लेख :


१. महिला दिवस .........

नमस्कार मित्रांनो

नाही म्हणजे माझ्या तर्फे सर्वांना या दिवसाच्या शुभेच्छा आहेच पण फ़क्त आजच्या दिवस महिलांचा आदर करून भागनार आहे का? आजच्या दिवशी समजा सनी लियोनी पुरुषांसमोर आली तर पुरुष तिचा तितकाच आदर करणार आहेत ना जितकं इतर महिलांचा करतात? जरी तिने आज कपडे कसलेही घातले असावे , पण आज पुरुष तिच्या कड़े वाईट नजरेने पाहणार नाही ना?
मला एक कळत नाही आपण इतका देखावा का करतो नेहमीमाझी आई आई माझी बहिन बहिन मग इतर महिला कुणाची आई बहिन नाही कापुरुष म्हंटलँ तर काहीही करण्याची आणि कसेही वागण्याची प्रवृत्ती नव्हे, पुरुषांनी फ़क्त आजच्या दिवस महिलांचा मान करून चालणार नाही तर दर दिवशी महिलांना तिचा स्थान दिलाच पाहिजे.
बलात्कार अशिक्षित आणि दारुडा व्यक्तीच् करतो का हो, श्रीमंत, उच्च शिक्षित आणि उच्च विचारांचे व्यक्तिमत्व कधीच कुण्या महिला विषयी वाईट विचार करत नाही असेच म्हणावे का? सापडला तो चोर पण बाकी कायमुलाने कुकर्म करावे आणि श्रीमंत बापाने पैशांच्या बळावर न्यायप्रणालिहि विकत घेऊन आपल्या मुलाला सोडवले नसेल इतका महान आपला देश नाहीच. सर्वांना माहिती आहे की आपल्या देशात महिलांची स्थिति काय आहे, मग हा सोंग, हा देखाव का व्हावा माझ्या बोलण्याचे वाईट अजिबात मानु नए आणि मानलेही तरी मला फरक पडत नाही. महिलांनी महिलापन जपावेपुरुषांनी पुरुषपन जपावे हेच म्हणेन.
एक लुगड़ं किंवा साडी घालनारी स्त्रीला भरपूर मान मिळावा आणि एक ब्रा पैंटी घालणाऱ्या बाई कड़े वाईट नजरेने बघावं हाच का मानुसपण आपलादोघांकडे बघण्याचा दृष्टिकोण वेगळा का असावा, हेच कळत नाही. सर्व आपल्या परीने ठीक आहेत ना, शेवटी परिधान आहे तो भारताचा आणि जर या कापडातील महिला चांगल्या नजरेने बघवत नसेल तर मग भारतात याची विक्री का व्हावी? आणि जर विक्री होत आहे तर आपण ही कापड़ं नेसणाऱ्या महिलांकडे वाईट नजरेने का बघावंसम्मान सर्वांचा व्हावा अन्यथा एक रामाचा आणि एक शामाचा होऊ नए....
आजची नारी क्रांतिकारी पुरुषांसोबत पाऊल टाकत समोर चालली आहे आणि आपल्या मेहनतीने आपले श्रेष्ठत्व सिद्ध करीत आहे. फ़िल्म इंडस्ट्री मधल्या महिला चड्ड्यांवर नाचत आहेत आणि याचीच पाहणी देशभरातील मूली- महिला वागत आहे. वावगं काहीच नाही पण मा. महिलांनो एखाद्या व्यक्तिने जर तुमच्याकडे नजर वर करून बघितले तर वाईट मानु नका कारण पुरुषांची गरज महिला आणि महिलांची गरज पुरुष हा नियम आहे. अहो हार्मोन्स लोचा आहे त्यापासून कोण वाचलयपुरुष शांतपणे आपल्या कामावर जाण्याकरिता बस स्टॉप वर उभा असेल आणि छोटी छोटी चिंध्याचे कपडे घालून एक मुलगी तिथे यावी आणि या माणसाने आदर पूर्वक तिला बघावं इतके महान विचार कुठल्या व्यक्तीचे असेल असं मला तरी वाटत नाही. म्हणून प्रत्येकाने आपली एक मर्यादा बांधुन जगावे तसेच मान सम्मान आणि आदर मिळवून घेण्यासाठी मानपूर्वक वागावे हीच विनंती.
परत सर्व आई बहिणींना आजच्या महिला दिना निमित्त मानाचे नमन…… 

स्त्री तू जप तुझे स्त्रीत्व
वाकणार नाही पुरुषत्व
पुरुषा महिला अर्धांगिनी
जीवनाचा आधारस्तंभ
धन्यवाद!
----------------//**--
शशिकांत शांडिले, नागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
२.  कुठं संडासं संडासं .........

नमस्कार मित्रांनो,
 दि.१८/०१/२०१६ ला मी पुण्याहून नागपूर करिता बसद्वारे प्रवास सुरु केला. पहाटे ५ वाजताच्या दरम्यान माझी झोप उघडली आणि मी बस चालकाच्या बाजूला येऊन बसलो. सकाळचा थंड वारा आणि हलकेच उजाडता दिवस, सूर्याचा प्रकाश हळू हळू धरणीला प्रकाशित करत होता. इतक्या सकाळी सकाळी बसचा प्रवास म्हंटलं तर खूप छान वाटत होतं. बस समोर चालत राहली आणि वाटेत येणारे दृश्य मी बघत होतो आणि असेच एक दृश्य माझ्या नजरे समोर आले ज्यामुळे वाटलं कि, काय खरच आपला भारत देश विकास करतोय? ते दृश्य म्हणजे, रस्त्याच्या कडेला उघड्यावर बसलेल्या बाया एकीकडे सरकार द्वारे हागणदारी मुक्त गावं म्हणून कोट्यवधी रुपये खर्च केल्या जाते, देश विकासाची गोष्ट करीत आहे आणि दुसरीकडे आपल्या आय - बहिणींना आजही उघड्यावर जावं लागतंय. मग यालाच विकास म्हणायचं का? ते चित्र बघितले आणि अचानक माझ्या मनात बहिणाबाई चौधरी यांची "अरे संसार संसार" या कवितेच्या चालीवर २ ओळी सुचल्या त्या खालीलप्रमाणे.

"कुठं संडासं संडासं हागणदारी मुक्त गावं
हागे रस्त्यावरं बाई हाचं देशाचा विकासं //२//"

मी लिहिलेले शब्द तुम्हाला जरी वाईट वाटत असले तरी ते या विकासनशील भारत देशाचे कटू सत्य आहे. सदर शब्दावर वाईट वाटण्यापेक्षा जर कुणाला लाज वाटत असेल तर मला आनंद होईल. सर्वांना माहित आहे कि, वास्तव स्थिती काय आहे पण तरीही सर्वीकडे डोळेझाक चालली आहे. जरा काही झालं कि, आपण फक्त सरकारच्या नावाने दगड फोडतो पण आपण या देशाकरिता काय करतोय याचा विचार कुणीच करीत नाही. आपल्याला फक्त एकच गोष्ट चांगल्याने जमते आणि ते आहे गोष्टी, आपण फक्त गोष्टी करतो, पण कर्म नाही. मला काय , माझं काय, मी करणार काय, बस इतकंच.  चहाची टपरी असो वा चौक असो आपण फक्त गोष्टी करतो. गोष्टी विकासाच्या, आधुनणीकीकरनाच्या  आणि जगाला मागे सोडण्याच्या पण मी त्या दिवशी जे बघितलं ते आधुनिक नव्हतंच, ते चित्र म्हणजे मला माझ्या भारत देशाची औकात दाखवीत होती. सरकार काय करतीय, श्रीमंत काय करतीय मला त्याच्याशी घेणे देणे नाही, मला फक्त तुम्हाला विचारायचं आहे कि, तुम्ही काय करताय?
सरकारची चूक असेलही, पण सरकारने जर स्वच्छता अभियान सारखे धोरण हाती घेतले तर आपण त्याला किती सहकार्य करतो, हा विचार करायला नको का? असो, सर्वांना सर्व काही माहित असूनही आपण फक्त देशासाठी समर्पित असल्याबद्दलचा देखावा करीत असतो, त्याव्यतिरिक्त आपण काहीही करू शकत नाही. आणि आज मी बिनधास्तपणे म्हणू शकतो कि , भारत देशाचे सुधारणे आणि या देशाचे पूर्ण विकास होणे अशक्य आहे.

(बहिणाबाई चौधरी यांची "अरे संसार संसार" या कवितेच्या चालीवर २ ओळी सुचल्या आणि त्यावरूनच मी खालीलप्रमाणे रचना पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे.)

कुठं संडासं संडासं हागणदारी मुक्त गावं
हागे रस्त्यावरं बाई हाचं देशाचा विकासं //२//

कुठं संडासं संडासं बघा माह्या भारत देशं
कुठं संडासं संडासं बघा माह्या भारत देशं
घरी दिसे ना संडासं हा कसला विकासं

कुठं संडासं संडासं --------------------

कुठं संडासं संडासं कसं लाजते सासरं
कुठं संडासं संडासं कसं लाजते सासरं
किती वर्ष झाले तरी आपले तेचं विचारं

कुठं संडासं संडासं --------------------

कुठं संडासं संडासं माणूस गेला चंद्रावरं
कुठं संडासं संडासं माणूस गेला चंद्रावरं
दिसे रसते गावाचे पोवटयाने सजूनं

कुठं संडासं संडासं हागणदारी मुक्त गावं
हागे रस्त्यारं बाई हाच देशाचा विकासं

टिप :- कुणाच्या भावना दुखावल्यास क्षणभर स्वतः विचार करावे.
----------------//**--  
शशिकांत शांडिलेनागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
१.   शिक्षण व्यवस्था .........

नमस्कार मित्रांनो,
 आज भारतातील शिक्षण व्यवस्थेबाबत बोलायचा विचार आहे.
 नाही, तशी आजच्या शिक्षण व्यवस्थेची देशात कायपरिस्थिति आहे ते कुणाला सांगण्याची गरजच नाही, परंतु काहि बोलल्याविना आणि काही केल्याविना कुठला सुधारही शक्य होत नाही म्हणून आज या विषयावर बोलणं गरजेचं वाटतं.
मित्रांनो, शिक्षण म्हणजे एका चांगल्या भविक्षाकडे वाटचाल करण्याची शुरुवात आणि शाळा म्हणजे त्या वाटचालीस बळ देणारा मार्ग. परंतु राजकीय प्रभुत्व आणि स्वार्थ अशा गोष्टींमुळे आज शिक्षण व्यवस्था विस्कटलेली आहे आणि सामान्य माणसांना पाहिजे तसा या व्यवस्थेचा फायदा होतांना दिसत नाही, फायदा होत नाही अश्यातला भाग नाही कारण मुलं शिकताहेत, पण ते कशा पद्धतीने शिकत आहेत, त्यांना हव्या त्या सुविधा मिळतात का? ते घेत असलेले शिक्षण योग्य पद्धतीने शिकवण्यात येत आहे का? याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. एक शिक्षक आज शिक्षक कसा बनतो त्याला त्याकरिता किती पैसा खर्च करावा लागतो हेही विसरून चालणार नाही. आज शिक्षकाच्या नोकरीकरिता जवळपास २० ते २५ लाख रुपये बाजार भावाने संस्थापकाला द्यावे लागतात अन्यथा रिकाम्या हाती तुम्हाला या विभागात कुत्राही विचारत नाही. माफ करा शब्द चुकीचे वाटू शकतात पण जे आहे ते सत्य आहे.
संस्थापक एक शाळा उघडण्याकरिता हवा तितका पैसा ओततो कारण त्याला माहित आहे कि, सरकारद्वारे जेव्हा पूर्ण अनुदान मिळेल तेव्हा दुप्पट तिप्पट दराने पैसे वसूल करता येतात. नियमाने जरी या कामाकरिता जास्त पैसा हवा नसला तरी त्याबातची नस्ती (File) लवकरात लवकर मान्यता प्राप्त होण्याकरिता, या त्या टेबलावरून लटकत न जाता सरळ काम व्हावे याकरिता लाचखोरी उत्तम पर्याय आहे, आणि हे सत्य नाकारता येत नाही. शाळा स्थापित करण्याकरिता पैसा तर लागतोच पण सोबतच ओळखी लागते म्हणून हा खर्च राजकीय पुढारी किंवा व्यवसायिक लोकंच करू शकतात. तेव्हा साहजिक आहे की, शाळा या श्रीमंत लोकांच्याच् राहतील. नंतर हेच संस्थापक शाळेला पूर्ण अनुदान प्राप्त झाल्यानंतर शिक्षकांच्या जागेकरिता लाखो रुपये मोजून घेतात. वाढती बेरोजगारी आणि खांद्यावरची जबाबदारी म्हणून ज्यांच्याकडे शिक्षक या पदाकरिता मोजायला पैसे असतात ते पैसे देऊन हे पद मिळवतात आणि मी पैसे दिले तेव्हा मला आता कुणी काढू शकणार नाहीच आणि मी आता मेहेनत का घ्यावी म्हणून शिक्षक आव-जाव हि प्रवृत्ती आत्मसात करतो. ज्या व्यक्तीकडे पैसा नसतो तो व्यक्ती एकतर एखाद्या विना अनुदानित शाळेमध्ये हजार-दोन हजाराने काम करतो नाहीतर दुसऱ्या कुठल्या पर्यायाकडे बघू लागतो. विना अनुदानित शाळेमध्ये मानधन पद्धतीने शिक्षक म्हणून काम करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी नवी भरती द्यावी लागते, जेणेकरून त्याने संबधित शाळेवर दबाव आणायला नको कारण तीन वर्ष एकाच शाळेत जर शिक्षक शिकत असेल तर त्याला त्या शाळेत पूर्ण अनुदान प्राप्त झाल्यास पदावर घेणे गरजेचं आहे, आणि यामुळे शाळेच्या संस्थापकाचं लाखोंनी नुकसान होतो. म्हणून दरवर्षी एकाच शिक्षकाला नवीन भरती म्हणून दाखविल्या जाते.
शासकिय शाळांची व्यवस्था अधिकच दयनीय आहे आणि राजकीय पुढारी या शाळेंकडे फारसा लक्षही देत नाही कारण त्यांना यामुळे काही फायदा होत नाही. आज डॉक्टर, इंजिनिअर अशा अनेक उच्च पदाकरिता लक्षावधी रुपये मोजावे लागतात, शाशकीय शिक्षण चांगले नसल्याने सर्व खाजगी शाळा-महाविद्यालयाकडे धाऊ लागलेत. वरून शाशकीय शाळा किंवा महाविद्यालयात आरक्षण नीतीमुळे कित्येक गुणी मुलांना खूप मेहेनत घ्यावी लागते, शाळेत दाखला मिळावा म्हणून प्रयत्न करावा लागतो. शासकीय पदाकरिता सुद्धा आरक्षणाप्रमाणे पद वाटल्या जातात. मी असं म्हणत नाही आरक्षण वाईट गोष्ट आहे परंतु निदान शाळेमध्ये, शाशकीय नोकरीमध्ये, पदोन्नतीमध्ये जातिगत आरक्षण नकोच, कारण कित्येक पदावर अयोग्य व्यक्तींना फक्त त्याच्या जातीच्या आधारावर पदोन्नती व नोकरी मिळते. आणि मेरीटमध्ये येणाऱ्या विद्यार्थांना त्या नोकरीपासून आणि सक्षम अधिकाऱ्याला पदोन्नतीपासून वंचित राहावं लागतं आणि कितीही नाकारलं तरी हे सत्य आहे.
जगात वाढत्या स्पर्धेमुळे सर्व पालकांना वाटतं की आपलं मूल मोठ्या व नामी शाळेत शिकायला हवा, उच्च पदावर नोकरीला लागावा पण तसं जास्त प्रमाणात होत नाही, हे या भारत देशाचं दुर्भाग्यच. एकीकडे वाढती लोकसंख्या भारताला परवडणारी नाही वरून अशिक्षितपणा विकासकार्याला गती देत नाही. मुल जन्माला आलं कि, बापाच्या मनामद्ये आनंदासोबतच वाढणाऱ्या खर्चाची चिंता दाटून येते.  शिक्षणाचा खर्चनोकरीकरिता लागणारा खर्च. गरीब व्यक्ती इतके नियोजन कुठल्या आधारावर करेल किंवा करतोय हाच विचार करण्याचा विषय आहे. गरीब व्यक्तीची आर्थिक स्थिति बरी नसल्या कारणाने त्यांच्याकडे पर्याय उरत नाही तसेच खाजगी शाळांचा खर्च अक्षरशाहा झेपनारा नाही. तेव्हा "चलती का नाम गाडी" या मतावर त्यांना शासकीय शाळेमार्फत काम चालवावं लागतं.
ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांनी जे स्वप्न भारतासाठी बघितलेलं होतं, ते कुठेतरी अपूर्ण आहे आणि त्यात सुधार व्हायलाच हवा.  एकीकडे देशात श्रीमंत श्रीमंत होत चाललाय आणि गरीब गरीब. खाजगी शाळांची भरमार झालेली आहे , शिक्षण मंडळ बिंधास्तपणे शाळांचे लायसेन्स वाटत आहे, खरच एका शहराकरिता किंवा गावाकरिता इतक्या शाळांची गरज आहे, " एक नाही धड आणि लगन गावभर " अशी परिस्थिती आहे. शाळा कमी असल्या तरी ठीक पण शिक्षण हे योग्य असायला हवं.
लहान असतांना गुरुजी आम्हाला चूक झाल्यास मारायचे, आम्ही गुरुजींना घाबरायचो, आता घाबरल्या पोटी म्हणा कि काही पण आम्ही अभ्यास करायचो पण आमचे  आई - वडील कधी शाळेत शिक्षकांविरुद्ध तक्रारी घेऊन गेले नाहीत परंतु आजचे पालक म्हंटल तर आपल्या मुलांना फुलासारखे जपतात. चांगली गोष्ट आहे पण शिक्षकांनी जर मुलांना जरा मारलही तर त्यात चीड्ण्याजोगं असं काय आहे. शिक्षक हे विद्यार्थांना शिक्षा करू शकतात, कोणत्या मुलाला शिक्षणाची वळण लावण्याकरिता कधी कधी हेही करावं लागतं पण आज आई वडील सरळ शाळेत शिक्षकाची तक्रार करतात . अहो तुम्ही तुमच्या मुलांना कधीच मारत नाही का? मारतात ना? जर तो काही चुका करतो तर तुम्ही त्याला नक्कीच मारता न? मग शिक्षकाने त्याला थोडं मारलंहि तर त्यात इतकं काय चुकलं.
असो , खरं तर पायवा मजबूत नसेल तर घरही टिकाऊ राहत नाही. तसेच शिक्षण नसेल तर जीवनही योग्यप्रकारे घडत नाही आणि असेच राहले तर गरिबी कधीही या देशातून मिटणार नाही आणि शिक्षित - अशिक्षित प्रमाणेच  टिकून राहील ती श्रीमंती - गरिबी.
शिक्षणाच्या क्षेत्रात खूप काही बदल होणे आणि योग्य कार्यप्रणाली लागू होणे अपेक्षित आहे.

धन्यवाद!
----------------//**-- 
 शशिकांत शांडिलेनागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************
१.   न्यायव्यवस्था .........

नमस्कार मित्रांनो,
 भारत देशातील न्यायव्यवस्थेबाबत आज जरा बोलावसं वाटतं. मित्रहो आपल्या देशातील न्यायव्यवस्थेबद्दल सर्वांचे आप-आपले मत आहेत आणि तसे स्वातंत्र्य सुद्धा भारतीय घटनेने दिलेले आहेत. 
"न्यायव्यवस्था" म्हणाल तर माणसासमोर एकच विचार येतो कि, आपल्याला या न्याय व्यवस्थेमुळे आपले हक्क सुरक्षित राहून, आपल्याला न्याय मिळेल. भारता सारख्या बलाढ्य देशात अनेकदा असं दिसून येतं कि, काही प्रकरणात या न्याय व्यवस्थेमुळे अन्याय केल्या जातो. मी असं म्हणत नाही कि, भारतीय न्यायव्यवस्था योग्य नाही, परंतु हि न्यायव्यवस्था जरा पांगळी झालेली आहे, असं वाटत नाही का? कदाचित मी जे बोललो कि, न्यायव्यवस्था पांगळी झालेली आहे, यावर नक्कीच तुम्हाला माझा राग आला असेल. शक्य आहे, कारण याबाबत मला विरोध किंवा टीका करण्याचा अधिकार नाही. कारण न्यायव्यवस्थेवर बोलण्याचा अधिकार कुणालाच नाही आहे, न्यायव्यवस्थेद्वारे घेतलेला निर्णय सर्वोपरी आहे, असंच आपण ऐकतो.
चला तर मग या न्यायव्यवस्थेचा अपमान न करता मी अभिमानाने या न्यायव्यवस्थेची गौरव गाथा म्हणतो आणि या न्यायव्यवस्थेपासून मला किती आनंद मिळतो ते व्यक्त करतो. आपल्या भारत देशात काही महान व्यक्तिमत्वाचे गरीब हितचिंतक आप-आपल्या सोयीनुसार, भारताच्या पांगळी नसलेल्या (तुमच्यामते) न्यायव्यवस्थेला खांदा देतात आणि आपले हित साध्य करून घेतात.  त्यामुळे सर्व गरीब हितचिंतक आनंद व्यक्त करतात. भारतातील गरीब जनताच काय तर पाकिस्तान मधील गरिबांनाही या न्याय व्यवस्थेमुळे न्याय मिळतो आणि हि आपल्याला गौरव करण्याची बाब आहे. उगाच आपण या गरीब लोकांना गुंड , असामाजिक तत्व , आतंकवादी अश्या अनेक वाईट नावाने उच्चारतो, हे तर त्यांचे महान व्यक्तिमत्व आहे. त्यांना न्याय किंवा दया किंवा सूट मिळायलाच हवी आणि आपली न्यायव्यवस्था या सर्व महान व्यक्तींना त्यांचे योग्य हक्क मिळवून देते. हो कधी-कधी चुकीने एखाद्या वेळी एखाद्या गरिबाला फाशी किंवा शिक्षा देण्यात येते पण काय करणार चूक मानवच करतो, मग त्या न्यायव्यवस्थेमध्ये माणसंच निर्णय घेत असतात आणि माणसं देव नाहीत त्यामुळे चूक होणे साहजिकच आहे. पण असला प्रकार फार कमी दिसून येतो, नाहीतर या न्यायव्यवस्थेद्वारे कुण्याही गरिबावर अन्याय होत नाही आणि श्रीमंत लोकांना, गरीब बेईमान लोकांना बरोबर शिक्षा मिळत असते. 
या महत्वाच्या गरीब महानुभाव हितचिंतक लोकांना न्याय मिळवून देण्यात महत्वाचा वाटा असतो तो वकील या पदाचा, वकील म्हणजे कुणाला कसं वाचवायचं आणि कुठल्या खटल्यात कसे न्याय मिळवून द्यायचे हे या वकील वर्गाला योग्यप्रकारे माहित असते कारण त्याचीच शिक्षा त्यांनी घेतलेली असते. सर्वच वकील बेईमान नसतात पण काही असतात जे या गरीब हितचिंतकाच्या हित करण्याचे नकारतो आणि या देशातील श्रीमंत लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करतात पण बघितलं तर जास्तीत जास्त वकील लोकं इमानदार आहेत आणि ते या देशातील हितचिंतकांचे हित साध्य करतात, कसलेही प्रकरण असुद्या श्रीमंत लोकं या गरीब महान लोकांवर कितीही आरोप लावत असेल किंवा साक्ष देत असेल तरी हे महान वकील सर्व दुखी गरीब लोकांना न्याय मिळवून देण्याचे कार्य करतात आणि ते पैसे अजिबात घेत नाही, कारण फार इमानदार असतात ते] असं म्हणायला हरकत नाही. तुम्हाला काय वाटतं ?
या परिस्थितीत श्रीमंत व्यक्ती फक्त विचार करीत नि रडत बसतात कि , मला मिळाला नाही म्हणून. अहो त्या श्रीमंतांना न्याय कसे मिळेल कारण न्याय तर या गरीब हितचिंतकांनाच मिळेल ना कारण त्यांच्याकडे इमानदार वकील असतात जे इतकी मेहनत घेतात , गरीब लोकांचे मदतनीस साक्ष देत असलेल्या साक्षदारांना प्रेमाने  समजावण्यात येते कि साक्ष देऊन श्रीमंत लोकांचं भलं करू नका म्हणून. मग न्याय हा गरिबांनाच मिळेल ना. आता श्रीमंत लोकांना रडत ओरडत बसण्याशिवाय कामच कोणते आहेत? हे गरीब महानुभाव देशहिताचा किती विचार करतात, ते तर माहित आहेच सर्वांना.
एकदा पाकिस्तानमधून काही गरीब लोकं भारतात घुमायला आले असतांना त्यांना भारतातील बेइमान पोलिसांनी गोळीबार करून शहीद केले आणि एकाला अटक केली, एका बॉम्ब हल्याचा आरोप त्यांवर लावण्यात आला. हा कसला न्याय आहे? काय गरज होती या बेईमान पोलिसांना असं काही करण्याची? सोडून द्यायला हवं होतं ना त्यांना. ते महान लोकं होते. असो, पण या देशातील महान हितचिंतकांनी पूर्णपणे त्या पाकिस्तानी व्यक्तीची छानपैकी कोट्यावधी रुपये खर्च करून खातरदारी केली, रोज चिकन , मटन , आणि काय काय खाऊ घातले. काही वर्षांनी अचानक एकदिवस त्या व्यक्तीला फाशी दिल्याची बातमी ऐकली पण काहींना शंका आहे कारण त्या पाकिस्तानी व्यक्तीला डेंगू हा असल्याची बातमी मिडीया मध्ये दाखविण्यात आली होती. काय माहिती कि, त्याला फाशीवर लटकावले कि तो डेंगू या आजारेने मेला? काहीतरी चुकलं कदाचित, नाहीतर त्याच्यावर हा अन्याय झालाच नसता. शेवटपर्यंत या देशातील महान हितचिंतकांनी त्याची आवभगत केली असती, कितीही खर्च होऊ द्या. काही श्रीमंत लोकं उगाच म्हणतात कि, धन्य त्या मच्छराचे ज्याने त्या आतंकवाद्याला डसून मारून टाकले नाहीतर अजून किती रुपये त्याच्यावर या गरीब लोकांनि खर्च केले असते आणि त्याला पोसून ठेवले असते. हे एकच प्रकरण नाही असे अनेक प्रकरण आहे ज्यात फक्त नि फक्त या हितचिंतकांनाच न्याय मिळाला आहे, श्रीमंत आजही रडत बसलेले आहेत. आहे ना गर्व करण्याची बाजू ? म्हणून मी या न्याय व्यवस्थेला मनापासून मानतो आणि पूर्ण सन्माम करतो.
या देशातले श्रीमंत लोकं उगाच ओरडतात कि, न्यायव्यवस्थेत न्याय होत नाही म्हणून अहो या श्रीमंतांनी समजायला नको का? कि, हे सर्व हितचिंतक आहेत आणि देशाच्या हिताचेच कामं करतात म्हणून. न्यायव्यवस्थेत देशाचे हितचिंतक लोकं पोलिस, वकील, जज, राजकारनिक यांचेही हित बघितात. असं नाही कि, कुणाचे लक्ष ठेवत नाही म्हणून. कारण ते महान व्यक्तिमत्व असतात मग न्यायालयाला त्यांचे म्हणणे मानावेच लागतं. देशातील हे काही महान लोकं देशाच्या हिताचेच कामं करीत आहेत.
आता कोणत्याही श्रीमंताने या गरीब महान लोकांना गुंड, आतंकवादी,म्हणू नये कारण काही साक्ष राहत नाही, साक्षदार असले तर आपोआपच काय होतं तर काय माहित , साक्षदार आपली साक्ष बदलवून देतात किंवा आपोआप ते अपघातात किंवा वेगवेगळ्या कारणाने मरून जातात मग श्रीमंत लोकांचे खटले चुकीचे नाही का? हितचिंतकांचे नेहमी हित होते कारण ते महान कामं करतात, याबद्दल श्रीमंतांना बोलण्याचा काहीच अधिकार नाही , हे त्यांनी लक्षात घ्यायला हवं. जो पर्यंत हि न्यायव्यवस्था जिवंत आहे तो पर्यंत कुण्याही गरिबावर अन्याय होणार नाही. कुठला हि हितचिंतक दोषी ठरू शकणार नाही, हे नक्की.
म्हणून मी म्हणतो, आपली न्यायव्यवस्था हि  उच्च व उत्तम दर्ज्याची आहे, मला या न्यायव्यवस्थेविरोधात बोलण्याचा काहिएक अधिकार नाही.

आता मी एकच ठरविलेलं आहे कि
"जे जे होते ते ते पहावे नि आपले डोळे बंद करावे.

धन्यवाद!
----------------//**-- 
 शशिकांत शांडिलेनागपूर
भ्रमनध्वनी - ९९७५९९५४५०
**************************************************


No comments: