानी
शब्दांनी फोड़ा मूक ओठांची वाणी
लिहिते करा सर्व सामान्य हातांना
निवांत का बसावी लपून शब्दराणी

मांडूनी प्रश्न सारे दुःख करा मोकळे
हैरान परेशान हे अधीर मन सगडे
वाढला आक्रोश सामान्य मानसांचा
होऊ द्या झाले जर विरोधाचे झगड़े

कर्म तटस्थ तुमचे निर्भिग्न लढणारे
मानावे किती तुमचे आभार माननारे
कर्म ती लेखनी भाषा सज्ज देखनी
जनहिताचेच व्हावे कर्म तुमचे सारे

बिंधास्त तुम्ही केली वास्तवाची वारी
करतो अभिनंदन कौतुक या मनाने
लेखनीस तुमच्या भरभरुन शुभेच्छा
पुन्हा करा नव्याने लढण्याची तयारी
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
==* आई तुझ्या दुधाला *==

आई तुझ्या दुधाला कसलेच मोल नाही
गाळले तू जे घाम ते रक्त म्हणवले नाही
रस्त्यावर फेकली ममतेची तुझी छाया
रक्ताला तुझ्या आता तुझीच गरज नाही
आई तुझ्या दुधाला . .

तू रक्त पाजुनी केले लहानाचे मोठे ज्याला
होऊनी तोच मोठा शहाणा किती झाला
दोन दिसाची नवरी वैरण झाली आईची
घरी बायको येता ममतेला विटाळ झाला
आई तुझ्या दुधाला . .

विसरुन दुधाची किंमत भाळला शरीराला
म्हणताच बायकोने लात मारली घराला
मुलावर का केले होते अन्याय या मातेने
पाठवले मरता खेपी आईस वृद्धाश्रमाला
आई तुझ्या दुधाला . .
 ----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
==* चंद्रभागेतिरी ऊभी बावरी *==

चंद्रभागेतिरी ती ऊभी बावरी
रूप लावण्याचे अशी लाजरी
लाजावी परीही बघुनी तिला
जनु भासे ती गोऱ्या चंद्रापरी

चंद्रभागेतिरी ती ऊभी बावरी !!

चिंब भिजली साळी अंगावरी
केस कमरेवरी लट गालावरी
टिकली शोभे मस्त माथ्यावरी
ओठांवर हसू फूल गुलाबापरी

चंद्रभागेतिरी ती ऊभी बावरी !!

हरलो माझाच मी ना भान उरी
मन बेभान बघुन ती सोनपरी
शोधू कुठे नाही माझ्यात मी
दिसावी रोज ती चंद्रभागेतिरी

चंद्रभागेतिरी ती ऊभी बावरी !!
 ----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
==* एकमेकांच्या नावाने *==

जप तुझ्या अश्रुंना नावाने माझ्या
भर कुंकु माथ्यावर नावाने माझ्या
जरी नसु जीवनभर एकमेकांसवे
तू कर जीवन तुझं नावाने माझ्या

दूर राहून कितीही हसू ना आपण
एकमेकांच्या नावे जगू ना आपण
तू फ़क्त माझी अनं मी फ़क्त तुझा
प्रेम हे जीवनभर जपू ना आपण

समाजाचे देणे दोघे फेडू ना आपण
घरच्या नावाचा मान ठेऊ ना आपण
जे दुःख देईल भाग्य सोसु ना आपण
एकमेकांच्या नावाने जगु ना आपण

एकमेकांच्या नावाने जगु ना आपण
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
==* वाट संपल्यावर ...? *==

उन्हा तान्हातणं फिरली ती
घेऊन लेकराला खांद्यावर
पैका पैका भीक मागली
का गरिबी हि माथ्यावर

नवरा व्यसनी म्हणून बेकामी
जबाबदारी त्या बिचारीवर
मुलं केली पैदा नवऱ्याने
प्रेम फक्त घोडं उठल्यावर

नारी म्हणून पाडला पत्नीधर्म
सासू सासरे उठे मरणावर
माय बापाने तरी काय पाहिलं
दिली अशी सोडून वाऱ्यावर

ती तर होती स्वप्नातच जगणारी
तुटले स्वप्न वास्तव जाणल्यावर
जग खूप हरामी निर्लज्ज नीच
जिंकत आली बुऱ्या नियतीवर

वाकली नसती ती कधी कुठे
प्रश्न उभा उपाशी मुलांवर
थकली शेवटी अब्रू विकली
काय करणार वाट संपल्यावर

करणार तरी काय बिचारी ती
वाट संपल्यावर ?????
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
==* प्रेमाची साथ अपुली *==

प्रेमाची साथ अपुली
प्रेमासवे जगावे
न्यायचे काय उराशी
देणे देऊनी जावे

पैसाही पुरे ना अंती
स्वाभिमान जपावे
माणूस म्हणूनी मरा
माणसात जगावे

कुणाकुणाचा वाद हा
कुणाचे रक्त वाहे
मरणाराही मी होतो
मारणारा मी आहे

कुठे झाली बुद्धि भ्रष्ट
कुणाचे हे इशारे
जाती धर्म नी स्वार्थाचे
तमाशे फ़क्त सारे

मीच श्रेष्ठ म्हणवतो
मीच नीचही झालो
आपल्याच मायदेशी
मीच गद्दार झालो
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
==* पालवी फुलू लागली *==

पालवी फुलू लागली वाळल्या झाडावर
फांद्या ही डोलू लागल्या उभ्या खोडावर
कित्येक झाड मोडके थकल्या वाटेवर
पालवी फुलू लागली वाळल्या झाडावर

जणू संपले होते त्याचे पूर्णच अस्तित्व
रेंगाडत चालत होता बसल्या जागेवर
आज मिडाला श्वास नवा जगण्याला
उदार मन विश्वास फक्त माणुसकीवर

झडली फुले पाने अनं खोड मोडका
त्याचेच वाटे बोझसे त्याच्या धरणीवर
आज धीर मिडाला रडत्या डोळ्यांना
त्याचेच रक्त उठले त्याच्या जीवनावर

पुढे येऊनी आधार झाले भले ते लोकं
खंबीर उभा आज माथारा पायावर
अशी जुडावी मानवतेची फांद्याला फांदी
देउनी छप्पर पुसून अश्रू वस्त्र अंगावर

पालवी फुलू लागली वाळल्या झाडावर
फांद्या ही डोलू लागल्या उभ्या खोडावर
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
*******************************************************
==* मन माझे हे *==
एक दिवस मी अधीर झालो मन माझे परतले नाही
कुणास ठाऊक काय जाहले मज काही उमगले नाही
कुठे हरविले कुठे राहले चूक माझ्याने झाली तर नाही
फिरता फिरता मन माझे हे सोडून मज गेले तर नाही

याच विचारी गुंतून होतो आज अचानक चाहूल झाली
डोळे वरती करून बघता मनराजेंची स्वारी आली
मन उदास होते वेडे कुठले हसत नाही बोलत नाही
काय करू हसवाया आता हे तर काही मानत नाही

कुणाशी नाही वैरही त्याचे काय करावे सुचत नाही
रडणे फक्त हे अधुनी मधुनी राग जीवाचे गात नाही
मागणी केली उत्तर द्यावे पण ते काही सांगत नाही
काय घडले कुठे हरवले भेद आपुले ते खोलत नाही

एकदिवस मन मला म्हणाले मीरे आता तुझ्यात नाही
मी झालो आता दुसऱ्याचा तुला कधी मिळणार नाही
त्या दिवसाला रस्त्यावरती बघितले बाहेर फिरतांना
कुणीतरी जवळुनी माझ्या हलकेच जरा दूर जातांना

दूर जातांना सोबत अपुल्या ती मलाही घेऊन गेली
रूप देखणे जणू चांदणे ती मलारे हरवून नेली
बोलायाचे मन बोलून गेले सांगायाचे सांगून गेले
ऐकून मलाही विचार पडला काय घोळ मनाशी झाले

देतं कुणाला ह्रुदयभान ते लपवित तर काही नाही
प्रेमाचा हा खेळ निराळा मन हरवून तर आले नाही
जानिला मी भेद मनाचा जरी ते मज सांगत नाही
हा तर होता खेळ प्रेमाचा अंत सुंदर ज्याचा नाही

एकदिवस मग मी सांगितली गोष्ट मोलाची काही
कोण होती ती स्वप्न सुंदरी जी वळूनही बघतं नाही
रस्त्यावरती अनोड्खीशी एक मुलगी बघितली
हरवून बसला तुजला तुरे जी बघूनही हसत नाही

आकर्षण जो एक क्षणाचा तो प्रेम म्हणवत नाही
प्रेम म्हणजे घोर तपस्या जी तुला रे जमत नाही
अरे मना मी तुला सांगतो कित्येक आले गेले
प्रेमाच्या या खेळामध्ये सर्वच हरवूनी मेले

तरीही म्हणतो तुला मिळावी मिळणार तुला जी नाही
लाख प्रयत्नं केले तरीही होणार तुझी रे ती नाही
माझे म्हणणे पटले होते त्याने मान हलविली
थांबवून मग मला म्हणाले बोलायचे काही नाही

दे मला तू वेळ जरासा मी विचार करतो आहे
सांगीतल्या तुज बोलाचे मी चिंतन करतो आहे
काही दिवस मग गप्प होऊनी विचार करीत बसले
एकदिवस मग हसता रडता येऊनी मज बिलघले

रडता रडता मला म्हणाले मी चूक मोठी केली
तुझ्यासारख्या माणसाची फसवणूक माझ्याने झाली
तूच माझारे पाठीराखा तुझ सोडून कसा मी जाऊ
तुझ्या सारखा मित्र गावला दुसरे जग कशाला पाहू

चूक माझी ही पहिली वहिली चुकणार पुन्हा मी नाही
तुझ्याविनारे कुणाच्या मागे दिसणार कधी मी नाही
प्रेमाचा मग खेळ संपला मन जोरजोराने हसले
अश्याप्रकारे मन माझे हे माझ्यातच येऊनी वसले

अश्याप्रकारे मन माझे हे माझ्यातच येऊनी वसले
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
 ==* लाडकी बहीण माझी *==

लाडकी बहीण माझी आली आली बघा
घेऊन अक्षीदं थाळी थाळी बघा --२--

जबाबदारी तुझ्यावर आहे भावा
विसरू नकोरे कर्तव्य तू तुझा
करायची रक्षा या बहिणीची सदा
राखीच्या दिसाला तू वचन हा दिला

रक्षा करावी बहिणीची या भावाने
हिमतीची आणली ती दोरी दोरी बघा --२--
लाडकी बहीण माझी आली आली बघा
घेऊन अक्षीदं थाळी थाळी बघा

नातं अतूटं असा बंध जीवनाचा
वाट पहावी सदा पर्व हा प्रेमाचा
श्वास संपावा तरी जो तुटेना
नातं हा असा बघा बहीण भावाचा

बहिणीने बांधीला राखीचा एक धागा
भावाने दिला आश्वासन रक्षणाचा --२--
लाडकी बहीण माझी आली आली बघा
घेऊन अक्षीदं थाळी थाळी बघा

बहिणीच्या ममतेची सावली असुदे
देवा तू तीला सदा सुखी राहुदे
वाटलंच तर काही सुखं मला तू कमी दे
तिच्या जीवनाला मात्र पूर्ण तू गती दे

मला जरी तू दिल्या धारा अश्रूच्या
बहिणीला मात्र माझ्या वारा दे सुखाचा
लाडकी बहीण माझी आली आली बघा
घेऊन अक्षीदं थाळी थाळी बघा

लाडकी बहीण माझी आली आली बघा
घेऊन अक्षीदं थाळी थाळी बघा
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
 ==* विसरभोळे मन हे माझे *==

विसरभोळे मन हे माझे तुला गं विसरत नाही
तू न येता स्वप्नात माझ्या गप्प निजतही नाही
विसरुन तुला जगने म्हणतो पण जगवत नाही
रडवून तुला गं हसणे माझे मज हसवतही नाही

हरवली तू दूर कुठे गं शोध घेतला सगळीकडे
विरह प्रेमाचा जीवं घेणा हा ये ना परतून सखे
दुराव्याचे दिवस रात्र हे काटल्या कटत नाही
हास्य आता या ओठांवर फुलता फुलतही नाही

प्रिये एकदा परतुनी ये तू उणीवं सारखी भासते
वाट एकांती बघता बघता जगण्या भीती वाटते
हात तू माझा अर्ध्या वाटी सोडून कशाला गेली
प्रवास पुढला एकट्याने हा केल्या जातही नाही
------------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
== * आरक्षण * ==

आरक्षणाच्या नावाखाली पोळी शिजते
याचे त्याचे भले कुणाचे स्वार्थच दिसते
आम्हा हवा आरक्षण, होतो हो हल्ला
गाढवांचा राज्य आता, कल्लाच कल्ला

भोगाचे भोग नशीबी भोगतच जावे
बसवूनी खांद्यावरती भिजवून घ्यावे
रडून तुमचे काही आता होणार नाही
आली अंगावरती तर शिंगावर घ्यावे

आहे दम तर उभे होवुनी बघा दमाने
तुमचेच आहे राज्य व्हा तय्यार जोमाने
भिकाळ मांजरीवानी का दडून बसता
जागे व्हा आणि घ्या अधिकार हक्काने

युवा शक्ती भाग्य बदलती वेळ आली
जागे व्हा तुम्ही जागे व्हा पहाट झाली
गप्प बसुनी भले कुणाचे झाले आहे
हक्कासाठी उठा तरुणहो पहाट झाली
--------------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
 ==* पोळा *==

तान्हं तान्हं बाळ माझं आला तान्हा पोळा
घेऊन आनंद किती आला हा सोहळा--2–

दोन कापडी नवी नंदिहि नवा नवा
छोटुल्या चेहऱ्यावर आनंद हवा हवा
त्याच्या सुखासाठी मी करतो मरा मरा
घेऊन आनंद किती आला हा सोहळा

तान्हं तान्हं --------

मिरवन तो गावभर घेऊन त्याचा नंदी
मिळल काहि पैसे म्हणून तोहि आनंदी
त्याच्यासाठी करतो मी गोळ शंकर पाळा
घेऊन आनंद किती आला हा सोहळा

तान्हं तान्हं --------

दरवर्षी आतुरता त्याला या सनाची
नवी कापड़ी अनं नव्याचं नंदीची
आता मीही लागली तयारीला पुढच्या
घेऊन आनंद किती येतो हा सोहळा

तान्हं तान्हं बाळ माझं झाला तान्हा पोळा
घेऊन आनंद किती येतो हा सोहळा--2–
-------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
 ==* भ्रुणहत्या *==

घेऊ द्या जन्म तीला का असं करता
नाजुकश्या कळीला कोमेजुन मारता
हसु द्या खेडु द्या तिलापण जगु द्या
सुंदर अशी धरणी तिलापण पाहू द्या

नाव करेल जगात मान वाकवणार नाही
लक्ष्मीचं एक रूप ते सतावणार नाही
जपून सर्व स्वप्नं सांभाळून जगेल ती
घराला हो तुमच्या घरपणच देईल ती

मुलगा हवा म्हणून मुलींना मारायचे
घेण्यापूर्वीच जन्म जीवन संपवायचे
जागा शहाण्यांनो कुठल्या युगी जगता
निसर्गाचे नियम कशाला हो मोडता

नर नारी दोन्ही हवे आनंदी संसारासाठी
घरातच स्वर्गलोक घडवूया दोघांसाठी
सांगा मला खरं भ्रूणहत्या का करता
मुलगा नी मुलगीचा भेदभाव का करता
------------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
==* आठवण तुझी *==

रात्री झोपतांना सकाळी उठतांना
व्याकुळ करून जाते ती
आठवण तुझी

दुपारी हसतांना संध्याकाळी रडतांना

सतावते मला ती
आठवण तुझी

दूर तू जातांना राहल्या त्या वाटांना
डोळ्यासमोर उभारते ती
आठवण तुझी

नजर तू फेरतांना लपून तू बघतांना
दाखवते मला ती
आठवण तुझी

थकलेल्या आशांना प्रेमाच्या अश्रुंना
रडवून जाते ती
आठवण तुझी

विचारी स्वप्नांना एकांती जगन्याला
सतत डसते ती
आठवण तुझी

रोजचं मरतांना दुःखात रडतांना
जगणं कठिन करते ती
आठवण तुझी

आठवणीच्या दिसांना आठवणीच्या रात्रींना
आठवून जगते ती
आठवण तुझी

* आठवण तुझी *
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
==* तुझविन सखे *==

तुझविन सखे जगावे हे जगने
तुझविन सखे जगवेना मला हे
तुझविन सखे स्वप्न मी हि बघावे
तुझविन सखे स्वप्न सारे अधुरे

तुझविन सखे एकांती हे जगने
तुझविन सखे खोटे माझे हे हसने
तुझविन सखे परतुनी वाटेवरी त्या
तुझविन सखे एकांती माझे हे रडणे

तुझविन सखे पावसाच्या सरी त्या
तुझविन सखे एकटे माझे भिजने
तुझविन सखे 'शशी' एकटा हा
तुझविन सखे माझे बेअर्थी जगने
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
==* माती *==

भिजल्या अंगाने दूध पाजत
अंकुरल्या बिजा श्वास घालते
प्रेमाने हात फिरवित बाळाला
कुशीत घेऊन शांत नीजते

अंगावर वखर नागरटिचे घाव
यूरियाने तिचं जिव गुद्मरते
फवारणी कितीतरी औषधांची
दररोज मरन्यास भाग पड़ते

स्वार्थापाई सर्वांनी छडले तिला
ती गुमान आपला धर्म पाडते
अशी लाखमोलाची ती माती
पोरांच्या पोटासाठी धड़पड़ते

स्वार्थ न मोलतोल कसला मनी
निस्वार्थ मनाने ती अन्न उगवते
आई म्हणवत्या याच मातीला
आजकाल पोरं पैशात तोलते
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
==* शब्द माझे *==

शब्दांना भावार्थ न येता
ओढ़ कवितेची हरली
एकांती ही जीवनगाथा
मनी शब्दावली सरली

शोधतो अंतरमनात मी
हरवलेले शब्द सारे
वाहतील परत एकदा ते
शब्दांचे थंडगार वारे

दुरावून बसले जरी का
शब्द ते भाव मांडणारे
येतिल परतुन जीवनी
नऊरस प्रेमगीत गाणारे

विश्वास नशिबाचा नाही
शब्दांचीच हमी आहे
एकट्या जीवनी माझ्या
शब्दांचीच साथ आहे
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
==* पहिला पाऊस *==

थेंब आशेचा दिलास्याचा
थेंब पहिल्या पावसाचा
हसती फूलं डोलत्या फांद्या
संगीत भिजल्या पानांचा

आनंदाश्रु नयनी तयाच्या
आभार मानतो शेतकरी
पांग फेडले जन्माचे जणू
हरिनाम जपती वारकरी

धावतो चिखल उडवत
भिजल्या अंगाने लेकरु
खुट्या बांधली माय म्हणे
कार्ट्याचे तरी काय करू
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
==* धीर *==

असेलही चुकलं कधी कुणाचं
त्यास माझा नकार नाही
आज पण तो काळ लोटला
छंद मला खुनाचा नाही

विसरण्याचे विसरले तुम्ही ना
दुःख तरी जे सोसले नाही
काय कमी ते आज सांगावे
हक्क कोणते फेडले नाही

दिली तरी आज बाजूची खुर्ची
तुम्हा ती ही पचवत नाही
कुत्र्याची जणू जात बनविली
सुधारण्याचे नावच नाही

रडणं धडणं ते सारखं तुमचं
वैताग हा नुसता सहवत नाही
एकदाच घ्या करून निर्णय
फालतूपणा हा बघवत नाही

बोट दिला तर हात मागता
इतके ही आम्ही मूर्ख नाही
करा सारखी मनाची तुमच्या
पण धीर आमचा खेळ नाही

पण धीर आमचा खेळ नाही
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
==* शब्द माझे *==

शब्दांची रांग उभी करुण
त्यांची ही स्पर्धा करावी
सुख दुःख, न्याय अन्याय
यांनी ही विचार मांडावी

काही जातिवंत शब्दांसवे
धर्मशब्दाने भांडावं
देशातील प्रत्येक शब्दाने
शत्रुशब्दांशी लढावं

शब्द ही आज ओळखिचे
चिन्ह होऊन राहिले
या नी त्या पंथाचा म्हणून
शब्द हे मिरवू लागले

शब्दांची मोहक जादूगरी
अचानक कर्कश झाली
शब्दांच्या घातक वाराने
आपुलकीच मरू लागली

शब्दांच्या घातक वाराने
आपुलकीच मरु लागली
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
==* प्राणज्योत *==

आठवणी जाळतांना तुझ्या
काळीज ही पेटत होते
पेटतांना एक एक कागद
गेले दिवस आठवत होते

वेळ का ओढवली अशी ही
प्रेम हे मिटवावे लागले
तू नसतांना ही जगनारा मी
तुलाच विसरावे लागले

घट्ट धरून मलाच मनाला
मग समजवावे लागले
एक एक आठवणी जाळतांना
मलाही जळावे लागले

काय व्हायचे काय हे झाले
वाहले कसे प्रेम वारे
काल पर्यन्त जपले प्रेम जे
अचानकच राख झाले

नाती गोती सर्व जपतांना
मिच विझविली प्रेमज्योत
असेच जगने जगावे आता
जळे पर्यन्त ही प्राणज्योत
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
==* सांग देवा *==

सांग देवा सांग तू रे
खेळ कसा मांडला
माझ्या रे डोळ्यातूनी
थेंब कसा सांडला

का छड़तो तू असा रे
काय केला मी गुन्हा
विसरावे जाहले जे
आठवे पुन्हा पुन्हा

नराधमानी केले चिंधोळे
नाजुकस्या इज्जतीचे
रडली ती अनं ओरडली
फाडले वस्त्र द्रोपदीचे

हा कसला न्याय तुझा रे
पैसा फेकून न्याय इथे
अन्यायावर जोर नाही
अनं दडून बसला तू कुठे

नको मला आधार तुझा रे
प्रेम माझा तू हिरावला
प्रेम केले मी अनं तिनेही
घात हा तू का घडवला

कापले न का जिव तुझे रे
नाजुकसी तर होती ती
प्रेमाचे रे कसले देने
फेडत बसलो मी अनं ती

देवा कुठे तू दिसे मला न
सांग काय आमचा गुन्हा
का दिला तू घाव असा रे
आठवतो तो पुन्हा पुन्हा

आठवतो तो पुन्हा पुन्हा
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
==* बापाचं रक्त *==

(बापाच्या जीवाची आग, त्याचं रक्त पाणी)

जाणीव आज झाली स्वप्नांच्या वास्तवाची
चिंगारी आग झाली विझलेल्या विस्तवाची

उगाच बांधिले मी स्वप्नांचे हे मनोरे
तुटायचेच होते आपुलकीचे घरटे
प्रेमाच्या पावसाने सिंचन मी ही केले
वेळेवर ते निघाले अंकुर सारे परके

गुंतलो मी होतो माझ्याच त्या विचारी
लुटवून जाहलो मी श्रीमंतचा भिकारी
चिड़तो राग येतो माझाच आता मजला
जोडले मी हे नाते खोटेच का कुनाशी

विश्वास ही रुसला रक्ताचा आता माझ्या
अनं मीच माझी केली तिरडीची तयारी
कुणाच्या खांद्याचा मी करू आता भरोसा
माझाच रक्त आता माझ्यात बाकी नाही

जाणीव आज झाली रुसलेल्या आसवांची
तिरडी ही निघाली जपलेल्या भावनांची
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
==* शब्द माझे *==

शब्दांना पंख नाही
जगभर उड़ले काही
भावनेला आरसा नाही
शब्दात पेरले काही

याचे त्याचे कुणाचे
विचार मांडले काही
माणसाचे हाल बघता
निशब्द झाले काही

शब्दात स्वातंत्र्य लिहिता
शब्दात धार नाही
शब्दातूनी विरह आक्रोश
शब्दात प्रेम नाही

कसले सुख नी  दुःख
कटूच सत्य काही
शब्दात विचार लिहितो
शब्दात भेद नाही
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
==* यालाच का प्रेम म्हणावं * ==

प्रेम म्हणून फक्त प्रेम करावं
अनं मनावरच आघात व्हावं
दोन दिसाचे पुसटसे स्वप्न
अनं विरह नशिबी भेट मिळावं

सात जन्माची आस बांधूनी
क्षणातच स्वप्नभंग व्हावं
जाती धर्माची हि बांधिलकी
अनं नाजूक मन मोडल्या जावं

जगभराचे जपून स्नेहबंध
स्वप्नांनाही ग्रहण लागावं
मन मारून दोघांनी जगावे
अनं एकांती मरण मिळावं

यालाच का हो प्रेम म्हणावं
कधी न हसता रडतच जावं
जगभराचा विचार करावं
अनं मी हि प्रेमाला मुकावं

हि कसली प्रेमाची परिभाषा ???????
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
==* ओंजळ *==

ओंजळ रिकामी पाणी नाही रक्त
कुपोषण आलं नशिबाला फ़क्त
हिरवं रान वाळून झालो भिकारी
शब्द अबोले भावना अव्यक्त

दैना सांगता संगी सात बारा
लिहितो साहेब हा घात सारा
तुटकी चप्पल फाटकेचं वस्त्र
सांगा कुणी केला हा खेळ सारा

नापिकी पैसा जातो कुण्या वाटी
स्वप्नही न पिकती या झाड़ाला
राजकारणाचे हे दोहरे मापदंड
बघा खेळ सारा जीवनाचा झाला

भाकरदार झाला भाकरी अपुरा
दूध कुणाचं पेती चोर सारा
कुना दोष देऊ तेही कळेना
खरच मी आहे नशिबाचा मारा
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
स्वप्न बघूनही पूर्ण होणार नसेल तर स्वप्न दिसावे का ?
विरह जर नशिबी यावे तर प्रेम व्हायचे कारण का ?

==* मी नाही दुखी *==

दुःख नाही
की तू माझ्या नाशिबी नाही
दुखी तू हो
तुझ्या नशिबी माझं प्रेम नाही

केली खुप
प्रार्थना तुझं प्रेम मिळवाया
तूच वेडी
दिली न साद तू या प्रेमाला

का भटकू
जेव्हा तुला कळेना भाव माझे
सहज केले
तुकडे माझ्या नाजुक मनाचे

जा हस तू
खुशाल हसऱ्या जीवनाशी
मी रडतो
नशिबी आलेल्या दुखाशी

नको मला
खोटा दिलासा साथ खोटी
जगतो मी
एकटा फोडत नशिबी गोटी
--------------/**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्र.९९७५९९५४५०
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
==* अन्नदाता *==

अन्नदाता उपाशी
बाकी सर्व तुपाशी
मरतो का शेतकरी
त्याचा वैर कुनाशी

मन हसावं त्याचंही
पोट त्याचं कुपाशी
सर्वांना अन्न देऊन
चित्त त्याचं विचारी

विचार करून खर्चा
तो सदा होतो दुखी
दुष्काळ ओला सुखा
त्याच्या हो नशिबी

दावे बघा मोठी मोठी
पडती नेहमीच खोटी
शेतकऱ्याला मिळावी
माणूस अनं माणुसकी
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
==* काय करावं शेतकऱ्याने *==

काय करावं शेतकऱ्याने
त्याला उपाय काय
नोचती लांडगे वाट्याने
त्याला सुरक्षा काय

नेत्यांची बकबक गोडीची
पण कराया काय
संतापुन मेलाही शेतकरी
मग रडून काय

कापूस पिकवूनही फाटका
प्रश्नाचं उत्तर काय
अन्न पिकवूनही उपाशीच
जगण्या आधार काय
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
==* हिंदुस्थान *==

कसला हो हिन्दुस्थान
उगाच आरडा ओरड
दिसे ना मला हिंदुत्व
सर्व वर्चस्वाची होड़

जग कुठे संपन्न होता
नवं शोधत आहे
भारत जाती धर्माचेच
ढोल पीटत आहे

काय हवं जगायला
अन्न की रक्त कुणाचं
रोज सालं तेच ते
तू हिन्दू तू मुस्लिमाचं

धर्म म्हणून काय तर
जातितही शांती नाही
जगायला म्हणून इथे
सारखं आरक्षण नाही

मारून टाका एकमेकांना
उगा भांडण कशाला
कुत्र्यांसारखं जागेचा हट्ट
पूरल पैसा मसनाला
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
==* प्रेम, प्रेम कि आकर्षण *==

प्रेम, प्रेम कि आकर्षण ?
कि क्षणिक हृदय घर्षण ?
अ जान नव्याच चेहऱ्यास
कसले जीवन अर्पण ???

स्वभाव अ जान विचार नवे
प्रेमाचा आधार ठरवायचे कसे ?
धडधडत्या मनाची आवाज
बांधील जीवन कि अधुरी वाट ?

प्रेम, प्रेम कि चकवा ?
नजरेचा खेळ कि धोका ?
शब्दात परिभाषा प्रेमाची
येईल का हो लिहिता ???

वास्तविकता कळेला ढकलुन
प्रेमार्थ तरी जाणून घ्यायचे कसे ?
जगाशी लढुन जिंकनारे प्रेम हे
अर्थबद्ध की फ़क्त अळीच अक्षरे?

प्रेम, प्रेम की मजाक?
की जगण्याचा ध्यास?
जपन्या सर्व जबाबदारी
करता येतो का अभ्यास???

स्वप्न, व्याकुळता, विरह, भेट
प्रेमाला वरदान मिळणार कसे ?
विरह, दुःखही प्रेमाचे निशान
हर्ष आनंद की मिळते मृत्युदान ?

प्रेम, प्रेम की अभिशाप ?
राजयोग की वनवास ?
सुख कमी दुःख जास्त
कसं होईल मोजमाप ???
प्रेम,
म्हणजे निस्वार्थ भक्ती
वचनबद्ध शेवटचा शब्द
असहनीय अग्नीपरीक्षा
खऱ्या प्रेमाची खरी तपस्या
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
==* अंत करतो कवितेचा *==

अंत करतो कवितेचा कवितेने
शब्द संपवतो शेवट शब्दाने
भाग्य इतकंच असेल कवितेचं
जनु भाग्यच लोहितो हाताने

बंध नाही कसला दुरावा घेतो
भावनांना शब्दानेच निरोप देतो
मुर्दा पड़लाय अंगणी माझ्या
भिजल्या डोळ्यांनी अग्नी देतो

झालं तर भेटु शब्दांसवे नव्या
आठवणी असतील जुन्या
वेळेची गरज भाग्याची मर्जी
जातो आता नशिबाचे देण्या
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
==* प्रेमाच्या गावी जाऊ *==

तू चल प्रेमाच्या गावी
दुःख घेऊनी येऊ
हसण्या मोह न उरला
हसुच देऊनी येऊ

खोटेच हसने असले
मज जमणारही नाही
असह्य आता जगने
जगने देऊनि येऊ

प्रेमाला हरवुनी बसलो
मग अर्थ काय देहाला
हेच भाग्य जर लिहिले
भाग्य परतुनी येऊ
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
==* माणसाने माणसाचा घात केला *==

माणसाने माणसाचा घात केला
स्वार्थाने कसला अपघात झाला
मारू लागला माणूस माणसाला
मानुसपणाचाच वैताग आला

कुणाचे कुणाशी अडले म्हणून
बघा पायखेच खेळ सुरु झाला
बोलूच नये सार्वजनिक कधी
सत्यानेच सत्याचा घोळ झाला

जगभराचे पाप मनी साठवून
खरा खोटा सारखाच दिखावा
कुत्र्यागत वर्चस्वाची भांडणं
बळी पडले स्वार्थी वर्चस्वाला

दोन वेळच्या खाल्ल्याने भागेना
इथे पैसाही खायचा पान झाला
वाढवून वाढवून व्यर्थचेच खर्च
भागवाया माणूस राक्षस झाला

भागवाया माणूस राक्षस झाला
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
==* सांझ वेळी *==

सांझ वेळी सागरा किनारी
चल फिरायाला जाऊ
हात हाती तुझा गं माझ्या
उगवते चंद्र तारे पाहू

तू हसशी लाजून जराशी
मी मग छेडिन तुला
आठवणींचा साठा थोडा
आठवणीला ठेऊ

तू नी मी जणू प्रेमपाखरू
दोघे फिरकू जरासे
गंध प्रेमाचा आसमानी
मिळुनी आनंद घेऊ
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
==* आठवण तुझी *==

आसवांच्या सागरात वाहून आली
आठवण तुझी
मनाच्या गाभाऱ्यात साठवलेली
आठवण तुझी

नको तू मला मी जपतोय आजही
आठवण तुझी
मी कोण तुझा तरी भेटीत मिळाली
आठवण तुझी

भेट कधी काळी देऊन टाकेन मी
आठवण तुझी
एकट्याचे जगणे का वागवु उगाच
आठवण तुझी

खुश रहा त्या फुलांसवे मला काटेरी
आठवण तुझी
जा गं बया घेऊनी जा तू नकोशी मला
आठवण तुझी
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
==* बदल काही दे रे *==

देवा मला नको तू रे नको तू रे पाऊ
हर्ष नको आनंद नको सुख नको दाऊ

मी न आलो दारी तुझ्या काही नको वाहू
मला नको तुझी दया तू राग नको पाहू

जे येती दारी तुझ्या त्यांना सुख दे रे
जे मानती दगड देवं त्यांना हर्ष दे रे

नको देऊ सोनं नाणं भाकर दोन दे रे
कसे जगतीलं प्रेमानं शहानपणं दे रे

मी रे नास्तिकच बरा मला देवं नको
गरिबांचे दुःख बघून असा हसू नको

लोकं म्हणती तू आहे या संसारातं
मला सांग होतो कसा मग हा अन्यायं

मला नाही बोलायाचं तू तुझं बघून घे रे
बघवे मला न आता बदल काही दे रे

बघवे मला न आता बदल काही दे रे
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
==* मला का सतावते *==

तू अशी तू तशी कशी कळेना
माझी कि कुणाची काही सुचेना

वाटतं तू माझी खरं का वाटेना
कि दुसऱ्याची विश्वास बसेना

बोलणे तुझे ते मनी दाटलेले
रूप चंद्राचे तुझे भोळे सावळेसे

छळते मला का तुझे वागणे ते
जगणे एकांती जगवे ना मला हे

आतुर मन भेटाया तू का नाकारते
जगाची भीती मनी मला सतावते

जगाची भीती मनी मला सतावते
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
==* शहाणे *==

माय ती माय बोलूही शकेना
बापाचं मुलांना काही पटेना
सोडा शहाण्यांना वाऱ्यावर
जोवरी यांना अद्दल घडेना

कुठे गेली सहनशीलता ती
मोठ्याचं मत का पटेना
आई बापाची काळजी किती
डोळ्यांनी या का दिसेना

रागावून काहीच बोलू नका
यांना अत्याचारच भासते
घरचे किती सांगतील तरी
बाहेरचं जगच छान वाटते

नेहमी हट्टपणा का पुरवावा
प्रत्येक गोष्टीचे हवे परवाने
स्वतःचेच विचार मानती श्रेष्ठ
मोठयांचे विचारच पुराणे
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
==* कारे सोन्या *==

कारे सोन्या करतो तू
जीवाच्या चिंधोळ्या
गुटखा तंबाखू खाऊन
दिसतो तू सोंगाळ्या

कळतं का रे दारूचा
शोक नाही हा बरा
वाटे जरी सुंदर सारं
याचा नाही नेम खरा

कधी घेई जीव कुणाचं
व्यसन कुण्या कामाचा
मुलं बाळं तुझे उपाशी
खेळ सारा हा पैशाचा
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
==* रात्र माझी एकटी *==

रात्र माझी एकटी
मी एकटा रात्रीचा
काळाकुट्ट अंधार
रोजच्या रात्रीचा

विचारांचा थैमान
एकटेपणाने हैराण
कोण संग सोबती
मोकळं सारं रान

या कळी त्या कळी
कळ पलटत किती
विचार सरता सरेना
रात्र सरून जाती

जेवलो तरी जेवणात
समाधानहि मिळेना
प्रेमाने भरवाया आता
कोणते हातहि वळेना

रात्र माझी एकटी हि
माझ्यासंगीच जगली
मिठीत घेऊन आजही
माझीच रात्र निजली
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
==* समजणारे *==

बळीराजा ए बळीराजा
कसं म्हणाव मेळ
तुयं काऊन जगणं असं
कोणाचं होय खेळ

काऊन तू मरून रायला
तुले समजत नाय
तुया मेल्यावर पोरायच्या
जगाले का उपाय

तू लटकशील झाडावर
फायदा तरी काय
तुया मागं रडत करण
सरकारची हाय हाय

पयले बी तं किती मेले
फरक पडला काय
अजून तु बी गेला तरी
लोकं सुधरणार नाय
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
==* मी अशीच एक *== 

मि जरा अशीच हळविशी
समजून न येणारी
सर्व दुःख मनात साठवून
हसतच जगणारी

कुणाचे दुःख बघवेना मला
सर्व नाते जपणारी
मी का अशी मलाच कळेना
का अशी वेडीसी

घरची बाहेरची माणसे आपली
म्हणून मानणारी
हसवून इतरांना हसते सदैवं
प्रेमाला जाणणारी

मी अशी तशी आहेच अशी
एकट्यात रडणारी
जगाची पर्वा डोक्यात भरून
सर्वांना हसवणारी
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
==* माणूस *==

कोण जाणतं कुणाचं दुःख
दाखवाया दाखवल्या जातं
मरत्याला वाचवलं कधीना
देखाव्याचं ओरडल्या जातं

झाला स्वार्थी हरेक माणूस
स्वार्थ मनी साठवल्या जातं
याचं त्याचं कुणी कुणाचं
वाईटपणा उखरल्या जातं

बोली लावण्या करा तयारी
माणूसपणहि विकल्या जातं
बाहेरच्यांची गरज कशाला
आपलं रक्त नासवल्या जातं

तो वैरी कि मीच वैरी माझा
विश्वास का उठवल्या जातं
ठाव ठिकाण काही आहे का
जिथं माणूस बनवल्या जातं
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
=* ती सावित्रीबाई*=

जी स्त्रीशक्ती उभारून
अडचणी मागे सारून
जगली लढली जिंकली
ती सावित्रीबाई

कुणाशी वैर न मानता
शेनही अंगावर घेतले
पुस्तक पाटी सावरली
ती सावित्रीबाई

किती तिची ख्याती सांगू
निशब्द माझे शब्द सदा
सर्वांची जी आदर्श ठरली
ती सावित्रीबाई
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
==*  अखेरचा श्वास *==

आज अखेरचा श्वास माझा
उद्या नवा वर्ष प्रेमाचा
सरले दिवस जात्या वर्षाचे
स्वागत नव्या वर्षाचा

नवेच घेऊन स्वप्न उराशी
नवेच काही जगणे आता
ध्येय नवे ठरवुनी म्हणतो
पकडाव्या नव्याच वाटा

झाले भले बुरे व्हायचे होते
जगवू मनी नव्याच आशा
आतुर मी उद्याच्या सकाळी
आज अखेरचा श्वास माझा

आज अखेरचा श्वास माझा
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
==* मला हवा तो श्वास मोकळा *==

प्रेमरीत अपुली हि अपुले स्वाभिमान जपावे
या भारताचे एकरूप सदैवं टिकून रहावे
काय घेणे देणे याचे त्याचे करून गऱ्हाणे
मला हवा तो श्वास मोकळा गोंडस शब्दाने

मीही माणूस तुही माणूस यात मरणे जगणे
हसणे रडणे नेहमीच हो कुणाचे डोळे पुसणे
मी नाही मधला तयांच्या वाटोळे ज्यांनी केले
मला हवा तो श्वास मोकळा सर्वांच्या संगतीने

काय नेणे काय आणने जन्म मृत्यू हो येता
इथेच जगणे इथेच मरणे कोण करता करविता
माझी कविता माझे गाणे भिजलेले आसवाने
मला हवा तो श्वास मोकळा प्रेमाच्या अंशाने
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
==* कसले माझे जगने *==

मी नाजुकसी जरा, साधे माझे वागने
दुःख सोसुन जगते, खोटं माझं हसने
सांगू कसे कुणाला वेदना या मनाच्या
नशीबाचे देने हे, कसले माझे जगने

स्वप्न पाहते मीही, हसन्याचे जरासे
स्वप्नातच हे माझे स्वप्नातले हसने
वाटे उडावं मीही वाऱ्यासवे आसमानी
स्वप्नातच हे माझे आसमानी उड़ने

बदलू कसे मी आता या भाग्याच्या रेषा
हे भाग्य नाशिबाने दिले मला कसले
घेऊन दुःख ओठी जगते आजही मी
जर हेच भाग्य माझे नको मला हे जगने
नको मला हे जगने
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
==* सांग प्रिये *==

सांग प्रिये
सांग प्रिये तुझ्या कपाळी हे कुंकु कुणाचं
तू तर माझं प्रेम मग मंगळसूत्र कुणाचं
आठवणीचे सरून दिवस काळोख्या राती
विरहाच्या दारी दोघांमधुनी पाय कुणाचं

सांग प्रिये
सांग प्रिये तू दुरावली ते दोष कुणाचं
नशिबी आल्या भाग्यावर जोर कुणाचं
जानवले ना कधी तुला गं भाव मनाचे
संगतीने बघितलेलं मग स्वप्न कुणाचं

सांग प्रिये
सांग प्रिये माझ्यासंगी हसणं कुणाचं
आठवणीत माझं चिडणं ते राग कुणाचं
सरता सरले दिवस कसे गेले संगतीचेे
रोजचं आता तुझ्याविना मरणं कुणाचं

रोजचं आता तुझ्याविना मरणं कुणाचं
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
==* चार दिसाची आठवण *==

चार दिसाची आठवण व्याकुळ करे मना
चारच दिसांचा विचार रात्र सरून जाते

काय नातं तुझं नी माझं विचार येई मना
अनं कोण तू माझी प्रश्न पडून जाते

अनोडखा दुरावा हा संपावा तरी जरासा
तुला गमावण्याची सारखी भीती वाटे

नको होऊ तू माझी स्वप्न पडला उगा हा
दिवस रात्र आठवण तुझाच वेड लागे
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
==* व्यथा त्याची *==

शब्द शब्द म्हणती
ऐका त्याची व्यथा
गळ्यात फास घेतो
बळीराजा रे माझा

मर मर करतो शेती
त्याची चिंता कुणा
नापिकी ना दुष्काळ
लोकांना दिसे नफा

कुठं सांगावी त्याने
त्याची दयनी कथा
रोजचं थोडं मरून
रोजचं जगतो थोडा

व्यथा त्याची व्यथा
सर्वांनाच वाटते मजा
मनाने घायाळ बेचारा
कसली देवा हि सजा
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
==* कुणी असावी *==

कुणी असावी परीसारखी
रुपेरी चांदण्यासारखी
भाव चेहऱ्यावर गोंडस
सुंदर राजकन्येसारखी

असावी ती जगावेगळी
सखी ती माझी असावी
अशी असावी तशी असावी
काय ठाऊक कशी असावी

गुलाबाच्या पंखुडीसारखी
मोगऱ्याच्या सुवासासारखी
असावी ती जरा वेळी खुळी
चंचल फुलपाखरासारखी
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
==* हाण देवा *==

हाण पुन्हा हाण देवा हाण पुन्हा हाण
माह्या नशीबी तू फ़क्त दुःखच आन
मन भरे तुव्हा तोवरी वाकव ही मान
हाण पुन्हा हाण देवा हाण पुन्हा हाण

मी ही बघतो अंत या जीवाची आन
तुह्या माहयातली कर दुश्मनी महान
मी रे माही हाणतो तूबी तुहीच हाण
हाण पुन्हा हाण देवा हाण पुन्हा हाण

तू माह्या वैरी मीही तुह्या वैरीच जान
आता तू का मी बघू होऊदे घमासान
मीच जिंकेन माह्या जीवनाची शान
हाण पुन्हा हाण देवा हाण पुन्हा हाण
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
==* का कुणी *==

का कुणी यावे जिवनातं
का कुणी रडवावे प्रेमातं
हसणारे क्षण रुसले बघा हे
का कुणी तळपावे मनातं

आंधळी वाटं अंधार जीवन
का कुणा विसरावे विरहातं
प्रेमसागराचा दूर हां किनारा
का कुणी मिरवावे हर्षातं

जीवनाचे दुःख सरता न सरे
का कुणी स्वप्नवावे जिवनातं
आशा आकांशा मोड़की निघे
का कुणी जगावे आठवणीतं
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
==* अरे गाढवा *==

छेडू नको रे छेडू नको
अंत तू माझे पाहू नको
बोलत मी नाही म्हणून
व्यर्थचेच तू भांडू नको

दिला हक्क तुलाही मी
उगाच माज आणु नको
फाटक्याचे नवे कपडे
घालताच तू माजु नको

काय खरं काय खोटं
शहाणपण सांगू नको
बुद्धि आहेरे मलाही
तू मला शिकवू नको

कळतं मला चुक काय
चूक कुणाची दाऊ नको
मीच तुला शिकवित आलो
जगनं मला शिकवू नको
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
==* तुळशी विवाह *==

करा करा हो तयारी, तुम्ही आता लग्नाची
आली आलीया घडी, जोडू साथ जन्माची
झाले तुळशीचे लगनं, एक मंडप सजवा
लग्न करुन जीवनं, पाड़ी प्रेमाने नांदन्याची

झाली धाव पडं सुरु, मग मुलगा शोधाया
आई बापाची लाड़की, आता सासर जाईलं
दिसे बापाची काळजी, चेहऱ्यावरं त्याच्या
कसं मुलीचं लगनं हसी खुशीतं होईलं

कुठं सजल मुलगा, बसून जाई घोड्यावरं
लक्ष्मीच्या रूपानं सुनं, येईलं या घरातं
माझ्या मुली सारखीच, मला मिळेल का सुनं
की तिचं आणि माझं, सारखं भांडणं होईलं

आशा आकांशाची रूतं, बहरुनी आली
मोठ्या मनाने देऊया, वधु वरा आशीर्वादं
माय बापाच्या लाडक्या, लेकरांची स्वप्नं
पुरवित आले घेऊन, दुःख ओढवतं
करा करा हो तयारी
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
==* शाळा कुणाची *==

शाळा शाळा कुणाची
मुलींची कि मुलांची
मूली नाही शाळेला
शाळा नाही मुलींची

आई बाप ते अडानी
डोकं त्याचं भूतानी
कळत नाहि तयांना
किर्ती काय मुलींची

आज काल नंबरं
आनती त्या मुलीचं
पाहुन तरी पाठवेना
मुलीला का शाळेतं

कसे वेडे माय बाप
अक्लीने रिकामं
मूली म्हणे लक्षमी
तरी घरात बांधुनं

केव्हा होईल उजेडं
मुलींच्या जीवनी
लाभेल का तयांना
शिक्षेची शिदोरी

अरे समजा लेकंहो
एकविसवि सदी ही
मुलीच्याच नात्याने
जीवनाला संजीवनी

आता शाळा कुणाची
मुलींची कि मुलांची
मूली जाईल शाळेला
मुलगी तुमची गुणाची
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
 ==* आंधळीच माणसे आंधळ्याच वाटा *==

आंधळीच माणसे आंधळ्याच वाटा
पोटापाई मरतो हा कसा अन्नदाता
जगवे ना जगणे त्याचे कसलाहो भरोसा
आंधळीच माणसे आंधळ्याच वाटा

मदत कुणाची त्याला साथ कुणाचा
लागला हा डाग बघा शेती खुनाचा
काय नशिबी त्याच्या पाप कुणाचा
आंधळीच माणसे आंधळ्याच वाटा

मुलं बाळं याचे उपाशी बायको विचारा
विनाशाचा देवा केला कसलारे इशारा
बघुनिया वेदना या भरला रे गळा हा
आंधळीच माणसे आंधळ्याच वाटा

किती तरी करतो मेहनत भाव न कशाला
म्हणूनिया घेतो कंठी हारुन विषाला
काय दोष देवा याचा कसला रे अन्याय
आंधळीच माणसे आंधळ्याच वाटा

कर काही किरपा तू आता बळीराजा
अंत नको पाहू देवा आता गरीबाचा
तुझ्या चरणी घेऊन आलो एकटीच आशा
आंधळीच माणसे आंधळ्याच वाटा

आंधळीच माणसे आंधळ्याच वाटा
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
==* प्रेम गंध *==

जीवनी का आली
घेउनं  नवी आशा
तू सोबत नसली
मनी दाटते निराशा

आतुर मनी स्पंदने
कशी कळेल भाषा
ओढ सहवासाची
नभी चंद्र सजलासा

दे साथ जीवनाची
उरलंय कोण आता
दोर सात जन्माची
जोड नातं जरासा

मांडले तुला बघुनी
सार शब्द मनाचा
हळूच चल साजनी
गंध पसरू प्रेमाचा
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
==* गरिबी *==

गरीबाची गरिबी जीवघेणी
श्रीमंताची सदा तूप लोणी
दयनीय अवस्था गरीबाची
भाकर मिळेना दोन वेळी

गाडी चढे रसत्यावर श्रीची
गरीबच पिळो वेळोवेळी
ब्रेकिंग न्यूज चाले टीवीवर
हृदयी काळजी कोण करी

रोज देती नारे गरीबी विरुध्द
गरीबालाच मिटण्याची पाडी
शेतकऱ्याची वाढली गळफास
दिसेना जमिनी हिरवी काळी

ऐकेना कुणाचीही प्रार्थना
हरवला का गरीबाचा पंढरी
मरतो बघ कसा गरीब आता
विठुरायाच्या जन्मस्थळी

नेत्यांची आस नाही देवा
हे तर सत्तेचे रे पुजारी
घेऊनि विनंती रे मी आलो
कर उद्धार गरीबाचा काही
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
==* होकार *==

सवय स्वप्न वेचण्याची
तुला हसता बघण्याची
गोजिरवाणं रूप तुझं
बघून हौस जगण्याची

चांदणे तुझ्या टिकलीत
वाऱ्यासवे केस लहरे
नयनी काजळ शोभतो
वेडे झाले मन बावरे

ऐकून हृदयाचा ठोका
आवाज देतोय सारखा
सामावून तुझ्या हृदयी
आपले म्हण तू एकदा

फार काही मी न मागता
हर्ष मागतो संगतीचा
ये प्रिये मज सोबतीने
घेऊन होकार तू आता
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
==* सांगणा सख्यारे *==

डोळ्यांनी मजला केले,
हे कसले रे इशारे
व्याकुळता या मनाची,
कसली सांगणारे

वाटे आजही वाटा,
या तस्याच सुटलेल्या
आठवणी ज्या होत्या,
त्या इथेच दाटलेल्या

येशील नदीकिनारी,
सख्या सांगणारे
भेटुनी साठवूया मग,
हे आठवणींचे वारे

आवाज दे तू मजला,
एकदाच प्रेमाने
सजवीन तुझे जीवन,
मी शुभ्र चांदण्याने
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
==* जागा हो *==

मराठी ताना मराठी बाणा
मराठी राग हाकता मोठा
लाज वाटावी बघून तुम्हाला
महाराष्ट्र प्रेम तुमचा खोटा

मोल मराठी बोल मराठी
गुरखा तुमचा अन्नदाता
काय फालतू राजक्रांती हि
परप्रांती सोहळ्यात जाता

देह मराठी रक्त मराठी
तो वाघ हरवला माझा
लालची मांजर होत राजे
राजकीय पोळी खाता

कर्म मराठी धर्म मराठी
मराठीसाठी झळ जरासा
याच्या त्याच्या पाया न पडता
रूप धर त्या सिंहाचा
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
==* माझी माती *==

भिजलेली फुललेली पिकाया सज्ज माती
खाऊ घालणारी पाळणारी माझी माती

कसे फेडू मोल हिचे हीच जीवनदाती
मरत्या क्षणी सावरणारी माझी माती

करून आत्महत्या का अपमान करू तिचा
पडत्या काळी धीर देणारी माझी माती

ती बनली माझी आई मी तिच्या घरचा दिवा
पुसले डोळ्याचे पाणी ती माझी माती

घात करे बळीराजा देत दुष्काळ ओला सुखा
रडता पाणी ओले झाडाला माझी माती

हिची व्यथा कोण जाणे जिथे अति तिथे माती
माणसांच्या अतिमुळेच रुसली माझी माती

माणसांच्या अतिमुळेच रुसली माझी माती
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
==* आजही मी *==

काय झाले ते कळेना मीच माझा हरवलेलो
वाटेत आजही तुझ्याच बघ मी थांबलेलो

सांग कधी कळल्या तुला भावना माझ्या
आठवणीचे दिवस मोजत मी जगलेलो

दुराव्याचा वारा वाहून दूर मला घेऊन गेला
त्याच किनारी आजही मी अडकलेलो

अधीर मन हे वेडे कुठले कुठे जमेना
सांझ सकाळी स्वप्न अपुरे मी बघितलेलो

आलीस तू अन गेलीस तू हरवून जणू
डोळ्यासमोरी भासवून तुला मी हसलेलो

आठवूनी मला पाहशील तू वळून जेव्हा
तुझ्याच वाटेत दिसेल मरूनी मी पडलेलो
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
==* काहि बोलायचे *==

बाहुत घेऊन तुला शब्द ओठी आणायचे
तुही भेटुनि एकदा सांग जेहि सांगायचे

तू दूर उभी साजनी जवळ कसे आणायचे
राज दडवून हृदयाचे काम कसे चालायचे

बोलणार तुगं कधी राहले जेहि बोलायचे
शब्द सजवून मलाही आहे काहि सांगायचे

सुरुवात करू प्रेमाची आपण वचन घ्यायचे
की न बोलता दिवस असे एकांती काटायचे

दे साथ आपुलकीची दिसं जोडू आठवायचे
आठवूनी तू मला कधी मी तुला शोधायचे
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
==* हिवाळा *==

अचानक वादळ आलं
पडला किती पाऊस
इतके दिवस तपता तपता
पूर्ण झाली हाऊस

वाहे गारवारा पावसासवे
हिवाळ्याची झाली चाहूल
स्वेटर काढुनि आनंद घ्यावे
घ्या जरा ब्ल्यांकेट काढून

भरली थंडी वांदे तब्येतीचे
ठेवा सोय उष्णतेची करून
काड्या आना लाकुड तोड़ा
गेले दिवस गर्मिचे सरून

आता गड़ेहो उशिरा उठावं
काय करावं लवकर उठून
उठलो तरी अंगभर शहारं
कुणा आली हुशारी भरून
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
==* तुझविन जगवत नाही *==
कवितेतील प्रत्येक चार ओळी 11 ते 7 उतार -----

विसरली असशील तू मला
पण मी विसरु शकलो नाही
चांदन्याचे रूप तुझे आजही
मनातून काढू शकलो नाही

काळही लोटला भेटण्याचा
तू अजुनही दिसली नाही
तुझ्या त्या नजर फेरण्याला
सहन करता आले नाही

जगतोय जगन्याचे मी
तुझविन रमतं नाही
मार्ग विसरण्याचा तुला
कुठेच गवसत नाही

वाटतं कधी भेटावं
मनही मानत नाही
वाटही तुझ्या घरची
कुनीच सांगत नाही

जगावे एकट्याने
जगवतही नाही
तुझविन साजनी
हसवतही नाही
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
==* सांग तू माझी होशील का ? *==

शब्द माझे स्वर तुझे गीत माझे गाशील का
शब्द माझे स्वर तुझे गीत माझे गाशील का
सांग तू माझी होशील का ?

बघता बघता दिवस गेले दिवस जाता वर्ष संपले
आता तरी मज प्रेमाला वाव तू देशील का
संगीताला शब्द माझ्या सांग तू देशील का

सांग तू माझी होशील का ?

काय सांगू कोण तू माझी प्रिय मला तू सर्वोपरी
वाट बघतो आजही तुझी सांग तुला जाणवते का
गोड्स्वर मज गीताला सांग ना आता देशील का

सांग तू माझी होशील का ?

वाटतं तुला सोबत न्यावं काहीतरी गोड बोलावं
शब्द माझे ऐकशील का सांग तू उद्या येशील का
मी बनविल्या गजलाला आलाप तू देशील का

सांग तू माझी होशील का ?

शब्द माझे स्वर तुझे गीत माझे गाशील का
रंगभूमीवर या प्रेमाच्या माझी तू होशील का
विखरलेल्या स्वप्नांना आनंदाने जपशील का

सांग तू माझी होशील का ?
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
==* चला शिकुया *==

चला शिकुया चला शिकुया
शाळेमध्ये वर्ग भरवूया
जीवनाची शिदोरी जपतांना
नवा इतिहास घडवूया

चला शिकुया चला शिकुया
शाळेमध्ये वर्ग भरवूया

छोटीशी एक पाटी घेऊन
लेखनेला धार करूया
गुरुजनांची वाचा ऐकून
ज्ञानाला वाट देऊया

चला शिकुया चला शिकुया
शाळेमध्ये वर्ग भरवूया

लहानशी ती शाळा अपुली
शब्दरंगाने रंगवूया
पटांगणाच्या गवतावरती
बुद्धीचे खेळ खेळूया

चला शिकुया चला शिकुया
शाळेमध्ये वर्ग भरवूया

हसता हसता शिक्षण घेऊन
नवा कीर्तिमान घडवूया
उंच भरारी आसमानी घेऊन
शाळेचेही नाव करूया

चला शिकुया चला शिकुया
शाळेमध्ये वर्ग भरवूया

जीवनाची शिदोरी जपतांना
नवा इतिहास घडवूया
चला शिकुया चला शिकुया
शाळेमध्ये वर्ग भरवूया
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
==* कुठं तुला शोधू *==

देहातल्या दुखाला मी
कसं देवा सांगू
तुझा काही ठाव नाही
कुठं तुला शोधू

पिडा मनातली करे
जीव कासावीसं
देवा तुझ्या दारी आलो
बदल माझे दिसं

मागत नाही खूप काही
थोडं सुख देरे
मनातल्या अधिराला
धीर जरा देरे

देहातल्या दुखाला मी
कसं देवा सांगू
तुझा काही ठाव नाही
कुठं तुला शोधू

कुठं तुला शोधू
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
==* डिजिटल इंडिया *==

आज म्हणे इंडिया डिजिटल होणार
गाव गाव आता इंटरनेट पोहचणार
उद्या करताय उद्घाटन प्रधानमंत्री
देशाचा नवाच चेहरा तयार होणार

कोण कुणाचा हा विकास करणार
नेत्यांचा हात का डोक्यावर येणार
काय ठाऊक देवा कायरे नशिबी
काय खरच माझे अच्छे दिन येणार

बहुत अच्छे नव्हे अच्छे दिनच द्यावे
देशाच्या गरिबीवर थोडं लक्ष्य पुरवावे
नको जास्त काही आम्हास जगण्याला
देणेच वाटले तर देशात शांतदिन द्यावे

दिनांक - ०१/०७/२०१५ रोजीच्या डिजिटल
इंडिया योजनेबाबत मी लिहिलेली कविता
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
==* सुध जराशी *==

चार दिसाचा पाऊस आला
हर्ष मनाला किती झाहला
झाल्या पेरणीला बघ आता
कसला देवा ग्रहण लागला

थोडं हसवून फसवून गेला
धुऱ्याचा चारा वारून गेला
बांधिल्या आशेला तोडून
शेतकऱ्यांशी तू घात केला

किती अंत पाहशी गरिबाचे
झाले अभिशाप या जीवनाचे
बळीराजा घेऊन सुध जराशी
सोडव ती गळफास कर्जाची
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
==*  ऐक जरा *==

प्रेमाच्या वेदनेत रडतोय आजही
तुझ्या विरहात जगतोय आजही
अगं जरी हे एकतर्फीच प्रेम माझं
तुझविन कसं मी जगतोय आजही

सांगू न शकलो तू समजू न शकली
भाव डोळ्यातले तू वाचू न शकली
फार प्रयत्न केलं मी सांगायचं तुला
तू मला बोलण्याची संधीच न दिली

आज दूर कुठेतरी सुखी आहे न आहे
पण आजही मी तुझीच वाट बघतोय
ठाऊक आहे गं तूहि कधी येणार नाही
नी मीहि तुला विसरू शकणार नाही

विसर होतो समोर एक अंधार म्हणून
जगेन मी दूर तुझ्या एक अभागी बनून
जगतोय मीही वरच्या वरचंच हसतोय
खरं तर मनातल्या मनात फार रडतोय

खरं तर मनातल्या मनात फार रडतोय
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
==* आई *==

तुझं बोट धरून झालो मोठा
आई आज का रिकामा ओटा
तुला सुखाचे दिवस न देता
नशीबच माझा ठरला खोटा

माऊली तुला किती सतवलं
तू त्याही त्रासाला हसत सहलं
मुलगा मस्तीखोर वांड असूनही
तू तुझ्या मायेने त्याला जगवलं

आज झालो फार मोठा मेहनतीने
तुझं प्रेम आणि त्या आशीर्वादाने
मझजवळ इतकं सगळं असूनही
आई मी अभागा ठरलो नशिबाने

आई खरंच तुझी माया पाहिजे
या लेकराला पोटभर भरायला
आई तुझी सतत कमी भासते
असह्य होतं तुझविन जगायला
आई
असह्य होतं तुझविन जगायला
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
==* काय करू मी *==

मी नाही म्हणून तू रडते
पण रडायचं कारण काय
नाही येऊ शकत मी परत
घाबरायचं कारण काय

असेल न तुझ्या हृदयात मी
जवळ फ़क्त नाही म्हणून काय

तू जगु शकते माझ्याविना
आहेत सारे तुझ संगतिला
दोन दिवस अश्रु गाळशिल
सहज जगायला शिकशील

नशिबाने जेव्हा मला छळले
त्यात माझी तरी चूक काय

हसशील तू परत गुलाबावानी
जीवन जगशील पतंगावानी
काय झालं मी संसारात नाही
तू राहु नको एकटी मिरावानी

तू जगशील माझ्याही हिस्याचं
मी नाही जगु शकलो तर काय
तू जगशील माझ्या नावासाठी
माझं नाव न मिळालं तर काय
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
==* पहिला पाऊस *==

कोरडी माती हलकीच ओलावली
गडलेली बीजं ओलावता अंकुरली
अंकुरली बीजं पानानिशी बहरली
बहरती पानं उत्साहात डोलावली

कारण
पहिल्या पावसाने भिजवली माती

शेतकरी रिकामा तो कामी झाला
त्याच्याही मनमंदिरी मोर नाचला
आले जणू सुखाचे दिवस म्हणून
यंदाही सुंदर स्वप्न बघू लागला

कारण
पहिल्या पावसाने भिजवली माती

जनावर पक्षीही खूप सुखावली
पोटा पाण्याचीही सोय भागली
सारी धरणी आनंदाने भाऊकली
लेकरांना जणू संजीवनी गावली

कारण
पहिल्या पावसाने भिजवली माती
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
==* गैरसमझ *==

मला मुळीच आवळत नाही
कुणी माझ्याशी रुसलेलं
रुसून माझ्याशी दूर गेलेलं

मला मुळीच आवळत नाही
कुणाला दुखावणं सतावणं
दुखावून कुणाला जिंकलेलं

प्रयत्न नेहमी करतो मी
जुडलेलं नातं जपण्याचं
नाती न तोडता जगण्याचं

नाही म्हणता तुटतात नाती
कुण्या न कुण्या गैरसमझीनं
न झालेल्या कुण्या चुकीनं
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
==* देवा कर इतका तो बदल *==

हाच दिला तरी चालेल सात जन्म मी पूर्ण काटेल
पण आता जसा वागतो त्यात कसरे माझं भागेल
देवा कर इतका तो बदल

दारू पितो मला मारतो ताश खेळतो भांडण करतो
काटले आजवरी दिवस पण बाबा आता नाही कटत
देवा कर इतका तो बदल

त्याला थोडी तरी देरे अकल कुटुंबाला आहे त्यांची गरज
बायको म्हणे पायाची जुती दूर कर त्यांचा हा गैरसमझ
देवा कर इतका तो बदल

खूप पैसा कमवूनहि काही जीवनाचं सारं नाही भागत
घराला घरपण तेव्हा येईल जेव्हा तो पोरायीसंग घुमल
देवा कर इतका तो बदल

कुटुंबाला वेळ देऊन तो कर्तव्य त्याचे पार पाडेल
घरच्या साऱ्यांना घेऊन तो स्वाभिमानाने नांदेल
देवा कर इतका तो बदल

देवा कर इतका तो बदल
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
==* पाऊस *==

नजर एकटक ती आकाशावर
पडणार कधी पाऊस धरतीवर
शेत तहानले ते त्रासले जनावर
अधीर मन जाईल का फासावर

अवकाळी नुकसान दरवेळी घात
सावरतील कां दिवस अंधारी रात
गरीबाच्या दारी पडेल का प्रकाश
हाती संजीवनी कि वाढेल जकात

दलालखोरी आता जीव काढू लागली
सरकारी परवाने त्यांना भेटू लागली
करेल का कुणी तरी आमचा विचार
कि यंदाही आम्ही फासावरच जाणार
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
==* धावपळ *==

काय ठाऊक काय झालं
माझं मन मला म्हणालं
का तू विचारात असतो
सतत दुखातच दिसतो

का करतो इतकी मरमर
आरामही नाही क्षणभर
इवल्यास्या पोटासाठी
कितीरे करतो धावपळ

मीही सांगितली ती गऱ्हाणी
एकट्या पोटाची चिंता नाही
थोडा आहेरे कुटुंबाचा भार
म्हणून करतो हा कारभार

आई बाबा नी बायको पोरं
यांचा करतो फक्त विचार
माझी तर कतेलच जिंदगी
त्यांच्या सुखाला हा आधार

त्यांना तर मीच एक आधार
माझ्यावीन होतील लाचार
रडायला नको मी नसतांना
म्हणून हि धावपळ जगतांना

म्हणून हि धावपळ जगतांना
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
==* शरीफ *==

शरीफाची शरीफी किती बघा
ओठी गोळ नी मनी घोळ बघा
विश्वासाने फिरतो जो त्यासंगी
त्याचाच करतो तो चीरहरण बघा

बाहेरून किती मोठा तो दिसतो
मनी मात्र त्याच्या मैल असतो
मजबुरी त्याची छळता जगाला
खोटे श्रेष्ठत्व दाखवीत असतो

शोषण कुणाचे छुपेना कधीही
नशिबी साथ मिळे ना दरवेळी
सत्य अटळ तो मुकेना कुणाला
गुन्हेगार एकदिस फसतो सदाही

सावध होता सुधरुनि जा आता
नको पाहूरे अंत त्या गरीबाचा
जनाची तो नाही बाळग मनाची
सावरुनी घे तू अब्रू त्या गरीबाची
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
==* दुख *==

प्रत्येकाची हीच कहाणी
माझी नवी तुझी पुराणी
दुखातही ती आनाकानी
माझं जास्त तुझं ते कमी

सुखाचा हिशोब न घेता
दुखाचा होतो तो पसारा
कितीही सुख आले तरी
दुखानेच रडतो बिचारा

रडत बसून काय फायदा
जीवनाचाही हाच कायदा
पिता आले हे दुख ज्याला
सुखही मिडेल फक्त त्याला
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
==* प्रेमप्रतीक्षा *==

तुझ्या विरहात मी केले
जीवनाचे जेही भले बुरे
उशिरा जरी का न व्हावे
फळ मला नक्की मिळाले
आता न कसली अपेक्षा
पूर्ण झाली प्रेमप्रतीक्षा

हसण्यापेक्षा रडलो जास्त
जगण्यापेक्षा मेलो जास्त
आस त्या एका होकाराची
मनी नकाराची होती धास्त
जीवनाची जिंकलो परीक्षा
पूर्ण झाली प्रेमप्रतीक्षा

किती जळ विरह प्रेमाचे
अश्रूही सुकले डोळ्याचे
जगता विरहात जणू वाटे
कुण्या जन्माचे असे काटे
काट्यांना प्रेमरक्त पाजता
पूर्ण झाली प्रेमप्रतीक्षा

कालवरी जी एकटी होती
अशी हि माझी प्रेमकहाणी
जीवनाचे झाले आता सार्थक
प्रीत तुझी जी मला मिळाली
प्रेमात हरत असतांना ती
पूर्ण झाली प्रेमप्रतीक्षा

पूर्ण झाली प्रेमप्रतीक्षा
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
==* चित्र ???? पट *==

नागडेपणाचा खेळ झाह्ला
चित्रपट जणू आजचा
फक्त पैशांचा खेळ मांडला
विषय वस्तू ना भावना

लोकांनीही काय आवडीने
अभद्रता हि स्वीकारली
गुपचूप फक्त बघू लागले
देशातले मोठे मानकरी

लपून जाती बघाया पिक्चर
ओठी मात्र शरिफ़पना
कुटुंब म्हणता लाज लज्जा
मित्रांसोबत चावटपणा

भीती वाटते संपेल का
भारतीय संस्कृतीचा वारसा
इथे फक्त दिसतो आता
पाश्चात्य संस्कृतीचा आरसा
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
==* आकर्षण *==

होकार देऊ तरी कसा नी विश्वासही करू कसा
तुझ्या प्रेमाची निर्मलता न बघता फसुही कसा
बघीलना अश्रुधारा खरचं प्रेम कि तो फक्त वारा
घेईल मी परीक्षा एक सत्य मनातलं निरखाया

सहज कां वाटून आले कि, घेईल बाहूत मी तुला
सिध्द व्हाया प्रेम तुझे काही अवधीतर लागेलना
घेईल सावरून जीवनाच्या अंधारातून मी नक्की
पण त्या अंधारी कारणाला तर शोधावं लागेलना

तू कर प्रीती पण अपेक्षाभंग मात्र ते करवू नको
माझ्या आशेत उगा आपलेच मन हे दुखवू नको
मीही कदाचित करेल न करेल प्रेम उद्या तुला
पण उद्याच्या प्रश्नात आज तुझं हे गमवू नको

घडव जीवनाचे काही भलेबुरे तुझ्या उद्यासाठी
कर काही वेगळे ज्याने येईल मीही तुझ्यापाशी
दिसतय जरी प्रेम सोपं तितकंहि ते सहज नाही
दोन दिवसानंतर आकर्षण जीवनाचे टिकत नाही

दोन दिवसानंतर आकर्षण जीवनाचे टिकत नाही
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
==* स्त्री *==

स्त्री आता अबला नाही
तरी सतः अबला मानते
न बोलता अन्यायावर
सारी दुःख का ती झेलते

समाजाच्या भीतीपोटी
मनातल्या मनात झुरते
तिला का कळत नाही ही
लोकंच बुऱ्या नजरेनं पाहते

दुःख सारून सारे जगावं तिनं
दुसऱ्यांना बघून सिखावं तिनं
कां अन्याय सहन करायचं
नबोलताच गुमान जगायचं

आशा सर्व ती मारून जगते
समाजाची ती नाती जपते
तिला का नाही जगण्याची सुट
तिलाहि स्वप्न बघण्याची भुक

व्हावं मुक्त तिनंहि बंधनातून
जगावं तिनं वाटेल जे मनातून
अन्याय का या स्त्री जातीवर
जातंय जीवन पूर्ण ते चुलीवर

जातंय जीवन पूर्ण ते चुलीवर
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
==* बंधन *==

पोलिसांना ठाऊक अड्डे चोरांचे
पोलिसांना ठाऊक पत्ते गुंडांचे
करायला खूप काही मार्ग आहे
सर्वीकडे आहे जाळे खबऱ्यांचे
पण काय करणार बंधन आहे
बंधन आहे ते गोळी चालवायला
बंदुक दिलीहि फक्त दाखवायला
हिम्मत नाही असं काहीच नाही
पैशांना झुकते असही काही नाही
पण काय करणार बंधन आहे
दोष्यांना मैनतीने पकडून आणा
नेत्यांच्या ओडखीनं त्यांना सोडा
लगेच न्यायालय जामीन वाटते
पोलिसांना राग येतो व्यवस्थेचा
पण काय करणार बंधन आहे
मत मांडले तर पटकन बदली होते
ड्युटी गाजवली तर गुंड ठार मारते
भीतीपोटी चोरांना साथ द्यावी लागते
कारण त्यांनाही घरची फिकीर वाटते

कारण त्यांनाही घरची फिकीर वाटते
दोष्यांचे बाप बनून रायले असते
पण काय करणार बंधन आहे
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
==* अच्छे दिन *==

किती अवघड जातंय त्यांना
दोन वेळची पोळी मिडवाया
जीवन जातंय मजुरीत अनं
मर मर मरून पोट भरतांना

हसता हसता रोज मरताय
पण अच्छे दिन कुठं दिसंना

आज उपाशी मरण्याची पाळी
नाही मिळत मिळावी ती मजुरी
जीवन जातंय झोपळीत त्यांचं
बांधुन अमीरांची घर नी हवेली

स्वप्न लोकांचे सजवीत आले
पण अच्छे दिन कुठं दिसंना

बायको पोरं आली ओझ्याखाली
सारे करती कामं पापी पोटासाठी
उन्हा तान्हात कटली ती जवानी
सांगल कुणा ती आपली कहाणी

फुटपाथवर सारं जीवन जातंय
पण अच्छे दिन कुठं दिसंना

ना लक्ष सरकारचं ना नशिबाचं
कुणी नाही का वाली त्या गरिबांचं
मरतोवर काहो असंच जगायचं
स्वप्न अच्छे दिनचे बघत मरायचं

आशा त्यांनीहि बांधली मनाशी
पण अच्छे दिन कुठं दिसंना
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
==*  येत्या पावसात असह्य होईल (सैनिक) *==

येत्या पावसात असह्य होईल
सैनिकांचे रक्षण करण्याला

रक्षक म्हणून जबाबदारी
पडल नाही ना तो आजारी
रक्षणासाठी करतो जो
भर पावसात पहरेदारी

जीवन त्याचं ते दुरवरी
आपण ज्याचे आभारी
मिळल का त्याला लपाया
पावसात एखादी झोपडी

वाचेल तोच असेल जो
झाडाखाली टेंटाखाली
तो तर सदा खंबीर उभा
हिवाळी उन्हाळी पावसाळी

त्याला कसली भीती राहली
ज्याने देशासाठी नाती वाहली
त्याच्याच तर वीर बलिदानाने
अमरज्योती हि जळत राहली

येत्या पावसात असह्य होईल
सैनिकांचे रक्षण करण्याला
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
==* संस्कृती *==

देव माणसातला आता दैत्य झाला
माणूस माणुसकी विसरुनी गेला
कोण आहे तो देव म्हणून दिसेना
इथे आता देवाचाही बाजार झाला

संस्कृती भारताची ती गाहाळ झाली
पाच्छात्य हालचाल आता सुरु झाली
कुठे गेली ती सलवार साडीची प्रथा
बॉलीवूडमध्ये फक्त चड्डीच राहली

सिनेमा पाहून पोट्टेहि आता गेले वाया
नमस्कार सोडून हाय हेल्लोची काया
प्रेम म्हणून निव्वळ टाईमपास होतो
वाढली महिलांवर बलात्काराची छाया

विदेशी लोकं सिखले आपले गुणं
आपण घेतले फक्त त्यांचे अवगुणं
मरत्यालाही न पाजे पाणी कुणी
लाज शरम पार टाकली विकूनं
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
==* नाजुकसे हे मन माझे *==

नाजुकसे हे मन माझे
त्यात वसले प्रेम तुझे
तुझ्याच स्वप्नात कटले
रात्र अनं दिवस माझे

हसतं मन मनात कधी
आठवणींना त्या आठवून
जपतोय तुझ्या प्रेमाचे
ते प्रत्येक क्षण साठवून

अगं तुही आठव जरा
तो प्रेमाचा गोड वारा
हवाहवासा वाटतो ना
परत तो थंडीचा गारवा

इथेच तू रोज भेटायची
माझ्यासोबत हसायची
तासंतास मिठीत घेऊन
गोड गोड तू बोलायची

काहीवेळ जरी दुरावले
प्रेमफुल नाही सोकावले
दिल्या घेतल्या वचनांना
प्रेमाने दोघांनी जोपासले
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
==* वेदना *==

माझ्या सर्व वेदना मी लपवित आलो
निस्वार्थ सर्वांना मी हसवीत आलो
कुठे तरी हर्ष वाटतो या जगण्यात
नाती गोती प्रेमळ मिळवीत आलो

मरूनही घरच्यांना काय देऊन जाणार
त्यांच्याहि कपाळी फक्त दुखच येणार
घरचे दुखात रोज रोजचं मरू नये
म्हणून मरत मरत एकटा जगत आलो

असहनीय दुख माझ्यासाठी माझे
क्षण कुठेही न मिळे ते एकांताचे
अश्रू कुणालाही माझे दिसू नये
म्हणून रात्री बिछान्यावर रडत आलो

सख्या सोबत्यांची आपुलकी घेऊन
बांधिलकी जीवनाची सर्व पार पाडून
मित्र मैत्रिणीचे मन कधीही दुखू नये
म्हणून त्यांसोबत खोडीने मिरवत आलो

माझ्या सर्व वेदना मी लपवित आलो
निस्वार्थ सर्वांना मी हसवीत आलो
कुठे तरी हर्ष वाटतो या जगण्यात
नाती गोती प्रेमळ मिळवीत आलो
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
==* विरहात तुझ्या *==

मी हसतोही रडतोही
वाट तुझी बघतोही
तू नाही याचा दुख
विरहात तुझ्या -----------

मी बघतो स्वप्नात ते
तुझ्या संगतीचे दिसं
नको असलेले जगतो
विरहात तुझ्या -----------

हसण्याचा काळ लोटला
मोजताहि न आले मला
गेले जे एकांताचे दिसं
विरहात तुझ्या -----------

आजही तुझी कमी भासते
परत येशील असं वाटते
कधी पर्यंत बघू वाट अशी
विरहात तुझ्या -----------

मी जगलोही आजवरी
अर्थहीन जगण्याला
आता राहावत नाही
विरहात तुझ्या -----------
विरहात तुझ्या -----------
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
==* काय बोलायचं *==

तिच्या अश्रूंना मी नेहमीच पुसत गेलो
तिच्या सुखदुखात हसत रडत आलो
अनोळखीच ती काय ठाऊक कोण होती
बघताच तिला मी माझाच हरविलो

तिच्याशी बोलतांना आपुलकीचा भास
सतत हवा असतो मला तो तिचा साथ
काही तरी दुख मनी वसलाय तिच्या
दिसते कधी कधी हळूच घेतांना श्वास

जाणतो न सांगताहि त्या मनाच्या वेदना
त्या हृदयाशी जुड्ल्या माझ्याहि भावना
करू काय कि कसे तिला रोखू जाताना
बदलवू नशीब तीचं नाही ती रेषा हाताला

संपूर्ण जीवन तिच्यासोबत जगायचं
तिच्या प्रत्येक दुखाला आपलं करायचं
वाटतं तिला कि दुख सांगावित सारि
तीच मग म्हणते जाउदे काय बोलायचं
काय बोलायचं
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
==* अपुरं वाटते *==

घाबरट मन माझा सतत घाबरतो
रात्रंदिवस एकटक तुझी वाट पाहतो
तू गेली मज सोडून ज्या अंधारात
अंधारात त्या प्रकाशकिरण शोधतो

कशी गं तू अशी झाली तू तर अशी नव्हती
माझ्या विना म्हणे तू तर जगणार नव्हती
चुकलोही असेल मी तर का सोडून जायचं
दिल्या घेतल्या वचना असं तोडून जायचं

मान्य तुझ्या प्रेमात काही खोटं नव्हती
पण मग माझीही प्रीत तर स्वार्थी नव्हती
कुठे वाट चुकलो नि आपण इथे भटकलो
हसता खेळता एकमेकांना असे विसरलो

कवी म्हणून कवितेत माझ्या तू आढळते
तुझ्याविना बघणा शब्द शब्दात भेसळते
परतुन ये अंगणात माझ्या सारं विसरुनी
तुझविन खरच गं हे जीवन अपुरं वाटते
अपुरं वाटते
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
==* निसर्ग *==

आलिया पहाट पक्षांची चिवचिवाटं
कळी फुल होऊनी बहरली बगिच्यातं

गार वारा वाहता झडली पानं सारी
नवी पालवी नव्याने खिलु लागली

पावसाची सरं त्या हिरव्या पानावरं
बहरूनी निसर्ग आलं हसू ओठांवरं

शब्द मनाचे जोळू लिहिता लिहिता
कवी मन माझे करू लागला कविता

निसर्गाचा नाश जे आज करू पाहती
सांगावे तयासी कोण आहे ती शहाणी

काय होता हा माणूस आता काय झाला
आपल्या फालतू कर्मानेच हा नष्ट झाला
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
==* प्रेमात हरलो *==

मीही प्रेमात तुझ्या काही काळ रडलो
आठवणींच्या अश्रूंनी पूर्णपणे भिजलो
तुझविन अधुरी माझी नेहमी कहाणी
कसं काय सांगू तुला व्यथा या मनाची

गेली का दूर माझ्या चूक काय झाली
सांग तरी गुन्हा तुझ्या मना काय चाली
भोगेन शिक्षा जो तू ठरवून तर बघ
माझं जसं प्रेम कुठे मिळवून तर बघ

वचन देतो कधीच तुला दिसणार नाही
तुझ्या वाटेला कधी मी अळनार नाही
विसरू नको तू दिसं गेले सोबतीचे
दिले घेतले जे वचन आपण प्रेमाचे

मीही प्रेमात तुझ्या काही काळ रडलो
आठवणींच्या अश्रूंनी पूर्ण मी भिजलो
काय सांगू आजवरी कसं काय जगलो
आता वाटतं जणू तुझ्या प्रेमात हरलो
प्रेमात हरलो
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
==*  माणूस हो *==

इतकंच मी म्हणतो तुला
माणुसकी तू जप जरा
जाती धर्माचा काय तमाशा
माणसाला माणूस मोल जरा

तुझंही रक्त लाल नी माझंही
मग कां अंतर जातीवादाचा
काय न्यायचं मरणावर सोबत
इथेच तर शांती हवी मनाला

माणसा तुझी उत्पत्ती काय
कोण तुला रे जन्म दिला
आईची सेवा सोडून तू
दगडाला या पुजू लागला

काही स्वार्थी आपले  स्वार्थ साधून
भांडण लावती तुझ्यात भेद पाडून
जात धर्म नाहीरे इथे छोटं कुणाचं
अंगाची आग राहू न देई कुणा वाकून

कुणाच्या धर्माला दोष देऊ नको
आपलाच धर्म श्रेष्ठ ठरवू नको
तुझीच माती इथे तुझी नाही
डोक्याचा वापर न करता जगू नको

भांडण न करता भांडण सोडव कुणाचं
रडण्यापेक्षा अश्रू पूस तू कुणाचं
इथेच तुझं खरं स्वर्ग आहे
सर्वांना मनानं आपलं मान जरा
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
==* विसरुनी जा तू *==

विसरुनी जारे विसरुनी जा तू दूख जीवनाचे
फिरकत जारे फिरकत जा तू गंध होत फुलांचे

कोण तुझा आधार होऊनी नेईल त्या किनारी
सुख शोधत निघुनी जा तू तुझाच हात धरुनी
मिडेल तुलाहि मार्ग हर्षाचा ध्येय तू ठरवून घे
साथ हवा तरी तुला रे कसला तूच तुझे बघून घे

विसरुनी जारे विसरुनी जा तू दूख जीवनाचे
वाहत जारे वाहत जा तू वारा होऊनी सुखाचे

दुख तर हि रीत जगाची कोण राहला बाकी
दुख बघ जगाचे पहिले आणि हो तूहि पुढारी
दुख पाहता लोकांचे मन कितीरे हा हादरतो
असेल अंत दुखालाही मग कशाला तू घाबरतो

विसरुनी जारे विसरुनी जा तू दूख जीवनाचे
हसवत जारे हसवत जा तू हर ते दुख जगाचे
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
==* तुझी कमी *==

 काय करीन तुझी कमी भासेल जेव्हा?

हृदय देऊन माझं प्रेमच केलं तुला
सरस्व देऊनही का छळले तू मला
काय चुकलं माझं अनाडी होती खेळात
कळलं शरीराला असतं मोल प्रेमात
काय करीन तुझी कमी भासेल जेव्हा?

मीच वेळी वाहली खोट्या प्रेमाच्या भरात
जीवनखेळ मांडला लग्नाचा आश्वासनात
निशाणी सोडून गेला तू माझ्या कोवळ्या पदरी
बापाच्या नावावीण देईल कोण त्याला मानपद्वी
काय करीन तुझी कमी भासेल जेव्हा?

जगेनही कशीबशी दगड खात लोकांचे
कसे पाहीन त्याला मी एकटे रडतांना
ये परत तुझी गरज सदैवं भासेल आम्हाला
तूच सारथी सदैवं हवा मानाने जगण्याला
काय करीन तुझी कमी भासेल जेव्हा?
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
 ==* पैसा *==

पैसा पैसा पैसा

शहराची वाढ होता विकल्या जाते शेती
पैसा पाहून शेतकरी खायला जातो माती
पैसा पैसा पैसा

शहराच्या विकासासाठी घेतल्या जाते जमिनी
पैशासाठी गरीबही विकतो बेमोल घरची शेती
स्वप्न त्याच्या मनमंदिरी साठवतो तोही मोठी

विकून शेती पैशासाठी देतो घरच्यांची आहुती
मौज मस्ती शौक मोठे करतो पैशाची बरबादी
उद्याचा काय विचार त्याला आता झाली चांदी
पैसा पैसा पैसा

गावचेही लोकं आता बघा झाली किती मोठी
सायकील ना होती आता जमली होंडा सिटी
शहराककडे धावत आहे आता तो गावचा गुणी
करोडोचा भाव भेटला गरीबाच्या त्या जमिनी
पैसा जगात मोठा पैसा नाही तर कोण विचारे
त्याच विचारात पडुनी विकते शेती ते बेचारे
पैसा पैसा पैसा

जी जमीन शेतकऱ्याची आई म्हणवत होती
अन्नदाती त्या आईला आता मोल तरी किती
पैसा पैसा करत अमीर लोकं पैसा खाती पेति
गरिबाला समझतो आजही पायाखालची जुती
गरिबाला रीत नाही पैशाचा उपयोग करावा कैसा
उद्याची फिकीर कुणाला तो उडवतो मस्त पैसा
पैसा पैसा पैसा

शहराची वाढ होता विकल्या जाते शेती
पैसा पाहून शेतकरी खायला जातो माती
 ----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
 ==* अन्याय *==

तुझ्या डोळ्यातील अश्रूंना जप तरी जरा
झाल्या अन्यायावर हसत तप तरी जरा
बगून घेरे शेवट तरी काय तुझ्या जीवनाचा
छळतो तुला किती तरी बघ तो छळनारा
अन्यायाचा हिशोब ठेऊनि तू आपल्या माथी
देवाघरी वर जाऊनि विचार तू प्रश्न ती सारी

तुझ्या डोळ्यातील अश्रूंना तू जप तरी जरा
झाल्या अन्यायावर हसत तू तप तरी जरा
देव देव करत सारे लोकं मंदिरात जाती
केले पाप आपले सारे तिथं जाऊन धुती
सहन कर तू लोकांचे सारेचं ते गऱ्हाणे
पोट देऊन तुला भाकर दिली ना देवाने

तुझ्या डोळ्यातील अश्रूंना तू जप तरी जरा
झाल्या अन्यायावर हसत तू तप तरी जरा
तुझ्या सारख्या गरिबाला न घर ना भाकरी
ज्याला गरज नाही त्याचीच करतो तो चाकरी
रडू नकोरे जीवनाचा कोण तुझा आहे सारथी
सोडवायची आहे तुलाच सर्व प्रश्न ती जीवनाची

तुझ्या डोळ्यातील अश्रूंना तू जप तरी जरा
झाल्या अन्यायावर हसत तू तप तरी जरा
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
 == * तुझ्या हातची भाकर *==

 तुझ्या हातची भाकर चवदार लागते
तुझ्या कुशीत निवांत निजावं वाटते
आई तू कुठं आहे एकदा दिसणागं मला
तुझ्यावीण जग माझं विरानच भासते

घरी सोनं नाणं पैसा आला गाळी आली
तू मात्र मला अशी सोडून का गेली
तुझ्या कष्टाला आता तरी फेदुडेगं मला
सुखाचे दिवस आले तू न बघताच गेली

मी तर लहान होतो रोखू तरी कसं तुला
माझ्या लहान भावना समजल्या न तुला
आजही तुझी वाटं मी बघतोगं आई
धावत येऊन कुशीत मला घेणागं जरा
धावत येऊन कुशीत मला घेणागं जरा
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
 ==* माझं तुला होऊदे *==

 तुझ्या प्रीतीला प्रीत म्हणून जुळूदे
तुझ्या अश्रूंना हलकेच मला पुसूदे
तुझ्या ओठांना साद माझ्या ओठांची
तुझ्या मनाचे ओठांना काही बोलुदे

माझ्या नावाचं फुल तुझ्या हृदयात खिलला
माझ्या जीवनाला साथ तुझी जचुदे
माझ्या गीताला गोळ स्वर हलकेच मिळता
माझ्या शब्दांना चाल तुझी मिळूदे

तुझ्या हृदयात साठवली स्वप्न अपार
तुझ्या स्वप्नांची पूर्ती मला करुदे
तुझ्या अंगणात उभी माझ्या जीवनाची गाळी
तुझ्या होकाराने तिला पुढे चालुदे

माझ्या मधुर प्रेमाला तू परखुनी चाल
माझ्या प्रेमाला तू काही वाव दे
तुझ्या मनाला सांग दगळ होऊ नको
तुझ्या मनाला माझं मन भिळूदे

आणी माझं तुला होऊदे
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
==* तुझीच वाट बघतोय *==

तुझ्या लावण्यात गुंतलो होतो मी त्या वेळी
तू आली माझ्या समोर अचानक ज्या वेळी
काय तारुण्य बहरून होता त्या सौंदर्याला
हरवून बसलो त्याच वेळी नाजूक मनाला

बघितलं तुला नि भारावलो असा त्या रुपाला
जपतो आजहि नाव घेत तुझं धीर देत मनाला
तुझी ती अदा पाहून चित्र विचित्र मन झाले होते
तुझ्या हृदयात सामाया मन माझे तडफडत होते

बोलू तरी काय जरा तुझ्या आवळीचे जचणारे
शब्दही तुझ्या त्या मनमोहक रुपाला पळे अधुरे
बोलावसं तर तुला फार काही वाटायचं मनाला
येता समोर मन म्हणायचं बोलू आपण उदयाला

आजही तुझी आठवण नि तुझे रूप आठविते
बोलू शकलो नाही त्या वेळी बोल या मनातले
जगतोय त्या आठवणीत आजही झुरतोय
तू नाही येणार परत तरी तुझीच वाट बघतोय

तुझीच वाट बघतोय
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
==* विरह *==

आजही तूझ्या सोबतीचे क्षणं आठवते
रूप तुझे मन मंदिरात आजही आढळते
तुजे हातात हात धरून तासंतास बोलणे
मला बघून तुझे लाजणे आजही आठवते

कळेना आपल्यावर विरहाची पाळी कशी ओढली गं
अतूट आपल्या प्रेमात शंकेची रेखा कुणी खेचली गं
नकार होता एक दुसऱ्या वीणा आपले जगण्याला
आज चेहराही बघणे पटेना आपले आपल्याला

तू असता न असता तु मला आजही आठवते
तुझ्या संगतीचे सुंदर स्वप्न आजही पडते
तू नसल्याचा दुखं नि आभास असण्याचा
मला नाही आता आसरा तुझ्या प्रेमाचा

जगावे म्हणावे तुझ्या विन कसे गं जगावे
तुझ्या आठवणींचा गोळ साठा कसे संपवावे
तू परतुनी मला पाहशी जेव्हाही उदयाला
मी एकटाच दिसेन  विरहात आपणाला
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
==* भारत *==

कोण कुणाचा या आजच्या भारतात
स्वार्थ नि द्वेष फक्त लोकांच्या मनात
प्रेमाचे शब्द  आज पुस्तकातच शोभते
लोकांच्या ओठी शब्द खोटंच बोलते

म्हणायला इथे एकतेचा राग हाकतात
आपल्याच घरी आपल्यांशी भांडतात
धर्मनिरपेक्ष म्हणून इथे संविधान गाजते
जाती धर्माच्या पोटी आपलेच तर घर पेटते

भारतात वाढतोय जातीवादाचा सारखा वारसा
घरच्या भांडणाने होतो याचा जगात कोळसा
मी भारतीय म्हणून हा जगात गवरवितो
इथे आपल्याच जवळच्या प्रदेशाला चीळवतो

न्यायपालिका म्हणायला सर्वांना न्याय देते
ज्यांच्याकळे पैसा त्यांना त्वरित बेल देते
राजकारण देशात सर्विकळे  हावी असते
कसलेही वाईट कामं लाच देऊन करता येते

शिक्षणाचा खेळ आणि गरिबांची गैरसोय आहे
पैशाचा छळ आणि खाजगीकरणाचा मेळ आहे
मोठ्या मोठ्या पदावर अळयानांना निवडून देतो
बेरोजगारांना शिकूनही नोकरीचा विचार येतो

उत्पन्नाला भाव नाही खर्च मात्र फार असतो
घरच्या चिंतेपाई शेतकरी आत्महत्या करतो
त्यांच्या मरणावरही येथे सत्तेचा खेळ होतो
तरी आपण परत अळान्यांना निवळून देतो

इतिहासाचा वारसा कोण येउन समोर नेतो
काय होईल भारताचं हाच तर विचार येतो
वारे माझ्या भारत देशा काय तुझी कमाल आहे
इतकी सारी लफळी असेल तरी तू महान आहे
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
 ==* लाळकि *==

कथा बनली माझ्या हळव्या मनाची
मुलगी गं माझी तू स्वप्नाची बावलि

इवलीसी बोटं आणि इवलीसी तू
परीवाणी रूप तुझे लाळकि गं तू
तू आली जन्माला माझ्या गं पोटी
देवाचे धन्य मानते मी कोटी कोटी

कथा बनली माझ्या हळव्या मनाची
मुलगी गं माझी तू स्वप्नाची बावलि

मुलाची आस नाही मायेची आण
मुलगी असली तरी घराची शान
शिकवीन तुला करून जीवाचे राण
पोरी तू घाबरू नको मनाची हाण

कथा बनली माझ्या हळव्या मनाची
मुलगी गं माझी तू स्वप्नाची बावलि

वाहीन मी तुला एका चांगल्या घरी
सासरवाले ठेवील तुला रानिवानी
करीन मी स्वप्न तुझे गं पुरे
वाहुदे माझ्यावर मग दुःखाचे वारे

कथा बनली माझ्या हळव्या मनाची
मुलगी गं माझी तू स्वप्नाची बावलि

कोण म्हणते मुली आहे गळ्याची फास
तुला बनविण शिकवून मुलींची शान
जगशील तू तोऱ्याने होऊन महान
लक्ष्मी तू घरची करशील कमाल

कथा बनली माझ्या हळव्या मनाची
मुलगी गं माझी तू स्वप्नाची बावलि
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
 ==* जस्ट जोकिंग *==

आज कालच्या पोट्ट्याइले दिसत नाही काई
रात्री इंटरनेट आणि दिवसा वाईफाई
मस्त रस्त्यावर उळवी सिगरेटचा धुवा
भीती नाही त्याले बोमलन त्याच्या बुवा

लमचे करेना अभ्यास नाही काहीचा ध्यास
बापाले लंबे करती त्यांचे खर्च खासमखास
वाटस याप आणि फेसबुक चा नाद पहिले
जीवनाची काळजी न घरच्याची लाज त्यायीले

आपलीच धुंदी नं आपलाच टायीमपास
रात्री रात्री पार्टी करते हाती वाईन चा गीलास
पोरगी दिसता तिले म्हणते लयीभारी माल
काई कर मित्रा म्हणते पहिले इचा नंबर आन

काय होईन राव यायीचं समजत नाही मले
सांगून थकले गोष्टी चांगल्या यायीले भले भले
येळ गेला म्हणजे बोमलन ठेऊन डोक्यावर हात
पोरा समजून घेणं आजच ठेऊन उद्याचं भान
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
==* माझाच मी नाही *==

 माझाच मी नाही सांगू तरी कुणा
काय उरलंय जिवणी पहाया पुन्हा

छळलं  जीवनाने असं काही मला
कळत नाही काय झाले माझेच मला
प्रेम मी तिला तर जीवापाळ केले
तिला मनवायचे प्रयत्न फार केले

माझाच मी नाही सांगू तरी कुणा
काय उरलंय जिवणी पहाया पुन्हा

ती नको म्हणाली तरी मनवत मी गेलो
तिच्या परत येण्याची वाट बघत मी आलो
ती नाही जीवनी म्हणून करमतही नाही
जीवनाचे क्षण भारी आता कटतहि नाही

माझाच मी नाही सांगू तरी कुणा
काय उरलंय जिवणी पहाया पुन्हा

नशिबाची साथ ना माया कुणाची
झुरलो एकटा मी या जीवनाशी
शेवट माझं काय मला काही कळेना
जीवनाची गाळी दुसरी वाटच धरेना

माझाच मी नाही सांगू तरी कुणा
काय उरलंय जिवणी पहाया पुन्हा

लळलो मी हसलो थकलो कदाचित
तिच्या आठवणीत रुसलो स्वतःशीच
आता काय आशा कशाची करावी
जी वाचली कहाणी पूर्ण करावी

माझाच मी नाही सांगू तरी कुणा
काय उरलंय जिवणी पहाया पुन्हा
 ----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
==* जीवन तुझं *==

वैतागल्या मनाची कथा कोण जाने
थकल्या जिवाची व्यथा कोण जाने
जीवनात एकटाच भटकत राहा
अंत तरी काय माझा कोणी नाही सांगे

जीवन म्हणता जीवन नाही किती यात मेळ
समजायला सोपे नाही कसला तरी हा खेळ
वाटतं सगळे आरामात मग मीच का दुखी
विसरलो मात्र या जगात कोण आहे सुखी

संस्कृति राख झाली पैसा मागे धाव घेत
परके ही हसतात म्हणत हेच सापाचे देश
बलात्कार दंगे भ्रष्टाचार हीच आमची शान
आपल्या स्वार्था पाई विकतो आईची आन

कुठं गेला देशप्रेम तो तुझा अभिमान
मानुस म्हणून इतरावतो कुठं गेला तो प्रताप
जागा हो नि सांग जगाला हीच भारत माता
ज्यांनी घडले इतिहास तो भारतीय वाघच होता

आताही वेळ नाही गेली लढण्याची
मरावं आणि जगावं फ़क्त देशासाठी
काय होता काय झाला विचार कर जरा
कर्म कर आवाज उचल हो भारताचा पुत्र खरा
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
==* मानुस *==

 आलिया पहाट पक्षांची चिवचिवाट
कळी फुलं होउनि बहरली बगिच्यात
ग़ार वारा वाहत झळली पान सारि
नवी पालवी नव्याने खिलू लागली

पावसाची सरं हिरव्या पाणावरं
बहरुनी निसर्ग आला हसू ओठांवरं
शब्द मनातले जोळु लिहिता लिहिता
कवी मन माझे करू लागला कविता

सांगावे तयासी कोणं शहाने ती सारि
नाश निसर्गाचा करू पाहती हि शहानी
काय होता हा मानुसं मात्र आता काय झाला
आपल्याच फालतू कर्माने मानुसं नष्टं झाला
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
 **************************************************
 ==* कालचीच गोष्ट *==

जणू ती कालचीच गोष्ट जेव्हा मी लहान होतो
गावातल्या गल्ली विना चप्पल फिरकत होतो
कधी अमरूद चोरायचे तर  कधी चोरायचे आंबे
तो शेत मालक धावे  घेऊन काठी आमच्या मागे
जणू ती कालचीच गोष्ट जेव्हा मी लहान होतो

शिक्षण शिकायचं कल्टी मारता मारता
घरून पैसे घ्यायचे खोटं बोलता बोलता
आजचे चिल्लर पैसे तेव्हा मोठे नोटा होते
ते दिवस लहानपणाचे वेगळेच काही होते
जणू ती कालचीच गोष्ट जेव्हा मी लहान होतो

आई ओरडायची लवकर ये घरी
बापही कधी कधी कानफटात धरी
मार खायचो तासंतास रडत बसायचो
दुसऱ्या दिवशी पुन्हा गोंधळ मांडायचो
जणू ती कालचीच गोष्ट जेव्हा मी लहान होतो
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
 ==* तू नि प्रेम तुझं *==

तुझे रुप गुलाबावानी
रंग होळीचे बहरूनी
तुझ्या हाताची मेहंदी
लाल लाल हि रंगुनी

नाचे अंगणभर तू
होऊनी सुंदर मोहिनी
लाली ओठांची गुलाबी
मन माझे ती मोहिती

तू  कोण आहे माझी
तुला कसे काय सांगू
जगण्याला जे हवी
ती श्वास वाटते तू

मी जीवनाच्या अंती
तुला ठेवीन सांभाळूणं
एकटाच मी जगीणं
तुह्या आठवणं जपूणं

तुझं लाजुनीया  हसणं
तुझं गोळ गोळ बोलणं
मला वेळ लावतोया
तुझं तिरप्या नजरेनं बघणं

तुला जेव्हाही बघतो
तू लागे गोऱ्या चंद्रावानी
तुझ्या कपाळाचा कुंकू
माझ्या प्रेमाची  निशाणी
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
==* दुविधा आहे देवा तू आहेस कि नाही *==

दुविधा आहे देवा तू आहेस कि नाही
सुविधा आहे तुला गरिबास अन्न नाही
उपाशी मरतो माणूस तुला लाडूचा भोग आहे
म्हणाया तुझं मंदिर मंदिरात तूच नाही

बनवून माणसाला अन्याय का हा केला
देतांना ताठ हाती समभाग त्यात नाही
सर्वोपरी जरी कर्म हाताला काम दे तू
कुणाला फक्त डोळे कुणाला हात नाही

तुच श्रुष्टी सारी घडवुनी दोषी ठरला
कुणाला बंगला गाडी कुणाला घर नाही
बाळाला माय बाप सोडे ना रस्त्यावर
जन्म देउनी मुलाला ठरला तू बाप नाही

का मंदिरात जाऊ विनवू तुला रे मी
फळ माझ्या कर्माचे हे वाकणार मी नाही
माया तुझी तयावर देती जे सोने नाणे
दार आता तुझ्या घरचा ओलांडणार नाही
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
==* या मनाचं *==

या मनाचं असच असतं
कधी हसतं कधी रडतं
या मनाचं असच असतं

तू हसली की बरं वाटतं
तू रुसली की मन दुखतं
काय सांगू सखे तुला मी
या मनाचं असच असतं

सोबत असली की मजा
प्रत्येक क्षण हर्षावतं
दुरावली की मग सजा
प्रत्येक क्षण दुखावतं

बोलण्यात बेधुंद तुजसवे
जगाचं विसर पडतं
तुझ्या डोळ्यात पाहतांना
हृदयातलं दुखं सरतं

राहवेना न तुझविन जेव्हा
भेटाया जिद्द करतं
समजावले जरी कितीही
तुझ्याच मागे फिरतं

या मनाचं असच असतं
कधी हसतं कधी रडतं
या मनाचं असच असतं
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
==* तुझविन *==

रोज पहाटे वाट तुझी मी बघतो त्या किनारी
व्याकुळता या दुखी मनाची सांगतो तुला मी
सांग सखे तुझ्या विचारी दिसतो का तुला मी
अवती भवती भासतांना आठवतो का तुला मी

कसले हसणे कसले रडणे जगणे जगतो राणी
आठवता तू घेउनी येते डोळ्यात माझ्या पाणी
हवी हवीशी साथ तुझी जवळीक तुझी गं नाही
हळुवार कधी भासून येते मधुर तुझी गं वाणी

प्रेमाच्या नावाने लिहिली मी हि कधी कविता
आज मात्र कवितेसाठी श्रुंगार उमगत नाही
जगणे जगतो जगण्याचे मी हे जगण्यासाठी
तुझ्याविना गं या जगण्याला कसले अर्थ नाही

जगणे जगतो जगण्याचे मी हे जगण्यासाठी
तुझ्याविना गं या जगण्याला कसले अर्थ नाही
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
==* विश्वास *==

शंका घेऊन रुसून बसलेल्या प्रेयसीला प्रियकर म्हणतो . . . . . . . . .

विश्वास हरवला माझ्यावरचा
आज तू शंका घेतली
दिसले नयनी ते सत्य नव्हते
मला गं तू न जाणली

छोटे मन अनं विश्वास छोटा
विस्वास माझा तोडला
विश्वासाच्या या खेळामधला
नियम सखे तू मोडला

शंका मनी जर जाग्या झाल्या
येऊन का न विचारले
एकतर्फी निर्णय घेउन सजनी
मन माझे तू तोडले

ये परतुनी समझ मला तू
प्रेम हे खोटे नाही
प्रेमामध्ये शंका करणे
नवीन काही नाही

तुझा सखे मी बनून राहलो
तुझविन करमत नाही
शपथ घेऊनी तुला सांगतो
तुझविन कुणीही नाही

शपथ घेऊनी तुला सांगतो
तुझविन कुणीही नाही
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
==* जेल भरो *==

जेल भरो जेल भरो कसला जेल भरो
तुमचं घर भरून नेहमी गरीबच मरो

तुमची होती सत्ता तेव्हां कुठं गेले होते
दुष्काळी भागात तुम्ही किती गेले होते
हरवली सत्ता म्हणून घेताय वाटतं सूड
तुमच्या राज्यातही तर हेच घडले होते

जेल भरो जेल भरो कसला जेल भरो
तुमचं घर भरून नेहमी गरीबच मरो

मराठवाडयाचं पानी तुम्ही बारामतीला दिलं
शेतकऱ्यांना मदत सोडून स्वहितच केलं
का नाही केली मदत मरत्या शेतकऱ्याला
आंदोलन म्हणून तुम्ही सोंगासनच केलं

जेल भरो जेल भरो कसला जेल भरो
तुमचं घर भरून नेहमी गरीबच मरो

सत्ता धरून तुम्ही केले आपलेच घर भरो
आता म्हणता गरीबासाठी सर्वच जेल भरो
स्वार्थ फक्त सत्तेचा तुम्ही मनी राखून ठेवता
तुमचं काय अडलं कुणी जगो किंवा मरो

जेल भरो जेल भरो कसला जेल भरो
तुमचं घर भरून नेहमी गरीबच मरो

आता तरी लाज बाड़गा बोला काही खरं
दुखी गारिबांचं आता तरी करा काही बरं
तुम्ही रांगडे पोकले खाऊन चोपडं सारं
गरीबाला जेउद्याना आता तरी पोट भरं

जेल भरो जेल भरो कसला जेल भरो
तुमचं घर भरून नेहमी गरीबच मरो
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
==* दुरावा *==

तू रुसली अशी तू न हसली कधी
दुरावून तुला तू न दिसली कधी
गुंतलो तुझ्या मी आठवणीत आता
वाट परतीची तू न धरली कधी

जगलो जरीहि मी जगण्याचे जगणे
जगतांना तरीहि न जगलो कधी
काटल्या कटे ना दिवस विरहाचे
वाट तुझी पाहता न थकलो कधी

रडलो मी हसलो विचारात फसलो
नाते प्रेमाचे तू न जोडले कधी
असते शोधले शोधाया तुला मी
दिले शब्द तू मी न तोडले कधी

विसरू कसे मी ते बोलणे तुझे
न भेटण्याची अट मी न मोडली कधी
एकटा कधीचा जगतो असा मी
तुझ्या वाटी दुःख न सोडली कधी

तू रुसली अशी तू न हसली कधी
दुरावून तुला तू न दिसली कधी
गुंतलो तुझ्या मी आठवणीत आता
वाट परतीची तू न धरली कधी
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
==* निशब्द *==

शेवट शेवट कधीरे माझा थकलो या जगण्याला
शब्द संपले ओठांवरचे ..२..
मग निशब्द असा मन झाला
शेवट शेवट कधीरे माझा थकलो या जगण्याला

या जीवनाच्या घटीत गोष्टी आठवणी मज येता
डोळ्यांमधुनी अश्रू थिपकले मन आजही भरून आला
शब्द संपले आवडीचे ..२..
मग निशब्द असा मन झाला

आजवरी मी लिहित आलो ते स्वप्न शब्द मनाचे
त्या शब्दातुनी व्यक्त होणारे प्रेम या जीवनाचे
शब्द संपले लिहिण्याचे ..२..
मग निशब्द असा मन झाला

प्रेम करता अपूर्ण माझे जीवन संपून जावे
जीवनामध्ये उणीव सारखी तुझीच रडवीत आहे
शब्द संपले आठ्वणींचे ..२..
मग निशब्द असा मन झाला

शेवट शेवट कधीरे माझा थकलो या जगण्याला
शब्द संपले जीवनातले ..२..
मग निशब्द असा मन झाला

शेवट शेवट कधीरे माझा थकलो या जगण्याला
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
==* सुर्य मावळला सांज झाली *==

सुर्य मावळला सांज झाली
पक्षी सारे झोपाया गेली
सकाळपासून टवटवती फुले
आता मात्र चुपचाप झाली

दिवसभर कामाची गोंधळ
आता शांत चहाचा प्याला
दिवसा पाहून शेताची हिरवळ
मजमन आनंदाने न्ह्याला

उपाशी पोटी मुले झोपली
मनोमन तीही रडली होती
तिलाही चिंता परिवाराची
कर्जाने पाडी मरणाची होती

भाकर घेऊन शेती जाता
दृष्य पाहुनी हादरले मन
धुमाकूळ वानरांचा सारा
भासायचे जणू ते नृत्यांगन

चैत्र आला पिके कापिली
कुणा ठाऊक खेडी नशिबाची
पुन्हा नवा तो कर्ज कापाया
उणीव होती हव्या दर्ज्याची

विकाया माल बाजारी गेलो
दलालाले मग रंग भरविला
तीन चार चा भाव म्हणता
चार हजार भाव मिळाला

या वर्षांचा खर्च काढुनी
मोजका पैसा हाती आला
उद्या पुन्हा कामाची गोंधळ
आता शांत चहाचा प्याला

सुर्य मावळला सांज झाली
पक्षी सारे झोपाया गेली
सकाळपासून टवटवती फुले
आता मात्र चुपचाप झाली
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
==*  पावसाच्या सरी सारखं *==

पावसाच्या सरी सारखं बेधुंद बरसावं
कुणीतरी माझ्यासाठी मनापासून तरसावं

पावसाच्या सरी सारखं बेधुंद बरसावं
कुणीतरी माझ्यासाठी मनापासून तरसावं
जीवनाच्या ओठांवरती शब्द माझे असावे
प्रेम त्याच्या मनी फक्त माझ्यासाठी असावं

जसं जोडपं लैला-मजनू आणी हिर-रांझ्याचं
तसं जोडपं माझ्यासंगी कुणीतरी जूडवावं
पावसाच्या सरी सारखं बेधुंद बरसावं
कुणीतरी जीवन आपलं माझ्यासाठी अर्पावं

नको मला हीन भावना नको मला ते प्रेम स्वार्थी
प्रेम त्याचं जगापेक्षा गगण भेदी असावं
पावसाच्या सरी सारखं बेधुंद बरसावं
कुणीतरी जीवन आपलं ममजीवनाशी मिळवावं

स्वप्नामध्ये दूर ऊडावं थोडं हसावं थोडं रडावं
कुणाच्यातरी प्रेमामध्ये रात्रीलाही जागावं
पावसाच्या सरी सारखं बेधुंद बरसावं
मात्र त्याला प्रेमाचं पूर्ण ज्ञान असावं

पावसाच्या सरी सारखं बेधुंद बरसावं
कुणीतरी माझ्यासाठी मनापासून तरसावं
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
 ==* आई तू कुठे आहे *==

आई तू कुठे आहे मला दिसत का नाही?
झाल्या चुकांसाठी मला रागवत का नाही,
आई तू कुठे आहे मला दिसत का नाही?

रात्री उशिरा पाशिरा जेव्हा घरी गं मी येतो
कान धरून माझे मला तू मारत का नाही
मी बिघडलो कि काय काळजी नाही का गं तुला
काय करतो काय नाही चौकशी तर कर जरा

वाटतं कधी तू चुलीवर भाकर करीत आहे
बघतो त्या अंगणात आता चुलच राहीली नाही
घरी शाळेतून येता माझी वाट बघायची
मला बघून प्रेमाची कशी मिठी मारायची

मला मारायची तू गं किती लाड करायची,
माझी गं तू आई काळजी किती करायची
जग असून हि सारा कमी तुझी गं भासते
लहानपण तुझ्या विना आई व्यर्थच वाटते

देवाला विनविले मी गं अनं प्रार्थनाही केली
तुझ्यासारखी आई माया कुठे ना भेटली
तुझी माया प्रेम तुझा आता शोधू तरी कुठे
मोल प्रेमाचे गं तुझ्या आई फेडू तरी कसे

तुझी माया प्रेम तुझा आता शोधू तरी कुठे
मोल प्रेमाचे गं तुझ्या आई फेडू तरी कसे
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
==*  प्रेममंथन *==

कटता न कटे जीवन
अवघड जीवन प्रत्येक क्षण
जरी व्याकुळ अंतर्मन
करतोय प्रेमाचे जतन

म्हणून
हृदयी केले प्रेममंथन

नजानता बांधिल हृदयाशी
बघता रूप ते साधेपण
आठ्गीत येता आजही
भरून येतो अधीर मन

म्हणून
हृदयी केले प्रेममंथन

उगाच बांधून स्वप्न उराशी
अपेक्षांची राख झाली
देऊन प्रेम प्रेमासाठी
प्रेमाचीच लाज आली

म्हणून
हृदयी केले प्रेममंथन

मंथनात समजून आले
विरह नशिबी मिळाले
भिजल्या डोळ्यांनी हसण्या
मन माझे सज्ज झाले

भिजल्या डोळ्यांनी हसण्या
मन माझे सज्ज झाले
म्हणूनच
हृदयी केले प्रेममंथन
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
 ==* जातीवाद *==

जाती धर्माचा भांडण देशात आजही होतो
मी मोठा तू लहान मतभेत आजही होतो
का माणुसकी विसरून वागावे माणसाने
कधी बदलणार हे रोजच्या स्वभावाने

शिकवून गेले जगाला ते शहाणे भले
तरी आज माणसाला हे जातीने तोले
मेंदू मिळूनही वापरत नाही आज कुणी
आजही पाडतात तीच रीती रूढी जुनी

माणुसकीचाच तर विसरलो कायदा
हाकुनी राग एकतेचा काय फायदा
धर्म म्हणा जाती म्हणा भांडलो किती
तरी आपल्या मनाची तशीच नीती

माणुसकीच्या मंदिरी आजही टेकतो माथा
देव स्वरूप मानतो त्या भल्या माणसाला
फरक पडत नाही तुम्ही माफ केलं नाही
माणुसकीविना मी कोणताच धर्म मानत नाही
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
==* कुणी तरी हवा *==

वाटतं सोबत कुणीतरी राहणारा हवा
साथीला साथ कुणीतरी देणारा हवा
किती एकटं जगायचं हे जीवन
आपलं म्हणून कुणी म्हणवणारा हवा

हसेल रडेल जो जीवनभर संगतीने
भावनांना माझ्या कुणी जाणणारा हवा
शब्द माझे आवाज असावा त्याचा
प्रेमगीत संगी कुणी गायणारा हवा

आपोआप वाचून घेईल जो मनाला
अबोल्या नयनांची भाषा जाणणारा हवा
निस्वार्थ निष्पाप प्रेम करेल जो
सामावून हृदयात कुणी घेणारा हवा

रडतांना मी आसवांना माझ्या पुसणारा
जीवापाड प्रेम करत काळजी घेणारा हवा
अगं सये तूच गं माझं जीवन म्हणून
मिठीत मला कुणी घेणारा हवा
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
==* असह्य होईल *==

येत्या पावसात असह्य होईल
शेतकऱ्याला शेत पिकवायला

पाऊस यंदा लवकर येणार
परत एकदा फसवून जाणार
उणीव त्या फसलीची देवां
कंठावरी का यंदाही येणार

मर मर शेतकरी मेहनत करतो
शेतामंदी हिरवं मोती पिकवल
तरसन तो उत्पन्नाला मोठ्या
पिकलं तरी काय भाव मिळल

पहिलंच त्याला मरणाची पाडी
चालणार कशी जीवनाची गाडी
जात्यात फासावर त्याचे मैतर
चढणार किती दुःखाच्या जाडी

कर काही बळीराजा चतुराई
शेतकऱ्याला मदत जगण्याला
येत्या पावसात असह्य होईल
शेतकऱ्याला शेत पिकवायला

येत्या पावसात असह्य होईल
शेतकऱ्याला शेत पिकवायला
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
==* अबोले प्रेम *==

ओठांवर ओठ टेकलेले
श्वासात श्वास बांधलेले
करू मोकडे कसे मी
मनी विचार गुंतलेले

प्रेमाचे अबोलेच वारे
विचार शब्दांनाही आले
लिहिता न सुझे शब्द
प्रश्न प्रश्नांवर उभे झाले

सहावं निरागस मनाने
नशिबी विरह का आले
कळेना भाव तुला जेव्हा
तुझ्याशीच प्रेम का झाले

वाचता तुला न आले
शब्द भिजल्या डोळ्यातले
गमवुनी तुला सजणी
अबोले शब्द सारे झाले

बोललो कित्येक मनातले
भास तुला कधी न झाले
बोलाया शब्द ओठी  येता
निशब्द बघता तुला झाले

निशब्द बघता तुला झाले
-----------//**--
शशिकांत शांडीले, नागपूर
भ्र.९९७५९९५४५०
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
==* प्रेमपिडा *==

आसवांतून झळझळली
आठवणी धारा
आठवताच तडफडली
व्याकुळती कळा

व्याकुळ हृदयात दाटली
असहनीय पिडा
तुजसंगतीचा स्वप्न
आजही अपुरा

एकतर्फी कहाणी लागली
दम टाकायला
विचारांवर माझ्या लागले
विचार पडायला

विश्वास करून जीवनाचा
विश्वासघात झाला
जीवापाड केल्या प्रेमाचा
कसा अपघात झाला

तुटली जी बांधली होती
तुझ्या परतीची आशा
तुझ्या माथी सजलेल्या
कुंकवावर नांव दुसऱ्याचा

तुझ्या माथी सजलेल्या
कुंकवावर नांव दुसऱ्याचा
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
==* तू असतीस तर *==

तू असतीस तर
झाले असते क्षण दूर एकांताचे
तू असतीस तर

दिसले न कुणी असे नाही
तुझविन कुणी जचले नाही
करत टाईमपास छळणं कुणाला
प्रेम आजचे जमले नाही

तू असतीस तर
झाले असते सौभाग अभागाचे
तू असतीस तर

जगतो मी विरही रडतांना
हर्ष तुला हसता बघतांना
निभावतो मी प्रेम हे माझे
दुख झाले तुझ्या दूर जातांना

तू असतीस तर
झाले असते हसणे कधी सुखाचे
तू असतीस तर

काय मनी तुझ्या तेच कळेना
प्रेमाची नीती काय माहिती
आशेवर जगतो आहे तू सुखी
काय जीवनी काय माहिती

तू असतीस तर
झाले असते फेडणे या जीवनाचे
तू असतीस तर

वाटून घेऊ नको मी विसरेन
श्वास देहाचा मानलं तुला
विसरून क्षणभरही जगवेना
शेवट होईल विसरता तुला

तू असतीस तर
झाले असते सार्थक या जीवनाचे
तू असतीस तर
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
 ==* कट्टरवाद *==

तुमच्या बोलण्यातच वाटतं
तुम्ही कट्टरवादात जगताय
स्वतःला वानवीत फक्त
टिंगल टोला मारू बघताय

तुमच्या सारख्या माकडांच्या
जाणतोय आम्हीही भावना
विसरू नका आम्हीच म्हणून
करतो तुमची आवजावना

बोलत नाही आमचा कायदा
म्हणून तुम्ही घेता फायदा
शांतीप्रिय म्हणून शांत आम्ही
खंबीर अंताचा आमचा वायदा

करा हवी ती तुम्ही मुजोरी
कुदाल किती भिकेच्या थाली
काहाड़ू तुमचीही मस्ती आम्ही
ठरतो कोण बघूया तुझा वाली

तुमच्या बोलण्यातच वाटतं
तुम्ही कट्टरवादात जगताय
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
 ==* पाऊस पडतोय *==

आज पाऊस पडतोय
नी मनात काटा रुततोय
काटा रुततोय तो तुझ्या आठवणीचा, विरहाचा

अश्याच पावसात दोघे ही
हसायचो खेळायचो संगी मिरवायचो
संगतीनं जगायचो

आज पाऊस पडतोय
नी मनात काटा रुततोय
काटा रुततोय तो गेल्या क्षणांचा, व्याकुळ्तेचा

पावसाळा सरतांना
तुला गमावतांना आठवतो पाऊस
तुला दुरावतांना

आज पाऊस पडतोय
नी मनात काटा रुततोय
काटा रुततोय तो माझ्या हरण्याचा, एकटेपणाचा

पाऊस येतो आजही
तू मात्र येत नाही
आपलंसं कुणी का वाटत नाही

आज पाऊस पडतोय
नी मनात काटा रुततोय
काटा रुततोय अश्रूंनी भिजवणारा, सतावणारा

आज पाऊस पडतोय
नी मनात एक काटा रुततोय
काटा रुततोय तो रोजचं जगण्याचा, रोजचं मरण्याचा
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
 ==* मी नास्तिक *==

आज पाहिला मी मुव्ही पिके
खरच नाही त्यात काही नॉट ओके
मुव्हीत जर होते सारे खोटे नाटे
देव मग मला का दिसत नाही कुठे

चर्चमध्ये प्रार्थना मी केली
मंदिर मस्जिद मध्ये ही गेलो
दिसला नाही देव कुठे तो
मूर्ख अंधश्रध्हेपाई झालो

कां ढोंग करतो देवाचा मी
धर्मनाद करतो धर्माचा
माणुसकी विसरून फालतू
अंधविश्वास हा श्रद्धेचा

मंथन केला विचाराने
आवाज दिला मनाने
शोधतो देव दगडातून
मस्तक वाकले भीतीने

निर्णय नास्तीकपनेचा
वैचारिक हृदयाने मी केला
निर्भय शांत मन म्हणतो
योग्यतेचा निर्णय योग्यतेने केला

निर्भय शांत मन म्हणतो
योग्यतेचा निर्णय योग्यतेने केला
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
 ==* खेळी जीवनाची *==

पाहून थकलो वाट पावसाची
पेरणी कधीच झाली
भिजून चार दिसाच्या पावसानं
कोरडी जमीन झाली

रक्ताचं पाणी केलं शेतमाळ सजवायला
अजून पाऊस नाही, कठीण पिक जगवायला
आस नाही मेली पाऊस पडेल म्हणून
विश्वास मेहनतीवर त्याचं सोनं घडवायला

कां अत्याचार दरवर्षी होतो
खेळ अंतकरणावर येतो
मरावच शेतकऱ्याने झुरत
कधी सौभाग्य नशिबी येतो

तरसलीत डोळे बघाया हिरवळ शेताची
नको आणू पाडी देवा मजबुरीनं मरण्याची
कटती दिवस रात्र उपासमारीत सारखे
कां करतो तू खेळी या गरीब जीवनाची

कां करतो तू खेळी या गरीब जीवनाची
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
==* लहानपण *==

लहानपण नव्हतच माझं लहानपण
कमी वयात शिकावं लागलं शहानपण
जिंदगी गेली कामाच्या ओझ्याखाली
सकाळी पेपर न दिवसा चहाची पाळी

लहानपण ते माझं मी जगू न शकलो
सोन्याच्या दिवसाला साठवू न शकलो
मलाही आवडायचं खेडायला विठी दांडू
पण किस्मतच माझी हि निघाली पांडू

आईची तब्येत न बाबाला मदतीची चिंता
लहानपण असच गेलं माझं झुरता मरता
आज जरी झालो मोठा कष्टानं जिद्दीनं
लहानपण ते आजही माझ्या संगतीनं

आजही दिसतं लहानपण त्या कट्ट्यावर
पेपर चहा वाटणाऱ्या मुलाच्या चेहऱ्यावर
कारण
लहानपण नव्हतच माझं लहानपण
कमी वयात शिकावं लागलं शहानपण
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
 **************************************************
==* चांग भलं *==

त्राही त्राही जिकडे तिकडे
नजर साऱ्यांची ढगाकडे
ढग अपुरे आकाश मोकळा
निवद लावले देवापुढे

देव ना ऐके हाक जीवाची
पाडी का येई मरणाची
लिहिलं तरी काय नशिबी
वेळ ओढवली सरणाची

मर मर करून पेरणी केली
दाव किरण आशेची देवा
कर्जापाई फास गळ्याशी
यंदा तरी तू पाव देवा

नको करू कुणाची दैना
होऊदे काही तरी भलं
देव म्हणून दाव देवपण
विठ्ठल नावानं चांग भलं

विठ्ठल नावानं चांग भलं
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
==* गुरु *==

गुरुजनांचा जीवनामध्ये वाटा फार मोठा
या जीवनाचे वळण वेगळे कारण गुरूच आहे
गुरु शिकवितो विद्यार्थी शिकतो त्यातून ध्येय होतो
गुरुविणारे या जगण्याला कसले अर्थ आहे

जणू नरकाच्या जीवनाभूवती एक द्वार स्वर्गाचे
गुरुजनांच्या चरणकमली विद्यार्थ्यांचे स्वर्ग आहे
एका एका वळणावरती मार्गदर्शी बाण त्यांचे
रस्ता त्या द्वाराचा फक्त गुरूंनाच माहित आहे

त्या बाणाच्या दिशेवरती आपण शिकत जातो
कित्येकाने सहजतेने मिळवले स्वर्ग आहे
गुरु शिकवितो विद्यार्थी शिकतो त्यातून ध्येय होतो
गुरुविणारे या जगण्याला कसले अर्थ आहे

गुरुविणारे या जगण्याला कसले अर्थ आहे
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
==* स्वातंत्र्य लिहा *==

शब्दाने रंगलेली रांगोळी
उड़वा असत्याची गोंधळ
लोटला काळ सोसण्याचा
सज्ज करा लढाया लेखन

सत्य मांडा सत्यच पटवा
सर्वांच्या मनी बळ साठवा
वेळ आली जिंकण्याची
लेखनेची शक्ती दाखवा

काय घाबरायचं चोरांना
मुक्त करा अबोल मोरांना
बस झाली सहनक्षमता
लिहा गरीबांच्या हक्कांना

आता हवा नवा स्वातंत्र्य
लेखनाची वापरूनी तंत्र
शब्द शब्द हे बोलतील
भारत माझा एकमंत्र
-------------//**--
शशिकांत शांडीले, नागपूर
भ्र.९९७५९९५४५०
**************************************************
 ==* नागपंचमी *==

नका नका मारू त्याला शेतकरी सोबत्याला
इकडे देव देव करता मग मारता कशाला
लई करून करुण एका दिसाची भक्ती
मग वर्षभर कामं संपवण्याचं करता त्याला
नका नका मारू त्याला !

माणूस म्हणून वाणवी सर्व आपापल्या परी
अहो चुकीने तर येतो कधी कधी तुमच्या दारी
का मानावी तुमची हि आगाऊ हो नीती
आंधळ्या डोळ्यांनी राखता परंपरेची शिदोरी
नका नका मारू त्याला !

तो हि प्राणी आपल्यावानी आहे याच भूमीचा
चला त्याला ही देऊया अधिकार जगण्याचा
विष काढून काढून निशस्त्र त्याला केला
हक्क त्यालाही हो राजे आहे स्वरक्षणाचा

नका नका मारू त्याला शेतकरी सोबत्याला
इकडे देव देव करता मग मारता कशाला
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************

No comments: